Entertainment News Live Updates 14 December : शाहरुख, दीपिकाच्या 'पठाण'मधील गाण्यावर नेटकऱ्यांनी साधला निशाणा
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
IMDb Top Indian Web Series: ओटीटीवरील(OTT) विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिजला (Web Series) प्रेक्षकांची पसंती मिळते.
आता IMDb नं त्यांच्या 2022 मधील टॉप-10 वेब सीरिजची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 1 जानेवारी ते 7 नोव्हेंबर दरम्यान देशात प्रदर्शित झालेल्या सर्व वेब सीरीजमधील 7 किंवा त्याहून अधिक रेटिंग मिळालेल्या आणि किमान 10,000 मते मिळालेल्या वेब सीरिजचा समावेश या यादीमध्ये करण्यात आला आहे. पाहा या वेब सीरिजची यादी-
IMDb 2022 मधील टॉप 10 वेब सीरीजची यादी-
- पंचायत
- दिल्ली क्राइम
- रॉकेट बॉयज
- ह्यूमन
- अपहरण
- गुल्लक
- एनसीआर डेज
- अभय
- कँपस डायरी
- कॉलेज रोमान्स
Besharam Rang Song: बॉलिवूडचा बादशाह ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यातील दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि शाहरुख यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली तर काही लोक या गाण्याला ट्रोल करत आहेत. बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणनं घातलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला. आता या गाण्यातील म्युझिक हे कॉपी केलेलं आहे, असा आरोप सध्या नेटकरी करत आहेत.
Har Har Mahadev: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा हर हर महादेव (Har Har Mahadev) हा चित्रपट झी मराठी वाहिनीवर 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटास संभाजीराजे छत्रपती आणि स्वराज्य संघटनेसह (Swarajya Sanghatana) राज्यभरात अनेक स्तरांतून विरोध झाला होता. त्यामुळे हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, असे पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी झी स्टुडिओच्या व्यवस्थापनास दिलेले होते. पण अजूनही झी मराठी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याची जाहिरात दाखविली जात आहे.
Vijay Sethupathi: दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतूपतीचा (Vijay Sethupathi) चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. विजय हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटामध्ये विजय हा प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. विजयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. विजय सध्या त्याच्या चित्रपटामुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. विजयनं त्याचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमधील त्याचा लूक पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले. अनेकांनी विजयच्या या ट्रान्सफॉर्मेशनचं कौतुक केलं आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Nora Fatehi Files Defamation: जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात नोरा फतेहीने दाखल केला मानहानीचा दावा
Nora Fatehi Files Defamation: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही गेल्या काही दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) हिने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. नोराने तिच्या याचिकेत जॅकलिनने तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
Bamboo: ‘बांबू’ चित्रपटाचा टीझर रिलीज
Bamboo: खरंतर प्रेमात पडलेल्यानंतर आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचा आनुभव अनेकांनी घेतला असेल. प्रत्येकानेच घेतला असेल. तुमचे गेलेले प्रेम यु टर्न मारून परत येण्यासाठी प्रेमाचे सायन्स पाळणे खूप गरजेचे आहे. ‘बांबू’ (Bamboo) चित्रपटाचे टीझर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून येत्या 26 जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित, विशाल देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’च्या टीझरमध्ये तरूण -तरूणी बांबूच्या बनातून जाताना दिसत आहेत. अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटात कलाकार नेमके कोण आहेत, हे जाणून घेण्याची आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.
Jui Gadkari: ‘डिरेक्टर्स बॉक्स’; अभिनेत्री जुई गडकरीने दिग्दर्शकांना दिली अनोखी भेट
Jui Gadkari: स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag) मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. अर्जुन आणि सायली ही नवी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. मालिकेच्या माध्यमातून कलाकार घराघरात पोहोचतात. मात्र या कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात तंत्रज्ञांसोबतच महत्त्वाची व्यक्ती असते आणि ती म्हणजे दिग्दर्शक. पडद्यामागे राहून सारी सूत्र हलवणारा हा अवलिया क्वचितच प्रेक्षकांसमोर येतो.
मालिकेला खऱ्या अर्थाने दिशा देणाऱ्या या दिग्दर्शकाविषयी वाटणारी आपुलकी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अभिनेत्री जुई गडकरीने एक अनोखा मार्ग शोधला. ठरलं तर मग मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांच्यासाठी जुईने सेटवर एक खास खाऊचा डबा आणला आहे. या खाऊच्या डब्याला ‘डिरेक्टर्स बॉक्स’ असं हटके नावही तिने दिलं आहे. सेटवर जुई दररोज नवनवे पदार्थ खाण्यासाठी घेऊन येत असते. दिग्दर्शक सचिन गोखले यांच्यासाठी आणलेल्या या खाऊच्या डब्यातील खाऊ संपणार नाही याकडे जुईचं आवर्जून लक्ष असतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -