Entertainment News Live Updates 21 February : स्वराच्या पतीनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'हिंदू-मुस्लिम...'
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Kangana Ranaut: मुंबईमध्ये 'दादासाहेब फाळके पुरस्कार' (Dadasaheb Phalke Award 2023) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा पुरस्कार शासनाकडून दिला जात नसून एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो. काल (21 फेब्रुवारी) पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि वरुण धवन यांना दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (Dadasaheb Phalke International Film Festival) पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) एक पोस्ट शेअर करुन नेपोटिझमवर भाष्य केलं आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या बहुचर्चित कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची चांगलीच उत्सुकता आहे. 1 मिस्डकॉल द्या आणि 2 कोटी जिंका असं म्हणत या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट करण्यात आला आहे.
Dadasaheb Phalke Award 2023 : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित झाला असला तरी आजही हा सिनेमा चर्चेत आहे. नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला असून या सोहळ्यात विवेक अग्निहोत्रींच्या (Vivek Agnihotri) 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे.
Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) सिनेमाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. शाहरुखच्या 'पठाण'ने आता जगभरात 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे शाहरुख खऱ्या अर्थाने जगभरातील बॉक्स ऑफिसवरचा बादशाह ठरला आहे. तर देशात या सिनेमाने 623 कोटींचा गल्ला जमवला आहे.
Adil Khan Durrani Threatens Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामाक्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिच्या पतीमुळे अर्थात आदिल खान दुर्रानीमुळे (Adil Khan Durrani) चर्चेत आहे. आदिल सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला जामीन मिळू नये यासाठी राखी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. दरम्यान राखी 20 फेब्रुवारीला तिच्या पतीला भेटायला तुरुंगात गेली होती. त्यावेळी आदिलने तिला धमकावलं आहे.
Gautami Patil : गौतमी पाटीलचा खान्देश कन्या म्हणून गौरव करण्यात आला आहे.
Sonu Nigam Attacked : चेंबुरमधील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान लोकप्रिय गायक सोनू निगमला (Sonu Nigam) धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. या धक्काबुक्कीदरम्यान सोनूच्या टीममधील एक मुलगा स्टेजवरुन खाली पडल्याने जमखी झाला आहे. आता याप्रकरणी सोनू निगमने मौन सोडलं आहे.
Bela Bose : ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगणा बेला बोस (Bela Bose) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बेला यांनी साठ-सत्तरच्या दशकात अनेक गाजलेल्या सिनेमात काम केलं होतं. 200 पेक्षा अधिक सिनेमात त्यांनी काम केलं आहे.
Sonu Nigam : प्रसिद्ध गायक सोनू निगम याला चेंबूरमधील एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याचं समोर आले आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या मुलानी सुप्रसिद्ध गायक सोनू निगम याच्यासोबत धक्काबुक्की केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
Dadasaheb Phalke Award 2023 : 'दादासाहेब फाळके पुरस्कार' (Dadasaheb Phalke Award 2023) हा सिनेविश्वातील महत्त्वाचा चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या सिनेमातील भूमिकेसाठी तसेच सिनेविश्वातील योगदानासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता आणि आलियाचा पती रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) सिनेमातील शिवा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Sonu Nigam : चेंबूरमधील कार्यक्रमात सोनू निगमला धक्काबुक्की, व्हिडीओ व्हायरल
Sonu Nigam Hospitalised : प्रसिद्ध गायक सोनू निगम याला चेंबूरमधील एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याचं समोर आले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चेंबूरमध्ये लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान सोनू निगम याच्यासोबत धक्काबुक्की झाल्याचं समोर आले आहे. सोनू निगमला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Raundal Official Trailer: 'रौंदळ'चा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीस
Raundal Official Trailer: 'रौंदळ'(Raundal) या आगामी चित्रपटाची आज सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. टिझरनं रसिकांच्या मनात उत्सुकता जागवण्याचं काम केल्यानंतर या चित्रपटाचा बहुप्रतिक्षीत ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात कुमार मंगत पाठक आणि बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते 'रौंदळ'चा ट्रेलर लाँच आणि संगीत प्रकाशन करण्यात आले याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञमंडळी उपस्थित होते. 'राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा'सोबतच संगीतप्रधान 'बबन' या रोमँटिक चित्रपटात दिसलेल्या भाऊसाहेब शिंदेचा अँग्री यंग मॅन लुक 'रौंदळ'च्या ट्रेलरचं मुख्य आकर्षण ठरत आहे. 3 मार्च 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Shehzada Box Office Collection Day 3: कार्तिकचा 'शहजादा' सुपरफ्लॉप!
Shehzada Box Office Collection Day 3: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता त्याचा शहजादा (Shehzada) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत. तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शहजादा चित्रपटाच्या तीन दिवसांच्या कलेक्शनबाबत माहिती दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -