Entertainment News Live Updates 21 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
‘बिग बॉस मराठी’ सीझन 4च्या (Bigg Boss Marathi 4) घरामध्ये काल बिग बॉसनी घरातील सदस्यांवर ‘वाजवा रे वाजवा’ कॅप्टन्सी कार्य सोपवले होते. अपूर्वा आणि तेजस्विनीमध्ये हे कार्य पार पडणार असून, कोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे आज कळणार आहे. पण, दोन्ही ग्रुप मधील सदस्य भन्नाट स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग करताना दिसत आहेत. या कॅप्टनसी कार्यामध्ये कोण कोणाची वाजवणार? अपूर्वा नि तेजस्विनीमध्ये कोण कोणाला मागे टाकून बनेल घराची नवी कॅप्टन, हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
कंगना रनौतने 'कांतारा' चित्रपट पाहिल्यानंतर इंस्टाग्रामवर लाईव्ह सेशन केले. यामध्ये तिने ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाचे जोरदार कौतुक केले. अभिनेत्री म्हणाली, ‘मी आताच माझ्या कुटुंबासह कांतारा पाहून येत आहे आणि अजूनही थरथरत आहे. किती छान अनुभव होता तो... ऋषभ शेट्टी, तुला सलाम, लेखन, दिग्दर्शन, अभिनय सगळंच अविश्वसनीय! परंपरा, लोककथा, समस्या यांचा किती सुरेख मिलाफ आहे. इतकी सुंदर फोटोग्राफी, अॅक्शन... हा एक अप्रतिम चित्रपट आहे.’
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
सध्या सगळीकडे दिवाळीचा माहोल आहे. याच माहोलात काही बॉलिवूड कालाकारांच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले जाते. या दरम्यान अभिनेत्री क्रिती सेनन हिच्या घरी देखील दिवाळी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूडमध्ये नाव गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील हजर होती.
कुलभूषण खरबंदा (Kulbhushan Kharbanda) हे नाव तसं बॉलिवूडसाठी नवं नाही. आज ज्येष्ठ अभिनेते कुलभूषण खरबंदा हे त्यांचा 78 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी अधिक सहाय्यक भूमिका केल्या असल्या, तरी आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रत्येक पात्रात जीव ओतला आहे. कुलभूषण खरबंदा यांनी बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत काम केले आहे. याशिवाय तो पंजाबी चित्रपट सृष्टीतही सक्रिय होते. या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी वेब सीरिजमध्येही आपली जादू चालवली आहे. 'मिर्झापूर' या वेब सीरिजमध्ये त्यांनी सत्यानंद त्रिपाठी यांची भूमिका साकारली होती.
‘चाहे कोई मुझे जंगली कहे....’ म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते शम्मी कपूर (Shammi Kapoor) यांचा आज स्मृतिदिन. शम्मी कपूर यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1931 रोजी झाला होता. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ काम केले होते. शम्मी कपूर यांनी आपल्या नृत्य शैलीने हिंदी चित्रपटसृष्टीत नवा बदल घडवून आणला. शम्मी यांना बॉलिवूडचा ‘एल्विस प्रिस्ले’ म्हटले जायचे. चित्रपटाचा नायक केवळ झाडाची फांदी धरूनच झुलत नाही तर, तो स्वत:ही नाचू शकतो, हे त्यांनी आपल्या चित्रपटांमधून दाखवून दिले होते. त्यांच्यापासून प्रेरित होऊ नंतर इतर कलाकारांनीही चित्रपटांमध्ये नृत्य करण्यास सुरुवात केली.
नेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत 'बेबी ऑन बोर्ड' (Baby On Board) या सिरीजचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. विवाहित जोडप्याच्या आयुष्यात लग्नानंतर येणारा आणखी एक अविस्मरणीय क्षण म्हणजे त्यांना होणारे पहिले बाळ. आनंद, भीती, उत्सुकता अशा अनेक भावना यावेळी एकत्र मनात येत असतात. मग सुरु होतो तो नऊ महिन्यांचा नवा प्रवास. याच सुंदर प्रवासाची कहाणी आपल्याला या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. 'बेबी ऑन बोर्ड' लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी 'राम सेतू' (Ram Setu) चित्रपटातील 'जय श्री राम' (Jai Shree Ram Song) हे गाणं रिलीज झाले आहे. विक्रम मॉन्ट्रोज यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायलेले, हे गाणे शेखर अस्तित्व यांच्या गीतांसह एक भन्नाट ऊर्जा देणारं भक्ति गीत आहे. चित्रपटाच्या थीमला साजेसं असं हे गाणं आहे. गाण्याचे बोलही भगवान रामाची प्रतिमा डोळ्यांसमोर ठेवून लिहिण्यात आले आहेत. हे गाणं म्हणजे या दिवाळीत राम भक्तांसाठी मनोरंजनाची पर्वणीच असणार आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
दिवाळीपूर्वीच अक्षय कुमारच्या 'राम सेतू' मधील 'जय श्री राम' गाणं रिलीज
अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी 'राम सेतू' (Ram Setu) चित्रपटातील 'जय श्री राम' (Jai Shree Ram Song) हे गाणं रिलीज झाले आहे. विक्रम मॉन्ट्रोज यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायलेले, हे गाणे शेखर अस्तित्व यांच्या गीतांसह एक भन्नाट ऊर्जा देणारं भक्ति गीत आहे. चित्रपटाच्या थीमला साजेसं असं हे गाणं आहे. गाण्याचे बोलही भगवान रामाची प्रतिमा डोळ्यांसमोर ठेवून लिहिण्यात आले आहेत. हे गाणं म्हणजे या दिवाळीत राम भक्तांसाठी मनोरंजनाची पर्वणीच असणार आहे.
लवकरच येणार 'बेबी ऑन बोर्ड'; प्लॅनेट मराठीच्या नवीन सीरिजचे पोस्टर रिलीज
प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत 'बेबी ऑन बोर्ड' (Baby On Board) या सिरीजचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. विवाहित जोडप्याच्या आयुष्यात लग्नानंतर येणारा आणखी एक अविस्मरणीय क्षण म्हणजे त्यांना होणारे पहिले बाळ. आनंद, भीती, उत्सुकता अशा अनेक भावना यावेळी एकत्र मनात येत असतात. मग सुरु होतो तो नऊ महिन्यांचा नवा प्रवास. याच सुंदर प्रवासाची कहाणी आपल्याला या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. 'बेबी ऑन बोर्ड' लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बिग बॉसच्या घरात पेटणार शाब्दिक युद्ध; टास्क दरम्यान अमृतानं अपूर्वाला सुनावले खडे बोल!
बिग बॉस यांनी सदस्यांवर काल सोपवले रोख ठोक हे कार्य. काल मिळालेल्या चार कॅप्टन्सीच्या उमेदवारांमध्ये कार्य रंगणार असून त्यांच्यामध्ये आज पेटणार शाब्दिक युद्ध. आज उमेदवार त्यांची मते मांडणार असून इतर सदस्य देखील साक्षिदार म्हणून या कार्यात सहभागी होणार आहेत. उमेदवार पर्यायी वकील यांची भूमिका निभावणार असून या कोर्टाचा जज असणार आहे कॅप्टन रोहित शिंदे.
भाजपच्या कार्यक्रमात राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून टायगर श्रॉफचा सत्कार; सचिन अहिर यांचा आरोप, तर शेलार म्हणतात...
'मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव' हा कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम वरळीमधील जांबोरी मैदान येथे पार पडला. भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांचा अपमान भाजपनं केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केला आहे. सचिन अहिर यांनी ट्वीट करुन हा आरोप केला आहे. राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून अभिनेता टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) सत्कार करण्यात आला, असंही सचिन अहिर यांचं मत आहे.
वैशाली ठक्कर प्रकरणात एक्स-बॉयफ्रेंड राहुल नवलानी पोलिसांच्या ताब्यात, आरोपी पूजाचा शोध सुरु
टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करच्या (Vaishali Thakkar) आत्महत्येप्रकरणी (Vaishali Thakkar Suicide Case) इंदूर पोलिसांनी मुख्य आरोपी असणाऱ्या राहुल नवलानी (Rahul Navlani) याला अटक केली आहे. आरोपी राहुल नवलानी याला पोलिसांनी इंदूरमधून अटक केली आहे. वैशालीने आत्महत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. वैशालीने आपल्या सुसाईड नोटमध्ये राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा नवलानी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून पोलीस राहुल आणि त्याच्या पत्नीच्या शोधात होते. मात्र, अद्याप राहुलची पत्नी पूजा फरार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -