Entertainment News Live Updates 16 February : पठाण चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Swara Bhasker: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही फहाद जिरार अहमदसोबत (Fahad Zirar Ahmad) विवाहबद्ध झाली. फहाद जिरार हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे. स्वरा आणि फहाद यांनी कोर्ट मॅरेज केले आहे. स्वरानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील एक व्हिडीओ शेअर करुन फहाद आणि तिच्या लग्नाची माहिती दिली आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah New Tapu: छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा शो लोक आवडीनं बघतात. या मालिकेच्या नव्या एपिसोडप्रमाणेच जुन्या एपिसोड्सला देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. ही मालिका जवळपास 14 वर्षांपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. आता काही नव्या कलाकारांची एन्ट्री या मालिकेमध्ये होत आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत राज अनादकट (Raj Anadkat) हा कलाकार टप्पू ही भूमिका साकारत होता. त्यानं काही महिन्यांपूर्वी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. आता या मालिकेत अभिनेता नितीश भालुनी (Nitish Bhaluni) हा टप्पू ही भूमिका साकारणार आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे निर्माते आसित मोदी (Asit Modi) यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून ही माहिती दिली.
Pathaan Box office Collection Day 22 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट रिलीज होऊन 22 दिवस झाले आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. पठाण हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्यानंतर आता यशराज फिल्म्सनं या चित्रटाच्या तिकीटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलीस आणि आणखी काही या थिएटर्समध्ये प्रेक्षकांना हा चित्रपट 110 रुपयांमध्ये पाहता येईल, अशी माहिती यशराज फिल्म्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.
Dharmendra: अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे त्यांच्या हटके स्टाइलमुळे आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतात. धर्मेंद्र सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांची नवी वेब सीरिज (Web Series) ओटीटीवर (OTT) रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये धर्मेंद्र हे सलीम चिश्ती नावाच्या सुफी संतांची भूमिका साकारणार आहेत. या सीरिजमधील लूकचा फोटो धर्मेंद्र यांनी काल सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं त्यांना ट्रोल केलं. आता या ट्रोलरला धर्मेंद्र यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
Alia Bhatt Shares Photo : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या घरी काही महिन्यांपूर्वी एका चिमुकलीचं आगमन झालं. आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही गूडन्यूज चाहत्यांना दिली. रणबीर आणि आलियाने त्यांच्या मुलीचं नाव 'राहा' असं ठेवलं आहे. नुकतेच आलियानं बाळांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. आलियाने शेअर केलेल्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
'मराठी बिग बॉसमधून हिंदीमध्ये गेल्यावर टार्गेट केलं जातं पण...'; बिग बॉस-16 च्या निकालावर भरभरुन बोलला शिव ठाकरे
Shiv Thakarey: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम बिग बॉस-16 (Bigg Boss 16) चा ग्रँड फिनाले काही दिवसांपूर्वी पार पडला. या कार्यक्रमाचा विजेता रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) ठरला. एमसी स्टॅन, शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे बिग बॉस 16 चे टॉप-3 स्पर्धक होते. बिग बॉस-16 चा निकालावर अनेक जण नाराज होते. शिव ठाकरे हा बिग बॉस-16 चा विजेता ठरवा, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. पण आता बिग बॉस-16 च्या निकालावर शिव ठाकरेनं प्रतिक्रिया दिली आहे.
कांतारा फेम ऋषभ शेट्टीचा डंका; दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टरचा पुरस्कार जाहीर
Rishab Shetty: अभिनेता ऋषभ शेट्टीनं (Rishab Shetty) त्याच्या कांतारा (Kantara) या चित्रपटामधील अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील ऋषभनं केलं. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता ऋषभ शेट्टीला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (Dadasaheb Phalke International Film Festival) मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे CEO अभिषेक मिश्रा यांनी एका पत्राद्वारके ही माहिती दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -