Entertainment News Live Updates 13 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Aug 2022 04:44 PM
'लाल सिंह चड्ढा'नंतर शाहरुखच्या 'पठाण' सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी

Shahrukh Khan Pathaan On Twitter : बॉलिवूडच्या अनेक सिनेमांवर सध्या बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज कोणत्या ना कोणत्या सिनेमावर किंवा कलाकारांवर बहिष्कार टाकला जात आहे. नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'लाल सिंह चड्ढा' आणि अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन' सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. अशातच आता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी 'पठाण'(Pathaan) सिनेमावर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. 





Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचे सत्य येणार यशसमोर

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत परीचा ड्रायव्हर म्हणून नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री झाली आहे. मालिकेच्या आगामी भागात अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचे सत्य यशसमोर येणार आहे. 

प्रेम आणि विश्वासाचं अनोख उदाहरण, 'ती माझी प्रेमकथा' चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

आयुष्यात प्रत्येकजण एकदा का होईना प्रेमात पडतोच. तर प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची भाषा ही निरनिराळी असते, काहींचे प्रेम हे सफल होते, तर काहींना प्रेमात यातना सहन कराव्या लागतात. प्रेमात एक गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे विश्वास, मात्र प्रेमींमधील हा विश्वास डगमगला, तर त्या प्रेमाचे पुढे काय होते हे 'ती माझी प्रेमकथा' (Ti Majhi Premkatha) या प्रेममय चित्रपटातून येत्या 30 सप्टेंबरला प्रेक्षकांसमोर येणार आहे. एकुणच हा चित्रपट फक्त प्रेमकथा नसून, आजच्या तरूण पिढीला एक मोठा संदेश आहे. नुकतेच या चित्रपटाचे रोमँटिक पोस्टर सिनेरसिकांच्या भेटीस आले आहे.

Raju Srivastava : राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर, कुटुंबीयांनी दिली माहिती

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. राजू श्रीवास्तव यांच्या बोटांनंतर आता त्यांच्या खांद्यांचीही हालचाल सुरू झाली आहे. डॉक्टर देखील याला चांगले लक्षण मानत आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत आहोत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत आणि सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. कृपया कोणत्याही अफवा किंवा खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका.’

'लाल सिंह चड्ढा'च्या कमाईचा आकडा घसरला! पाहा दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन

बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर फारच वाईट अवस्था आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी केवळ 7 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई 19 कोटींच्या घरात जाणार आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 12 कोटींचा व्यवसाय केला होता. आमिरच्या आतापर्यंत रिलीज झालेल्या चित्रपटांच्या पहिल्या दिवशी सर्वात कमी कलेक्शन मानले जात आहे.




 


स्वातंत्र्यदिनी प्रसारित होणार एकता कपूरचा नवा शो 'ये दिल मांगे मोर'!

ना केक, ना मेणबत्ती! कुटुंबासोबत निसर्गाच्या सानिध्यात रमत प्राजक्ता माळीने साजरा केला वाढदिवस!

PHOTO : शिमरी ड्रेसमध्ये घायाळ करणाऱ्या अदा, उर्वशी रौतेलाने वाढवला इंटरनेटचा पारा!

अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांना पाठवले खास गिफ्ट, कुटुंबाने मानले आभार!

अमिताभ बच्चन यांनी कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना काही मेसेज पाठवले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांच्या फोनवर मेसेज पाठवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. अमिताभ बच्चन पहिल्या दिवसापासून राजू यांना मेसेज पाठवत होते. पण, राजू यांचा फोन बंद असल्याने कुटुंबीयांना हे मेसेज पाहता आले नाहीत.

मनोरंजन विश्वाची पहिली ‘लेडी सुपरस्टार’, वाचा अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबद्दल...

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आज जरी या जगात नसली, तरी ती चाहत्यांच्या हृदयात नेहमीच जिवंत राहिली आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला होता. आपल्या यशस्वी कारकिर्दीत श्रीदेवीने हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि प्रेक्षकांच्या हृदयात आपली हक्काची जागा निर्माण केली.


 





'लज्जास्पद' आणि 'निंदनीय', सलमान रश्दींवर झालेल्या हल्ल्यावर स्वरा भास्करने व्यक्त केला संताप!

सुप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये जीवघेणा हल्ला झाला आहे. एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या या हल्ल्यात हल्लेखोराने सलमान रश्दी यांच्यावर चाकूने अनेक वार केले गेले. हल्लेखोराला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. आता लेखकावरील हल्ल्यावर अनेक स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने सलमान रश्दी यांच्यावरील प्राणघातक हल्ला निंदनीय असल्याचे म्हटले आहे. स्वराने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आणि लिहिले की, 'सलमान रश्दींसाठी माझ्या प्रार्थना. लज्जास्पद, निषेधार्ह आणि भ्याड हल्ला!’


 





Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल यांनी आमिर खानविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. विनीत जिंदाल यांनी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाबाबत तक्रार दाखल केली आहे. विनीत जिंदाल म्हणाले की, या चित्रपटाने लष्कराचा अपमान केला असून, हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. विनीत यांनी आमिर खान, चित्रपटाचा दिग्दर्शक अद्वैत चंदन आणि पॅरामाउंट पिक्चर्सविरोधात तक्रार दाखल केली आहे.


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा; हाता-पायांची हालचाल करून दिला प्रतिसाद


कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली आहे. राजू श्रीवास्तव आता उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांना नळीद्वारे दूध देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार राजू श्रीवास्तव यांना शुद्धीवर येण्यासाठी काही दिवस लागू शकतात.


हिंदी चित्रपटांसाठी मराठी चित्रपटाचा बळी; मराठी चित्रपटाला स्क्रिन मिळत नसल्याने सुमीत राघवन संतापला


संगीतकार सलील कुलकर्णी आणि अभिनेता सुमीत राघवन यांची मुख्य भूमिका असलेला 'एकदा काय झालं' हा चित्रपट काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला. अनेक मराठी प्रेक्षकांनी या चित्रपटावर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र या चित्रपटाला चित्रपटगृहात स्क्रिन मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात दोघांनी देखील ट्वीट करत खंत व्यक्त केली आहे. हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी जाताना दिसतो, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.


'लाल सिंह चड्ढा'च्या तुलनेत ‘रक्षा बंधन’ पडला मागे! पाहा पहिल्या दिवसाचे कलेक्शन...


बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची थेट टक्कर आमिर खानच्या (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाशी झाली आहे. अक्षय कुमारचे या वर्षी प्रदर्शित झालेले दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाकडून सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या होत्या. चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कित्ती कलेक्शन जमवले, याचा अंदाज लावण्यात आला आहे.


बॉयकॉट ट्रेंडमध्येही ‘लाल सिंह चड्ढा’ची कमाईत बाजी, पहिल्याच दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला!


बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) बहुचर्चित अन् बहु प्रतीक्षित ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा बिग बजेट चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान 4 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ‘लाल सिंह चड्ढा’ या नवीन चित्रपटातून पुनरागमन करत आहे. मात्र, या दरम्यान त्याच्या या चित्रपटावर जोरदार टीका देखील होत आहे. असे, असूनही आमिर खानच्या चाहत्यांना त्याच्या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.


लाल सिंह चड्ढा’चं सोशल मीडियावर कौतुक, टीकेची झोड उठल्यावर गायक राहुल देशपांडेंनी दिले स्पष्टीकरण!


‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रीमियर शोला गायक राहुल देशपांडे यांचे नाव विशेष निमंत्रितांमध्ये सामील होते. त्यानंतर चित्रपटाचं कौतुक करणारी पोस्ट राहुल देशपांडे यांनी लिहिली. त्यावरून टीकेचं लक्ष्य झाल्यानंतर राहुल देशपांडेंनी स्पष्टीकरण दिलंय. आमिर खानने देशातल्या असंहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करून देश सोडण्याबाबतचे वक्तव्य काही वर्षांपूर्वी केले होते. त्यावरून वादही झाला होता. या वादानंतर प्रथमच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची भाषा काही संघटनांनी केली होती.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.