Entertainment News Live Updates 06 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 06 Apr 2023 02:36 PM
Bipasha-Karan Revealed Daughter Face: बिपाशा बासूच्या लेकीची पहिली झलक; सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

Bipasha-Karan Revealed Daughter Face:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) यांच्या घरी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये चिमुकलीचं आगमन झाले. बिपाशा आणि करण यांनी त्यांच्या मुलीचं नाव देवी (Devi) असं ठेवलं. बिपाशा आणि करण यांनी देवीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण या फोटोंमध्ये देवीचा चेहरा दिसत नव्हता. आता बिपाशानं देवीचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पहिल्यांदाच देवीचा चेहरा बिपाशाच्या चाहत्यांना बघायला मिळत आहे. 



Salaar Release Date : प्रभासचा 'सालार' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Prabhas Salaar Movie Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार 'प्रभास' (Prabhas) सध्या त्याच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान त्याच्या आगामी 'सालार' (Salaar) या सिनेमाची रिलीज डेटदेखील आता समोर आली आहे. 'सालार' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





Armaan Malik Kritika Malik Baby: युट्यूबर अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीनं दिली गोड बातमी; सोशल मीडियावर शेअर केला फोटो

Armaan Malik Kritika Malik Baby:  प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. कृतिका आणि पायल या आरमानच्या दोन पत्नी आहेत. कृतिका ही अरमानची दुसरी पत्नी असून त्याची पहिली ही पायल आहे. त्यामधी कृतिका मलिकनं (Kritika Malik) नुकत्याच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अरमाननं सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर करुन ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे. 



Parineeti Chopra Raghav Chadha : दिल्ली नव्हे लंडनमध्ये होणार परिणीती-राघव यांचा साखरपुडा

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही दिवसांपासून आपचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबतच्या रिलेशनमुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असून येत्या 10 एप्रिलला लंडनमध्ये (London) त्यांचा साखरपुडा होणार आहे. 





Phakaat Teaser: 'फकाट' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज; हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे प्रमुख भूमिकेत

 Phakaat Teaser: प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव (Shreyash Jadhav) यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा एक भन्नाट चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'फकाट' (Phakaat) या आगळ्यावेगळ्या नावाचा चित्रपट हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा घालायला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नुकतेच या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले आहे. वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित, 19 एप्रिल रोजी चित्रपटगृहात झळकणाऱ्या या 'फकाट' च्या निमित्ताने हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि सुयोग गोऱ्हे (Suyog Gorhe) ही जोडगोळी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. याशिवाय या चित्रपटात अविनाश नारकर, नितीश चव्हाण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 



Padma Shri Award : रवीना टंडन आणि एमएस कीरावनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

Ravina Tandon And MM Keeravani Gets Padma Shri Award : पद्म पुरस्कारांची (Padma Shri Award) घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दिल्लीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. यंदा सिनेसृष्टीतील योगदानासाठी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Ravina Tandon) आणि ऑस्कर विजेत्या 'आरआरआर' (RRR) सिनेमातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याचे संगीतकार एमएम कीरावनी (MM Keeravani) यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  

Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमातील हनुमानाचा लुक आऊट

Adipurush : आज हनुमान जयंती निमित्त 'आदिपुरुष' सिनेमातील हनुमानाचा लुक आऊट करण्यात आला आहे. 'आदिपुरुष' या सिनेमात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे.





Golden Globe Award : अभिमानास्पद! 'गोल्डन ग्लोब' पुरस्कारासाठी मतदार म्हणून Narendra Bandabe यांची निवड!

Golden Globe Award : 'गोल्डन ग्लोब' पुरस्कार (Golden Globe Award) हा जगभरातील एक प्रमुख सिनेपुरस्कार सोहळा आहे. आता या जागतिक पातळीवरील पुरस्कारासाठी मुंबईचे पत्रकार नरेंद्र बंडबे (Narendra Bandabe) यांची निवड झाली आहे. जागतिक स्तरावरील सिनेमांवर मराठीतून लिहिणारे आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी मतदान करणारे ते एकमेव मतदार आहेत. 



Gautami Patil : 'त्या' विकृत घटनेनंतर व्हॅनिटी व्हॅन वापरण्याची आली वेळ : गौतमी पाटील

Gautami Patil : 'सबसे कातील गौतमी पाटील' अशी अल्पावधीत ओळख मिळवलेली आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या गौतमी पाटीलला (Gautami Patil) याचे फायदे आणि तोटेही सहन करावे लागत आहेत. दररोज वेग-वेगळ्या कारणाने गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकते. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि या घृणास्पद घटनेने गौतमीला धक्काच बसला. आता या विकृत घटनेनंतर तिच्यावर व्हॅनिटी व्हॅन वापरण्याची वेळ आली आहे. 


पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Salman Khan: जीवे मारण्याची धमकी, सलमान खानने अखेर मौन सोडलं, म्हणाला...


Salman Khan On Death Threat: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याला मागील काही महिन्यांपासून जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. या प्रकरणावर सलमान खानने पहिल्यांदाच मौन सोडत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सलमान खान याने या प्रकरणावर आधी भाष्य केले नव्हते. मात्र, त्याने धमकीबाबत थेट प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. 'एबीपी'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची उघडपणे धमकी दिली.  आमच्या भागात सलमान खानने काळवीट मारल्याचे लॉरेन्सने म्हटले होते. त्याला आमच्या बिकानेरच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल. जर त्याने माफी मागितली नाही तर मी त्याला योग्य उत्तर देईन. मी सध्या गुंड नाही, पण सलमान खानला मारल्यावर गुंडा बनेन, असेही लॉरेन्स म्हणाला होता. 


Malaika Arora: दुसऱ्यांदा लग्न करणार का? मलायका म्हणते, 'याबद्दल मी...'


Malaika Arora: बॉलिवूडची ‘मुन्नी’ अशी ओळख असणारी अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकते. कधी तिची फॅशन स्टाईल, तर कधी अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सोबतच्या नात्यामुळे मलायका ही चर्चेत असते. सध्या ती प्रोफेशन लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्यांदा लग्न करणार की नाही? याबाबत नुकत्याच एका मुलाखतीत मलायकानं सांगितलं. दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या निर्णयाबाबत मलयाकानं मुलाखतीत सांगितलं, 'हो, मी याबद्दल विचार केला आहे. माझा प्रेमावर विश्वास आहे. पण मी पुन्हा लग्न केव्हा करणार याचे उत्तर मला लगेच देता येणार नाही, कारण मला काही गोष्टींबाबत सरप्राईज ठेवायचं आहे. सगळ्या गोष्टी आधी सांगितल्यानं त्यात मजा राहात नाही.' 


Bholaa Box Office Collection : अजयच्या 'भोला'ची छप्परफाड कमाई सुरूच; 50 कोटींचा टप्पा केला पार


Ajay Devgn Bholaa Box Office Collection Day 6 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बूचा (Tabu) 'भोला' (Bholaa) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 30 मार्चला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.