Entertainment News Live Updates 03 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 03 Apr 2023 05:57 PM
Ishaan Khatter Hollywood Debut: ईशान खट्टरला मिळाली हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी; निकोल किडमॅनसोबत शेअर करणार स्क्रिन

Ishaan Khatter Hollywood Debut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) भाऊ ईशान खट्टर (Ishaan Khatter) लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ईशानला निकोल किडमॅन आणि लिव्ह श्रेबर यांच्यासोबत 'द परफेक्ट कपल' या प्रोजेक्टमध्ये कास्ट करण्यात आले आहे. ईशाननं त्याच्या या नव्या हॉलिवूड प्रोजेक्टची माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे.



Nayanthara Twins Name: नयनतारानं खास अंदाजात सांगितली जुळ्या मुलांची नावं; व्हिडीओ व्हायरल

Nayanthara Twins Kids Name: सुपरस्टार  नयनतारा  आ(Nayanthara) आणि विग्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी 9 जून 2022 रोजी लग्नगाठ बांधली होती. चेन्नईत झालेल्या ग्रँड लग्न सोहळ्यानंतर हे जोडपे विशेष चर्चेत होते. आता लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतरच, दोघांनीही चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. नयनतारा आणि विग्नेश ही जोडी जुळ्या मुलांची पालक झाली. आता नयनतारानं एका कार्यक्रमामध्ये तिच्या जुळ्या मुलांची नावं चाहत्यांना सांगितली आहेत. 



Sir Madam Sarpanch : 'सर मॅडम सरपंच'चा ट्रेलर आऊट

Sir Madam Sarpanch Movie : 'सर मॅडम सरपंच' (Sir Madam Sarpanch) हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. या सिनेमात सीमा बिस्वास (Seema Biswas) आणि एरियाना सजनानी (Ariana Sajnani) मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा येत्या 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 





Bharti Singh Son Laksh Birthday : भारती सिंहचा लाडोबा झाला एक वर्षाचा; कॉमेडी क्वीनने शेअर केले गोलाचे गोड फोटो

Bharti Singh Son Laksh Birthday : कॉमेडी क्वीन भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष लिम्बाचियाचा (Harsh Limbachiyaa) लाडोबा अर्थात लक्ष्यचा (Laksh Limbachiyaa) आज पहिला वाढदिवस आहे. लाडक्या लेकाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त भारती सिंहने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. तिने गोलाचे गोड फोटो शेअर करत त्याला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.



Purshottam Berde : 'सुमी आणि आम्ही' नाटक लवकरच येणार रंगभूमीवर; पुरुषोत्तम बेर्डे नऊ वर्षांनी करणार नाट्य दिग्दर्शन

Purshottam Berde New Marathi Drama : लेखक, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार, नेपथ्यकार आणि चित्रकार अशा विविध भूमिकांमधून सर्जनशील मुशाफिरी करणारे ज्येष्ठ कलाकर्मी पुरुषोत्तम बेर्डे (Purshottam Berde) यांचे कलाक्षेत्रातील योगदान मोठे आहे. कलेच्या वेगवेगळया माध्यमातून व्यक्त होताना पुरुषोत्तम बेर्डे यांच्या प्रत्येक कलाकृतीवर त्यांच्या दांडग्या अभ्यासाची आणि सर्जनशीलतेची किनार दिसून आली आहे. अशा या हुकमी दिग्दर्शकाचे 'सुमी आणि आम्ही' (Sumi Ani Aamhi) हे नवं नाटकं रंगभूमीवर येत आहे. विशेष म्हणजे या नाटकाद्वारे तब्ब्ल नऊ वर्षांनी ते नाटयदिग्दर्शन करत आहेत. नाटकाच्या संगीत, नेपथ्याची जबाबदारीदेखील तेच सांभाळणार आहेत.

Priyanka Chopra: 65 वर्षांपूर्वीच्या साडीपासून बनलाय प्रियांकाचा हा ड्रेस; तयार करण्यासाठी लागले सहा महिने, जाणून घ्या खासियत

Priyanka Chopra: बॉलिवूडची 'देसी गर्ल'  प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांका आणि तिचा पती निक जोनास यांनी 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या भव्य उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली.  दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रियांकानं तिच्या ग्लॅमरस लूकने अनेकांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी प्रियांकानं विंटेज ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस 65 वर्षांपूर्वीच्या साडीपासून तयार करण्यात आला आहे. प्रियांकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या ड्रेसच्या खास गोष्टींबाबत सांगितलं. या पोस्टच्या माध्यमातून तिनं ड्रेस डिझायनरचे देखील आभार मानले. 



Parineeti Chopra : "राजकीय नेत्याशी लग्न..."; खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान परिणीती चोप्राचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Parineeti Chopra Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) सध्या लग्नाच्या चर्चांमुळे चर्चेत आहेत. दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान परिणीतीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 'जबरिया जोडी'च्या प्रमोशनदरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती म्हणतेय,"मी कधीच कोणत्या राजकीय नेत्यासोबत लग्न करणार नाही".



Rishi Singh : 'Indian Idol 13' चं विजेतेपद पटकावल्यानंतर ऋषी सिंहने व्यक्त केली इच्छा; म्हणाला, 'मला नेहा कक्करसारखं...'

Rishi Singh : विजेतेपद पटकावल्यानंतर एका मुलाखतीत ऋषी सिंह म्हणाला,"इंडियन आयडॉल 13'मध्ये सहभागी होतानाच या पर्वाचा विजेता होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. या कार्यक्रमाने मला नवी ओळख दिली आहे. माझ्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. या पर्वातील सर्वच स्पर्धक एका पेक्षा एक होते. पण या सर्वांना मागे टाकत अखेर मी या पर्वाचा विजेता झालो".





Salman Khan : सलमान खानच्या फोटोवर चाहते फिदा; म्हणाले,"बॉलिवूडची शान भाईजान"

Salman Khan Photo : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या धमकीप्रकरणामुळे चर्चेत आहे. अशातच दबंग खानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. सिनेमांसह त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे याची चाहत्यांना उत्सुकता असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांना संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. 





Indian Idol 13 Winner : ऋषी सिंहने कोरले 'इंडियन आयडॉल 13'च्या ट्रॉफीवर नाव


Indian Idol 13 Winner Rishi Singh : 'इंडियन आयडॉल 13'चा (Indian Idol 13) महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे. यंदाच्या पर्वाचा विजेता कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. अखेर अयोध्येच्या ऋषी सिंहने (Rishi Singh) 'इंडियन आयडॉल 13'च्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Shiv Thakare : 'आपल्या माणसा'ची बातच न्यारी; छोटा पडदा गाजवल्यानंतर मोठा पडदा गाजवण्यासाठी शिव ठाकरे सज्ज!


Shiv Thakare : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या चर्चेत आहे. 'बिग बॉस'च्या माध्यमातून छोटा पडदा गाजवल्यानंतर शिव ठाकरे (Shiv Thakare) आता मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. शिव ठाकरे आता एका मराठी सिनेमात झळकणार असल्याची बातमी समोर आली आहे. 'आपला माणूस' शिव ठाकरेचा मोठा चाहतावर्ग आहे. 'मराठी बिग बॉस'चा विजेता असलेल्या शिवला आजवर एकाही मराठी सिनेमासाठी विचारणा झाली नव्हती. हिंदी बॉसमध्ये सहभागी होण्याची शिवची इच्छा होती. 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) माध्यमातून शिवची ही इच्छा पूर्ण झाली आहे. तसेच मराठी सिनेमात मुख्य भूमिकेत झळकण्याचं शिवचं स्वप्नदेखील पूर्ण झालं आहे.


Circuitt : आयपीएलच्या प्लॅटफॉर्मवर प्रमोशन करणारा 'सर्किट' हा पहिलाच मराठी सिनेमा


Circuitt Marathi Movie : आयपीएलचा (IPL 2023) फिवर सुरू झाला आहे. तर दुसरीकडे 'सर्किट' (Circuitt) या सिनेमाची जोरदार हवा आहे. आयपीएल आणि टीम 'सर्किट' एकत्र आले ते प्री मॅच सेशनमध्ये. या निमित्तानं पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचं आयपीएलमध्ये प्रमोशन झालं हे विशेष. 


Badshah Wedding : रॅपर बादशाह दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर


Badshah Wedding Update : लोकप्रिय गायक आणि रॅपर बादशाह (Badshah) सध्या चर्चेत आहे. रॅपर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. गर्लफ्रेंड ईशा रिखीसोबत (Isha Rikhi) बादशाह लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. बादशाह गेल्या अनेक दिवसांपासून ईशाला डेट करत आहे. दोघांचं एमकेमांवर प्रेम असून आता ते लग्नबंधनात अडकणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, बादशाह आणि ईशा याच महिन्यात लग्न करणार आहेत. अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही. पण बादशाहसोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.