Entertainment News Live Updates 17 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सोशल मीडियाद्वारे चित्रपटांवर बहिष्कार टाकणाऱ्या ट्रोलर्सबद्दल आपले मत उघडपणे व्यक्त केले आहे. बॉयकॉट ट्रेंड संपवण्यासाठी मनोरंजन क्षेत्रातील लोकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे तो म्हणाला. अर्जुन कपूर म्हणाला की, 'मला वाटतं आपण त्याबद्दल गप्प राहून चूक केली आणि लोकांनी त्याचाच गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आहे.'
सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि देशप्रेमाने प्रेरित होऊन साजरा केला जात आहे. नेत्रदीपक अशा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानंतर प्रदर्शित होणारा 'राष्ट्र' (Rashtra) हा आगामी चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत जागवणारा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. 26 ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. 215 कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला माहिती होती की, सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) खंडणी वसुल करणार आहे. त्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर आरोपपत्र दाखल केलं आहे. ईडीने 215 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आरोपी असल्याचं म्हटलं आहे.
अभिनेता अली फजलने 'मिर्झापूर' सीझन 3ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी मोठी अपडेट दिली आहे. काळ्या रंगाच्या हुडीमध्ये गुड्डू भैय्याने स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि 'मिर्झापूर कमिंग सून' लिहिले.
बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटांमध्ये आमिरच्या या चित्रपटाचा समावेश होणार आहे. कलेक्शनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ‘लाल सिंह चड्ढा’ची अवस्था ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’पेक्षाही वाईट झाली आहे. बॉलिवूड हंगामाच्या एका अहवालानुसार ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मंगळवारी जवळपास 85 टक्क्यांची घसरण झाली आहे. चित्रपटाचे 70 टक्के शो रद्द करण्यात आले आहेत. या अहवालानुसार, मंगळवारी म्हणजेच रिलीजच्या सहाव्या दिवशी ‘लाल सिंह चड्ढा’ने 2 कोटींपेक्षा कमी कमाई केली आहे.
भारताचा गौरवशाली 75वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना, निर्माते शैलेंद्र केकुमार, सुजय कुट्टी, कृष्ण कुमार बी आणि सूरज शर्मा यांनी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित बहुचर्चित भव्यदिव्य अशा ‘1770’ चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. एकाचवेळी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली अशा सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक दिशा वकानी आज (17 ऑगस्ट) तिचा वाढदिवस साजरा करत आहे.परंतु, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कॉमेडी टीव्ही शोमधून तिला ओळख मिळाली. या शोमध्ये दया बेनची भूमिका साकारून ती घराघरात लोकप्रिय झाली. दिशाने आता या शोचा निरोप घेतला असला तरी आजही लोक तिला याच नावाने ओळखतात.
मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी जोडी अर्थात अभिनेते सचिन (Sachin Pilgaonkar) आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांचा आज (17 ऑगस्ट) वाढदिवस आहे. विशेष म्हणजे दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो. या जोडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या जोडीवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं आहे. या मालिकेनंतर आता त्यांचा नवा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे ही जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. हार्दिक, अक्षयानं पुन्हा एकत्र काम करण्याची चाहत्यांची इच्छा ‘चतुर चोर’ या चित्रपटामुळे पूर्ण होणार आहे. या चित्रपटात हार्दिक आणि अक्षया प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील. नावापासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या या चित्रपटातून हार्दिक आणि अक्षया पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र येणार असल्याने या चित्रपटाविषयीचं कुतूहल अधिकच वाढलं आहे हे नक्की!
बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याचा ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सतत वादात अडकला आहे. चित्रपटाबाबत सोशल मीडियावर देखील मोठी चर्चा पाहायला मिळाली. मात्र, या सगळ्यात अनेक बॉलिवूड कलाकार आमिर खानच्या समर्थनात पुढे आले आहेत. त्यांनी आमिरच्या ‘लाल सिंह चड्ढा’चे कौतुक केले आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
उर्फी जावेदचा फोटो मॉर्फ करणाऱ्या तरुणाला अटक; पोस्ट शेअर करत दिली माहिती
चित्रविचित्र स्टाईल्समुळे उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर चर्चेत असते. उर्फीला नेटकरी ट्रोल करताना दिसून येतात. ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत उर्फी दररोज नवीन स्टाईलमधील तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. गेल्या काही दिवसांपासून एक व्यक्ती उर्फीकडे ब्लॅकमेल करत धमकी देत होता. पण आता या धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अनन्यसाधारण 'समयरा'च्या प्रवासाची झलक; ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
'समायरा म्हणजे प्रोटेक्टेड बाय गॉड' नावाप्रमाणेच समायराचा प्रवास आहे. प्रश्नांच्या विळख्यात सापडलेली समायरा कशी अध्यात्माच्या उंबऱ्यावर येऊन थांबते. स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेली 'समायरा' आणि तिचा अनन्यसाधारण प्रवास खूप काही शिकवून जाणार यात काही शंकाच नाही. नुकताच 'समायरा'चा (Samaira) ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
'कार्तिकेय 2'ने सिनेमागृहात घातला धुमाकूळ; बॉक्स ऑफिसवर बिग बजेट सिनेमांना टाकलं मागे
गेल्या काही दिवसांत अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. आमिर खानचा (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) आणि अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' (Raksha Bandhan) हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडले. तर दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका करत आहेत. कमी बजेट असलेल्या 'कार्तिकेय 2' (Karthikeya 2) या दाक्षिणात्य सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे.
आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय लता मंगेशकरांच्या जयंती दिनी सुरू होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय (Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar International Music College) सुरू करण्यात येणार आहे. हे संगीत महाविद्यालय लता दीदींच्या जयंती दिनी 28 सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज दिले आहेत.
राजामौलींच्या 'आरआरआर'चा होणार ऑस्करच्या शर्यतीत समावेश; अनुराग कश्यपने दिली माहिती
एसएस राजामौलींचा (SS Rajamauli) 'आरआरआर' (RRR) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमाने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सिनेमाचे कथानक, भव्यता आणि वीएफएक्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. आता या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी म्हटले आहे की, 'आरआरआर' सिनेमाचा ऑस्करच्या शर्यतीत समावेश होऊ शकतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -