Entertainment News Live Updates 08 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 08 Mar 2023 07:02 PM
Gumraah : अंगावर शहारे आणणारा 'गुमराह'चा टीझर रिलीज

Aditya Roy Kapur Gumraah Teaser Out : बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) सध्या 'द नाइट मॅनेजर' (The Night Manager) या सिनेमामुळे चर्चेत आहे. अशातच त्याच्या आगामी 'गुमराह' (Gumraah) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या सिनेमातील आदित्य रॉय कपूरची भूमिका प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारी आहे. 





Aaliya Siddhiqui : आलियाने पुन्हा नवाजुद्दीन सिद्दीकीवर केले गंभीर आरोप

Aaliya Siddhiqui On Nawazuddin Siddhiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddhiqui) सध्या चर्चेत आहे. पत्नी आलियाने (Aaliya Siddhiqui) नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अभिनेत्याने ट्वीट करत या आरोपांवर मौन सोडलं. आता आलिया पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवाजच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. आलिया म्हणाली,"नवाज खरं बोलला असता तर त्याने न्यायालयात त्याच्या बॅंक अकाऊंट स्टेटमेंट सादर केले असते". 





Sonalee Kulkarni : 'जागतिक महिला दिना'निमित्त सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट

Sonalee Kulkarni On International Womens Day : मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' (Mogal Mardini Chatrapati Tararani) या सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान आज जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day) सोनालीने एक लक्षवेधी पोस्ट केली आहे. स्वत:साठी नाही तर आपल्या माणसांसाठी लढणाऱ्या स्त्रियांना समर्पित पोस्ट सोनालीने केली आहे. 





Drishyam 3 : 'दृश्यम 3'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार

Drishyam 3 : 'दृश्यम' (Drishyam) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमाचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. त्यामुळे या सिनेमाचा तिसरा भाग कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आता या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहनलाल (Mohanlal) सध्या 'दृश्यम 3' (Drishyam 3) या सिनेमावर काम करत आहे. 





अमूलकडून दीपिकाला कौतुकाची थाप; शेअर केली खास पोस्ट

Deepika Padukone: बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केल्यानंतर आता दीपिका पादूकोण (Deepika Padukone) जगभरातील प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. तिनं काही दिवसांपूर्वी कतारमध्ये फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्याला हजेरी लावली होती. तसेच ती कान्स फेस्टिव्हलची ज्युरी मेंबर देखील होती. आता ती लवकरच ऑस्कर-2023 पुरस्कार सोहळ्यात प्रेजेंटर म्हणून उपस्थित राहणार आहे. आता दीपिकासाठी अमूल कंपनीनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. 



Avatar The Way Of Water : निळ्या विश्वाची जादू आता घरबसल्या पाहा; 'अवतार द वे ऑफ वॉटर' ओटीटीवर होणार रिलीज

Avatar The Way Of Water : 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) या सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यास सज्ज आहे. त्यामुळे निळ्या विश्वाची जादू प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार आहे. पण भारतीय सिनेप्रेक्षकांना मात्र घरबसल्या हा सिनेमा पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 





Amitabh Bachchan Health Update : अमिताभ बच्चन यांची प्रकृती कशी आहे? जाणून घ्या...

Amitabh Bachchan Health Update : अमिताभ बच्चन यांनी  लिहिलं आहे,"गंभीर दुखापत झाल्यानंतर चिंता व्यक्त करणाऱ्या सर्व चाहत्यांचे खूप खूप आभार. प्रकृतीत सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं व्हायला थोडा वेळ लागेल. डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आराम करत आहे. बरगड्यांना इजा झाल्याने छातीवर पट्ट्या लावल्या आहेत. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात करेन...सर्वांचे खूप खूप आभार". 

Pawan Singh: भर कार्यक्रमामध्ये पवन सिंहला फेकून मारला दगड; अभिनेता भडकला, व्हिडीओ व्हायरल

Pawan Singh Stage Show Incident Video Going Viral: हिंदी,भोजपुरी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांनी काल (7 मार्च) धुलिवंदनच्या शुभेच्छा दिल्या. विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन सेलिब्रिटींनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. भोजपुरी अभिनेता आणि गायक पवन सिंहनं (Pawan Singh) देखील एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. यावेळी प्रेक्षकांमधील एका व्यक्तीनं पवन सिंहला दगड फेकून मारला. त्यानंतर पवन भडकला. कार्यक्रमामधील पवन सिंहचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 



Tu Jhoothi Main Makkaar Leaked: श्रद्धा आणि रणबीरच्या चित्रपटाला मोठा फटका; रिलीज झाल्यानंतर काही तासातच 'तू झूठी मैं मक्कार' लीक

Tu Jhoothi Main Makkaar Leaked: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  आणि अभिनेत्री श्रद्धा कापूर (Shraddha Kapoor) यांच्या 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आज (8 मार्च) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाच्या तिकीटांची अॅडव्हान्स बुकिंग अनेकांनी केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, असा अंदाज लावला जात आहे. पण आता या चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. कारण हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. हा चित्रपट लीक झाल्याचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर परिणाम होईल, असं म्हटलं जात आहे. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Swara Bhaskar Wedding Party Card: 'इन्कलाब जिंदाबाद' आणि 'हम सब एक है'; स्वरा आणि फहादच्या वेडिंग पार्टी कार्डवर काय लिहिलंय? पाहा व्हायरल फोटो


Swara Bhaskar Wedding Party Card: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  स्वरा भास्कर  (Swara Bhasker) ही फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) विवाहबद्ध झाली. 16 फेब्रुवारीला स्वरा आणि फहाद यांनी कोर्ट मॅरेज केले. आता लवकरच स्वरा आणि फहाद यांची वेडिंग पार्टी आयोजित करण्यात येणार आहे. स्वरा आणि फहाद यांच्या वेडिंग पार्टीची सध्या तयारी सुरु आहे. या दोघांच्या वेडिंग पार्टी कार्डचा फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये काही स्लोगन लिहिलेले दिसत आहेत. स्वरा आणि फहाद यांच्या वेडिंग कार्डच्या व्हायरल फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले.  














Anushka Sharma At Childhood Home: 'वडिलांसोबत स्कूटरवर फिरायचे'; अनुष्कानं दिला आठवणींना उजाळा, शेअर केली खास पोस्ट


Anushka Sharma At Childhood Home:  अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) हे काही दिवसांपूर्वी उज्जैनमधील महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिराच्या आवारातील विराट आणि अनुष्काचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता नुकतीच अनुष्कानं एक पोस्ट शेअर करुन मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) आठवणींना उजाळा दिला. अनुष्कानं नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली. अनुष्का बालपणी ज्या घरात राहात होती, त्या घराचे काही फोटो अनुष्कानं शेअर केले. 














Shubman Gill Crush: सारा अली खान नाही तर 'या' अभिनेत्रीला पाहिल्यानंतर शुभमन गिल झाला क्लिन बोल्ड; क्रिकेटरनं सांगितलं क्रशचं नाव


Shubman Gill Crush: क्रिकेटर  शुभमन गिल (Shubman Gill) आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे.  तसेच, शुभमनचं नाव अनेक नेटकरी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत (Sara Tendulkar) देखील जोडत आहेत. आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये  शुभमननं त्याच्या क्रशचं नाव सांगितलं आहे. शुभमनची क्रश ही सारा अली खान किंवा सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) नसून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 








 






 



































- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.