Entertainment News Live Updates 12 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Kranti Redkar : अभिनेत्री, दिग्दर्शिका, उद्योजिका अशा विविध माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणारी क्रांती (Kranti Redkar) नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधत असते. आपल्या आयुष्यातील अनेक छोट्या मोठया गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या मुलींपासून ते नवऱ्यापर्यंतच्या सर्व गोष्टी ती उलगडत असते. मात्र क्रांतीच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजून तिच्या चाहत्यांना माहित नाही.
Satish Kaushik : बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण आलं आहे. कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद रित्या झाल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. तापसणीदरम्यान पोलिसांना काही आक्षेपार्ह औषधं सापडली आहेत. दरम्यान ज्या फार्महाऊसवर कौशिक यांचा मृत्यू झाला त्या फार्महाऊसच्या मालकाच्या पत्नीनेच 15 कोटी रुपयांसाठी सतीश कौशिक यांची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Oscars Awards 2023 : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 'ऑस्कर पुरस्कार' (Oscars Awards) सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेमींचं लक्ष लागलं आहे. आज लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. तर भारतीयांना 13 मार्चला पहाटे साडे पाच वाजल्यापासून हा पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे.
Dhanush Vaathi OTT Release : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषच्या (Dhanush) 'वाथी' (Vaathi) या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
Gautami Patil : महाराष्ट्रासह देशभरात सध्या नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव चर्चेत आहे. आपल्या लावणी आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी आता संगीतक्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'बिग बॉस'फेम (Bigg Boss) उत्कर्ष शिंदेने (Utkarsh Shinde) सोशल मीडियावर गौतमीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
Costa Titch Passes Away : दक्षिण आफ्रिकेचा (South Africa Rapper) लोकप्रिय गायक, रॅपर कोस्टा टिच (Costa Titch) याचे कॉन्सर्टदरम्यान निधन झाले आहे. गाणं गात असतानाच रॅपर मंचावर कोसळला. वयाच्या 27 व्या वर्षी कोस्टा टिचने अखेरचा श्वास घेतला आहे. रॅपरच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहते भावूक झाले आहेत.
Madhuri Dixit Mother Snehlata Dixit Passed Away : अभिनेत्री माधुरी दीक्षितची (Madhuri Dixit) आई स्नेहलता दीक्षित (Snehlata Dixit) यांचं आज निधन झालं आहे. अभिनेत्री माधुरीवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. आई स्नेहलता यांचं आज सकाळी 8.40 वाजता निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. माधुरी दीक्षितची आई स्नेहलता यांच्या पार्थिवावर मुंबईत दुपारी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. आज दुपारी 3 वाजता वरळी येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Kamlakar Nadkarni : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन
Kamlakar Nadkarni : प्रसिद्ध नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे आज रात्रीनिधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. मुंबईतील गोरेगाव येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 88 वर्षांचे होते. मागील अनेक दशकांपासून ते नाट्य समीक्षण करत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने त्यांना 2019 साली जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. धो धो बरसणाऱ्या पावसासारखी नाट्य समीक्षा लिहिणारे, नाट्यवेडे अशी त्यांची ओळख होती.
'आशेच्या भांगेची नशा भारी... 'घर, बंदूक, बिरयानी'मधल्या गाण्याला मोहित चौहानच्या आवाजाचा तडका
'घर, बंदूक, बिरयानी' (Ghar Banduk Biryani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत या सिनेमातील 'गुन गुन' आणि 'आहा हेरो' ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. आता लवकरच या सिनेमाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित होणार आहे. 'आशेच्या भांगेची नशा भारी... घर, बंदूक, बिरयानी...' असे या गाण्याचे बोल असून हे गाणं बॉलिवूडचे लोकप्रिय गायक मोहित चौहान यांनी (Mohit Chauhan) गायलं आहे.
बॉक्स ऑफिसवर रणबीर-श्रद्धाच्या 'तू झूठी मैं मक्कार'ची गाडी सुसाट
Tu Jhoothi Main Makkaar : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 8 मार्चला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे.'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 15.73 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 10.34 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 10.52 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 36.59 कोटींचा गल्ला जमवला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -