Entertainment News Live Updates 04 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 04 May 2023 05:00 PM
Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धच्या विचित्र वागण्यामुळे संजनाचा राग अनावर; 'आई कुठे काय करते !'च्या प्रोमोनं वेधलं लक्ष

Aai Kuthe Kay Karte  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमध्ये वेगवेगळे ट्वीस्ट येत असतात.  'आई कुठे काय करते !' या मालिकेमध्ये आता संजना आणि अनिरुद्धचं भांडण झालं आहे. नुकताच आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, संजना आणि अनिरुद्ध हे एकमेकांसोबत भांडण करत आहेत. 



Tuzech Mi Geet Gaat Aahe: उर्मिला कोठारेनं 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ केला शेअर; म्हणाली, 'ये नाइंसाफी हैं या....'

Tuzech Mi Geet Gaat Aahe: छोट्या पडद्यावरील तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या मालिकेत अभिनेत्री  उर्मिला कोठारे (Urmilla Kothare) ही मंजुळा ही भूमिका साकारते. नुकताच मंजुळा म्हणजेच ऊर्मिलानं तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे. या  व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



Deepika Padukone and Katrina Kaif: यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील आगामी चित्रपटात कतरिना आणि दीपिका करणार काम? नेटकरी म्हणाले, 'रणबीर व्हिलन...'

Deepika Padukone and Katrina Kaif: यशराज फिल्म्सने हिंदी फिल्म इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. काही स्पाय थ्रिलर चित्रपटाची निर्मीती देखील यशराज  फिल्म्स बॅनरने केली आहे. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाची निर्मिती देखील  यशराज फिल्म्सनं केली. आता यशराज  फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समध्ये अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांची एन्ट्री झाली आहे. यशराज फिल्म्स  हे लवकरच फिमेल सेंट्रिक स्पाय फिल्मची निर्मिती करणार आहेत, असं म्हटलं जात आहे. फिल्म्सच्या स्पाय फिल्ममध्ये दीपिका आणि कतरिनाला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण याबाबत यशराज  फिल्म्सनं कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 





Parineeti Chopra Raghav Chadha : 'आप' चे नेते राघव चढ्ढा आणि परिणीतीनं एकत्र पाहिली आयपीएल मॅच; फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'जेव्हा राजकारण आणि बॉलिवूड....'

Parineeti Chopra Raghav Chadha : आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra)  हे बुधवारी (3 मे) मोहाली येथे पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील आयपीएल 2023 (IPL 2023) चा सामना पाहताना दिसले.  राघव चढ्ढा आणि परिणीती हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून चर्चा सोशल मीडियावर होत आहे. लवकरच हे दोघे लग्न करणार आहेत, असंही म्हटलं जात आहे. आता राघव चढ्ढा आणि परिणीतीचे मोहाली येथील स्टेडियममधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 



Swapnil Mayekar: लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांचे निधन

Swapnil Mayekar: मराठी पाऊल पडते पुढे ह्या उद्या प्रदर्शित होणार्‍या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांचे दु:खद निधन. गेले काही महिने ते आजारी होते. हा त्यांचा स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा होता.



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Alia Bhatt Get Mistaken For Aishwarya Rai: मेट गाला इव्हेंटमध्ये फोटोग्राफर्सचं झालं कन्फ्यूजन; आलियाला म्हणाले 'ऐश्वर्या'; व्हिडीओ होतोय व्हायरल




Met Gala 2023: मेट गाला 2023 (Met Gala 2023) हा इव्हेंट काही दिवसांपूर्वी पार पडला. या इव्हेंटमध्ये हॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली. अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) या बॉलिवूड अभिनेत्रींनी मेट गाला या इव्हेंटसाठी खास लूक केला होता. त्यांच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. आलिया भट्टनं प्रथमच मेट गाला या इव्हेंटला हजेरी लावली होती. मेट गाला इव्हेंटच्या रेड कार्पेटवरील आलियाचा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला. पण आलिया ही सध्या  या मेट गाला इव्हेंटमधील लूकमुळे नाही तर या इव्हेंटमधील एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. 

 

Kon Honar Crorepati : मनासारखं जगायचं असेल, तर आता मागे नाही राहायचं! 'कोण होणार करोडपती' होणार सुरू

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या बहुचर्चित कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच सुरू होणार आहे. नव्या पर्वाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे. गेल्या महिन्यात या कार्यक्रमाच्या सहभाग प्रक्रियेला सुरुवात झाली होती. एक मिस्डकॉल द्या आणि एक कोटी रुपये जिंका असं म्हणत या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला होता.


OTT Release This Week : 'तू झूठी मैं मक्कार' ते 'विक्रम वेधा'; 'या' प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी



OTT Release This Week : मे (May) महिन्याचा पहिला आठवडा खूपच मनोरंजनात्मक असणार आहे. या आठवड्यात अनेक दर्जेदार सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. अॅक्शन, रोमान्स, विनोद अशा वेगवेगळ्या जॉनरच्या कलाकृती या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkar) या सिनेमासह 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) पर्यंत या सिनेमाचा समावेश आहे. 






- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.