Entertainment News Live Updates 19 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Sep 2022 06:12 PM
कॉमेडियन कपिल शर्मा करणार पिझ्झा डिलिव्हरी! आगामी ‘झ्विगॅटो’चा ट्रेलर पाहिलात का?

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा टीव्हीपाठोपाठ आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन ठोकण्यासाठी सज्ज झाला आहे. कपिल त्याच्या ‘झ्विगॅटो’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील कपिलचा लूक आधीच रिलीज करण्यात आला होता. यामध्ये तो डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसला होता. आता कपिलच्या या आगामी चित्रपटाचा शानदार ट्रेलरही रिलीज झाला आहे. या चित्रपटात कपिलची वेगळी शैली पाहायला मिळणार आहे.


 





Koffee With Karan 7 : कॉफी विथ करणमध्ये गौरी खान सुहानाला देणार डेटिंग टिप्स; म्हणाली, 'एकाच वेळी दोन मुलांना डेट करु नको'

Koffee With Karan 7 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा (karan johar)  'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) हा टॉक शो चर्चेत असतो. सध्या या कार्यक्रमाचा सातवा सिझन सुरु आहे. वेगवेगळे सेलिब्रिटी या शोमध्ये हजेरी लावतात. नुकताच या कार्यक्रमाच्या नव्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, गौरी खान (Gauri Khan), माहीप कपूर (Maheep Kapoor) आणि भावना पांडे (Bhavna Panday) या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये गौरी ही सुहानाला डेटिंग टिप्स देताना दिसत आहे. 


पाहा प्रोमो: 





जुने कलाकार का सोडतायत मालिका? निर्माते असित कुमार मोदींनी सांगितलं कारण!

कलाकारांच्या या एक्झिटवर आता निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumar Modi) आणि आपली प्रतिक्रिया देत याचे कारण सांगितले आहे. नुकतीच मालिकेत नव्या तारक मेहताची (Taarak Mehta) एन्ट्री झाली आहे. आता मालिकेत तारक मेहताच्या भूमिकेत अभिनेता सचिन श्रॉफ दिसत आहे. या आधी तब्बल 14 वर्ष ही भूमिका अभिनेते शैलेश लोढा यांनी साकारली होती. मात्र, काही काळापूर्वी त्यांनी या मालिकेतून एक्झिट घेतली होती.   


 





Brahmastra : 'ब्रह्मास्त्र'नं 200 कोटींचा टप्पा केला पार; दहाव्या दिवशी केली 'एवढी' कमाई

Brahmastra Box Office Collection Day 10 :  रविवारी म्हणजेच दहाव्या दिवशी ब्रह्मास्त्र या चित्रपटानं 16.25 ते 17.25 कोटींची कमाई केली आहे. रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात  या चित्रपटानं 40 कोटींची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटानं  209 ते 210 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरातील बॉक्स ऑफिसनं 360 कोटींची कमाई केली आहे.

सलमान खानच्या ‘बिग बॉस 16’ची छोट्या पडद्यावर हवा! यंदाच्या पर्वात सहभागी होणाऱ्यांमध्ये ‘या’ नावांची चर्चा

‘बिग बॉस 16’च्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विवियन डिसेना (Vivian Dsena), जन्नत जुबेर (Jannat Zubair), मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui), शिवांगी जोशी (Shivangi Joshi), शिवीन नारंग (Shivin Narang), दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi), कनिका मान (Kanika Mann), अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani), फैसल शेख (Faisal Shaikh), पूनम पांडे (Poonam Pandey), राजीव सेन (Rajeev Sen), चारू असोपा (Charu Asopa), टीना दत्ता (Tina Dutta), मुनमुन दत्ता (Munmun Dutta), हर्षद चोप्रा (Harshad Chopra), फरमानी नाझ (Farmani Naaz), पारस कलनावत (Paras Kalnawat) या कलाकारांची नावे चर्चेत आहेत.


 





Shah Rukh Khan : 'एक दिवस सुट्टी घेऊन...'; शाहरुख खाननं हटके अंदाजात पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्या शुभेच्छा

Shah Rukh Khan :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा 18 सप्टेंबर रोजी 72 वा वाढदिवस होता. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खाननं (Shah Rukh Khan)  देखील नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या. ' सर, एक दिवस सुट्टी घेऊन वाढदिवस साजरा करा' अशी हटके पोस्ट शाहरुखनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. शाहरुखच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 



‘केजीएफ 2’मुळे मेकर्स झाले मालामाल; प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या चित्रपटाने मिळवला तब्बल पाचपट नफा!

‘केजीएफ 2’ (KGF 2) हा भारतीय चित्रपट विश्वातील एक विक्रमी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने रिलीज झाल्यापासून आजवर अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत. साऊथ अभिनेता यश (Yash) स्टारर या चित्रपटाने पॅन इंडिया चित्रपटांसाठी एक बेंचमार्क सेट केला आहे. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच केले नाही तर, मेकर्सना देखील मालामाल केले होते. आता या चित्रपटाने वितरकांना देखील प्रचंड नफा मिळवून दिला आहे. या चित्रपटातून वितरकांना किती नफा झाला याचा आकडा नुकताच समोर आला आहे.


वाचा संपूर्ण बातमी


 



Viral Video : विद्यार्थ्यानं गायलेल्या 'चंद्रा' लावणीनं नेटकऱ्यांना लावलं वेड; अमृता खानविलकरकडून कौतुक, व्हिडीओ तुफान व्हायरल

Viral Video : आपल्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही गेल्या काही दिवसांपसून तिच्या चंद्रा या चंद्रमुखी चित्रपटातील लावणीमुळे चर्चेत आहे. या लावणीनं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. या लावणीवरील डान्सचे व्हिडीओ सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. गायिका श्रेया घोषालनं गायलेल्या या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. चंद्रा हे गाणं गाणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी गाणं गाणाऱ्या जयेश खरे या मुलाच्या आवाजाचं कौतुक केलं आहे. सहावी इयत्तेत शिकणाऱ्या या मुलाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 


पाहा व्हिडीओ: 


Purushottam Karandak : 'दर्जेदार एकांकिका नाहीत म्हणून स्पर्धा होणार नाही असं जाहीर करून टाकावं' ; विजू माने यांनी व्यक्त केला संताप

Purushottam Karandak : पुरुषोत्तम करंडक (Purushottam Karandak) ही प्रसिद्ध नाट्य स्पर्धा सध्या चर्चेत आहे. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच करंडक देण्याच्या योग्यतेची एकांकिका आणि अभिनय आढळून आलेला नाही, असं म्हणत यंदा स्पर्धेच्या परीक्षकांनी केवळ सांघिक पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आता अनेक लोक या स्पर्धेचा आणि परीक्षकांच्या निर्णयाचा निषेध करत आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाटकाला चांगली एकांकिका निवडून त्यांना करंडक जाहीर करायला हवा होता, असं अनेकांचे मत आहे. आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) यांनी एका पोस्ट शेअर करुन पुरुषोत्तम करंडक या स्पर्धेच्या परीक्षकांचे कान टोचले आहेत. 


Neighbours Movie : एकाच मार्गाने प्रवास करणाऱ्या दोन शेजाऱ्यांची एक जगावेगळी प्रेमकथा; नेबर्स 'या' दिवशी होणार रिलीज

Neighbours Movie : 'कल्पना रोलिंग  पिक्चर्स प्रौडक्शन' निर्मित आणि  'मिठुवाला प्रौडक्शन्स' यांचे सादरीकरण असलेल्या 'नेबर्स' ( Neighbours) हा चित्रपट 23 सप्टेंबर पासून  संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.  निर्माते हितेश पटेल आणि दिग्दर्शक विनय श्रीरंग घोलप यांच्या या चित्रपटात एक रहस्यमय प्रेमकथा चित्रित करण्यात आली आहे.



Purushottam Karandak : अरेच्चा हे काय... यंदाचा पुरुषोत्तम करंडकाचा मान कोणालाच नाही!

Purushottam Karandak Pune : पुरुषोत्तम करंडक (Purushottam Karandak) या नाट्य स्पर्धेत विविध एकांकिका सहभागी होतात. या स्पर्धेचं पुण्यातील (Pune) तरुणाईला आकर्षण असतं. 1963 सालापासून महाविद्यालयीन स्तरावर पुरुषोत्तम करंडक ही नाट्य स्पर्धा महाराष्ट्रीय कलासोपक संस्थेतर्फे आयोजित  करण्यात येते. महाराष्ट्रातील तरुणाईच्या नाट्यगुणांना वाव देणाऱ्या प्रमुख स्पर्धांमधून पुरुषोत्तम करंडकाचा समावेश होतो. मात्र स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच करंडक देण्याच्या योग्यतेची एकांकिका आणि अभिनय परीक्षकांना आढळून आलेला नाही. त्यामुळे यंदा स्पर्धेच्या परीक्षकांनी केवळ सांघिक पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला.

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'ती मी नव्हेच' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


'ती मी नव्हेच' या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात श्रेयस तळपदे, उर्मिला मातोंडकर आणि निनाद कामत महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. 'ती मी नव्हेच' या सिनेमानं आता सिनेसरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


किच्चा सुदीपच्या 'कब्जा'चा ट्रेलर आऊट


दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीपच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या किच्चा सुदीप त्याच्या आगामी 'कब्जा' सिनेमामुळे चर्चेत आला आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या सिनेमात किच्चा सुदीपसह उपेंद्रदेखील मुख्य भूमिकेत आहे.


चंद्रपूरमध्ये 'झाडीपट्टी' नाट्य संमेलनाला सुरुवात


चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात आजपासून चौथे झाडीपट्टी नाट्य संमेलन सुरू झाले आहे. विदर्भातील चार जिल्ह्यातल्या झाडीपट्टी नाट्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी झाडीपट्टी नाट्य संमेलन आयोजित केले जाते. यंदा प्रसिद्ध झाडीपट्टी कलाकार अनिरुद्ध वनकर संमेलनाध्यक्ष आहेत.


Nishi Singh Passed Away : अभिनेत्री निशी सिंह यांचे निधन; आजारासोबतची झुंज अपयशी


Nishi Singh Passed Away : मनोरंजनसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. 'कुबूल है', 'तेनाली राज', 'इश्कबाज' यांसारख्या लोकप्रिय मालिकांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री निशी सिंह (Nishi Singh) यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निशी सिंह आजारी होत्या. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 


'नेने वस्थुन्ना'मध्ये धनुष दिसणार दुहेरी भूमिकेत


दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष सध्या त्याच्या आगामी 'नेने वस्थुन्ना' सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. सेल्वाराघवनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात धनुष दुहेरी भूमिकेत दिसून येणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.