Entertainment News Live Updates 17 February : शेहजादा चित्रपट रिलीज झाल्यानंतर कार्तिक आर्यननं घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 17 Feb 2023 05:28 PM
Farah Khan, Sajid Khan: साजिद खान आणि फराह खान यांनी घेतले साईंचे दर्शन

Farah Khan, Sajid Khan: नृत्‍यदिग्‍दर्शिका फराह खान (Farah Khan) आणि दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) यांनी आज साईंचे दर्शन घेतले. आज दुपारी दोघांनी साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. साजिद खान बिग बॉस-16 मधून बाहेर पडला. त्यानंतर साजिद आणि फरहा खाननं साईबाबांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर नृत्‍यदिग्‍दर्शिका फराह खान आणि बिग बॉस फेम साजिद खान या दोघांचा सत्‍कार संस्‍थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केला. 


Kartik Aaryan: शेहजादा चित्रपट रिलीज झाल्यानंतर कार्तिक आर्यननं घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

Kartik Aaryan: अभिनेता  कार्तिक आर्यनचा शेहजादा हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता कार्तिकनं त्याच्या आई-वडिलांसोबत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. 



Swara Bhasker: स्वरानं 'स्पेशल मॅरेज अॅक्ट'च्या अंतर्गत केलं लग्न; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'आईचे दागिने आणि ज्वेलरी...'

Swara Bhaskerअभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) विवाहबद्ध झाली. फहाद  हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे. स्वरानं नुकतेच फहादसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. तिनं या फोटोला खास कॅप्शन देखील दिलं आहे. 





Vaalvi: वाळवी ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

Vaalvi: ‘वाळवी’या (Vaalvi) मराठी फिल्मच्या जागतिक डिजीटल प्रीमियरची घोषणा करण्यात आली आहे. पांडू, झोंबिवली, हर हर महादेव आणि टाइमपास 3 यांसारख्या ब्लॉकबस्टर मराठी फिल्म्स प्लॅटफॉर्मवर आणल्यानंतर झी 5 आता 24 फेब्रुवारी रोजी ‘वाळवी’चा प्रीमियर करण्यास सज्ज आहे. परेश मोकाशीने दिग्दर्शित केलेल्या या फिल्ममध्ये स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), सुबोध भावे (Subodh Bhave), अनिता दाते-केळकर (Anita Date-Kelkar) आणि शिवानी सुर्वे (Shivani Surve) प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


बॉक्स ऑफिसवर शाहरुखचा जलवा; पठाण चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील


Pathaan Box office Collection Day 22 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट रिलीज होऊन 22 दिवस झाले आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. पठाण हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्यानंतर आता यशराज फिल्म्सनं या चित्रटाच्या तिकीटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.














Dharmendra: ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला धर्मेंद्र यांनी दिलं सडेतोड उत्तर; म्हणाले, 'सगळे स्ट्रगल करत आहेत...'


Dharmendra: अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे त्यांच्या हटके स्टाइलमुळे आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतात. धर्मेंद्र सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांची नवी वेब सीरिज (Web Series) ओटीटीवर (OTT) रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये धर्मेंद्र हे सलीम चिश्ती नावाच्या सुफी संतांची भूमिका साकारणार आहेत.  या सीरिजमधील लूकचा फोटो धर्मेंद्र यांनी काल सोशल मीडियावर शेअर केला.  या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं त्यांना ट्रोल केलं. आता या ट्रोलरला धर्मेंद्र यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. 









Akshay And Emraan In Mumbai Metro: मुंबई मेट्रोमध्ये अक्षय आणि इमराननं केला प्रवास; ‘मैं खिलाडी, तू अनाडी’ गाण्यावर केला डान्स








Akshay And Emraan In Mumbai Metro: बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांचा सेल्फी (Selfiee) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच या चित्रपटामधील 'कुडीये नी तेरी' हे गाणं देखील रिलीज झाले होते. सध्या अक्षय आणि इमरान हे या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. अनेक कलाकार त्यांच्या चित्रपटाचे हटक्या पद्धतीनं प्रमोशन करत असतात. आता सेल्फी या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी अक्षय आणि इमराननं  मुंबई मेट्रोमधून (Mumbai Metro) प्रवास केला आहे. हा प्रवास करताना त्यांनी  ‘मैं खिलाडी, तू अनाडी’  या गाण्यावर डान्स देखील केला. नुकताच त्यांचा मुंबई मेट्रोमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.






 






 



































- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.