Entertainment News Live Updates 16 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Karthikeya 2 Day 3 Box Office Collection : गेल्या काही दिवसांत अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. आमिर खानचा (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) आणि अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' (Raksha Bandhan) हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडले. तर दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका करत आहेत. कमी बजेट असलेल्या 'कार्तिकेय 2' (Karthikeya 2) या दाक्षिणात्य सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे.
Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. हे संगीत महाविद्यालय लता दीदींच्या जयंती दिनी 28 सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज दिले आहेत.
Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile Tu Mala) ही कलर्स मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेच्या आगामी भागात रत्नमाला मोहिते मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसणार आहे. रत्नामाला मोहितेला मंगळागौर खेळताना पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी म्हटले आहे की, 'आरआरआर' सिनेमाचा ऑस्करच्या शर्यतीत समावेश होऊ शकतो.
Siddharth Jadhav : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल असून आता त्याला डिस्चार्ज मिळाला आहे. लाडक्या सिद्धूने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. सिद्धार्थ मागचा एक आठवडा आजारी असून रुग्णालयात दाखल होता.
KBC 14: आयुष गर्ग हा कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या 14 व्या सिझनमधील 75 लाख जिंकणारा पहिला स्पर्धक आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, तिसऱ्या दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला!
चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट काही विशेष जादू दाखवू शकलेला नाही. ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर (Kareena Kapoor-Khan) मुख्य भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाने सुरुवातीचे दोन दिवस फारच कमी कमाई केली आहे. आता या चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. शनिवारी देखील या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झाली आहे.
अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला! पाहा कलेक्शनचा आकडा
बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या वर्षात रिलीज झालेले दोन चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर अक्षयच्या नव्या चित्रपटाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा होत्या. मात्र, या चित्रपटाने देखील प्रेक्षकांची निराशाच केली आहे. अक्षयच्या ‘रक्षा बंधन’ या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता, हा चित्रपट सपाटून आपटल्याचे कळते आहे. अक्षयचा हा नवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकलेला नाही.
‘आपल्या प्रार्थनांना यश मिळतंय’, अभिनेता सुनील पाल यांनी दिली राजू श्रीवास्तव यांची हेल्थ अपडेट
कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांचे कुटुंबीय चाहत्यांना सातत्याने माहिती देत आहेत. दरम्यान, कॉमेडियन आणि राजू श्रीवास्तव यांचे जवळचे मित्र सुनील पाल (Sunil Pal) यांनी राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे सध्या एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून, व्हेंटिलेटरवर आहेत. अद्याप त्यांच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झालेली नाही. गेल्या आठवड्यात राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
'समायरा'तील 'आला रे हरी आला रे' अभंग प्रेक्षकांच्या भेटीला; 26 ऑगस्टला सिनेमा होणार प्रदर्शित
पंढरीचा वास, चंद्रभागेचे स्थान आणि विठोबाच्या दर्शनाची आस, जिथे एकत्र येते ती म्हणजे पंढरीची वारी. याच वारीचा आभास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे, वारकऱ्यांमध्ये आणि विठ्ठलामध्ये असणाऱ्या जिव्हाळ्यावर भाष्य करणारे निहार शेंबेकर संगीत दिग्दर्शित 'समायरा' (Samaira) सिनेमातील 'आला रे हरी आला रे' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -