Entertainment News Live Updates 16 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 16 Dec 2022 02:35 PM
Maharashtrachi Hasyajatra : रोहित शेट्टीची Cirkus रंगणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. केवळ मराठीच नाही, तर इतर भाषिक लोकही हा कार्यक्रम तितक्याच आपुलकीने पाहत असतात. याचे दाखले हास्यजत्राच्या कलाकारांना प्रवासात नेहमीच अनुभवायला मिळालेले आहेत. हा कार्यक्रम आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून जगभरात प्रसिद्ध आहे. आता या कार्यक्रमात 'सर्कस' (Cirkus) सिनेमाची टीम हजेरी लावणार आहे. 





Rajabhau More : ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचं निधन

Rajabhau More : ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे (Rajabhau More) यांचे दृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ रंगकर्मी आणि आझाद हिंद मंडळाचे कार्याध्यक्ष राजाभाऊ मोरे यांनी राज्य नाट्य स्पर्धेत नाटक पाहत असतानाच अखेरचा श्वास घेतला आहे. 





Amitabh Bachchan : आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केला जातोय : अमिताभ बच्चन

Amitabh Bachchan In Kolkata International Film Festival : कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Kolkata International Film Festival) गुरुवारी देशभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या यादीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नावाचाही समावेश आहे. महोत्सवादरम्यान त्यांनी सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य केलं. 

KIIF : विविध जाती-धर्माच्या लोकांना उत्तम पद्धतीनं समजून घेण्यासाठी 'सिनेमा' हेच योग्य माध्यम; 'पठाण'च्या वादात शाहरुख खानचं वक्तव्य

Shah Rukh Khan In Kolkata International Film Festival : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून 'पठाण' (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. आता 28 व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता चित्रपट महोत्सवात (Kolkata International Film Festival) किंग खानने एक विधान केलं आहे. तो म्हणाला,"विविध जाती-धर्माच्या लोकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सिनेमा हे योग्य माध्यम आहे". 





Gandhi Godse Ek Yudh : राजकुमार संतोषीचं नऊ वर्षांनी दमदार पुनरागमन

Rajkumar Santoshi On Gandhi Godse Ek Yudh : लोकप्रिय दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) नऊ वर्षांनी सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहेत. 'गांधी-गोडसे एक युद्ध' (Gandhi Godse Ek Yudh) या सिनेमाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच त्यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे.





KIFI : डॉ. सलील कुलकर्णींच्या 'Ekda Kaay Zala'ची घौडदौड सुरुच

Kolkata International Film Festival : 'एकदा काय झालं' (Ekda Kaay Zala) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अजूनही या सिनेमाची घौडदौड सुरुच आहे. लोकप्रिय संगीतकार, डॉ. सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) लिखित-दिग्दर्शित या सिनेमाची निवड 'चेन्नई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' (Kolkata International Film Festival) झाली आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Avatar 2 Leaked: भारतात रिलीजआधी अवतार 2 लीक


Avatar 2 Leaked:  सिने-दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन (James Cameron) तेरा वर्षांनंतर सुपरहिट 'अवतार'चा (Avatar) दुसरा भाग घेवून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जेम्स कॅमेरॉनचा 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा चित्रपट शुक्रवारी भारतात प्रदर्शित होत आहे. मात्र याआधी अवतार टीमला एक धक्का बसला आहे.  रिलीज होण्यापूर्वीच हा चित्रपट लीक झाल्याची माहिती काही वेबसाईट्सनी दिली आहे. हा चित्रपट आता टॉरेंट साइट्स आणि इतर पायरसी नेटवर्कवर 600MB ते 4GB पर्यंतच्या साईजमध्ये उपलब्ध होत असल्याचं दिसून आलं आहे.


Rochak Kohli : 'पानी दा रंग' फेम संगीत दिग्दर्शक रोचक कोहलीचं नवीन गाणं रिलीज


Rochak Kohli New Song : 'विक्की डोनर' चित्रपटातील 'पानी दा रंग' आणि 'अय्यारी' चित्रपटातील 'ले डुबा' या गाण्यांसाठी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रोचक कोहलीचं नवीन गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. "पहली बार मिले" असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. 


Veena Kapoor: ती मी नव्हेच... नावात झाला घोळ, अभिनेत्रीच्या हत्येच्या पसरल्या अफवा


Veena Kapoor: मुंबईमधील (Mumbai) एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी  जुहूमधील वीणा कपूर (Veena Kapoor) नावाच्या महिलेची हत्या झाली होती. त्या महिलेच्या मुलानं तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह हा नदीमध्ये फेकला. ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. या महिलेचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेक ठिकाणी  व्हायरल झालेल्या माहितीमध्ये अभिनेत्री वीणा कपूर यांचा फोटो आणि माहिती वापरण्यात आली होती. त्यानंतर अभिनेत्री वीणा कपूर (Actress Veena Kapoor) यांना अनेकांनी फोन करुन या प्रकरणाबाबत विचारलं. पण आता ANI या वृत्तसंस्थेला अभिनेत्री वीणा कपूर यांनी त्यांच्या व्हायरल झालेल्या बातमीबद्दल माहिती दिली असून त्यांनी दिंडोशी पोलीस स्टेशनध्ये तक्रार दाखल केली आहे. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.