Entertainment News Live Updates 02 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 02 Mar 2023 02:52 PM
Sagar Karande : विनोदवीर सागर कारंडेचा 'चला हवा येऊ द्या'ला रामराम; सूत्रांनी दिली माहिती

Sagar Karande Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून सागर कारंडे (Sagar Karande) हे नाव घराघरांत पोहोचलं आहे. आजवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सागरने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. पण आता सागरने 'चला हवा येऊ द्या' या बहुचर्चित कार्यक्रमाला रामराम केल्याची बातमी समोर आली आहे. 

Khela Hobe Review : नाजूक विषयाला हात घालणारा 'खेला होबे'; ओम पुरी यांचा शेवटचा सिनेमा

Khela Hoba Review : निवडणूक कोणतीही असो, जिंकण्यासाठी फोकस असलाच पाहिजे. निवडणूक मोठी असेल तर अर्थात लोकांनाही त्यात मजा येते. 'खेला होबे' (Khela Hobe) हा सिनेमादेखील अशाच एका निवडणुकीवर आधारित आहे. सहा वर्षांपूर्वी बनलेला हा सिनेमा अखेर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिवंगत अभिनेते ओम पुरी (Om Puri) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 


Khela Hobe Review : नाजूक विषयाला हात घालणारा 'खेला होबे'; ओम पुरी यांचा शेवटचा सिनेमा

Rakhi Sawant : 'राउडी राखी' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Rakhi Sawant : राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान राखीच्या नव्या सिनेमाची घोषणा तिच्या भावाने राकेशने केली आहे. 'ड्रामाक्वीन'च्या आगामी सिनेमाचं नाव 'राउडी राखी' (Rowdy Rakhi) असं असणार आहे. या सिनेमात राखी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती राखीचा भाऊ राकेश करणार आहे. 

Abhijeet Bichukale : आतापर्यंत 47 मतं, एकाही फेरीत 3 पेक्षा जास्त मतं नाहीत, अभिजीत बिचुकलेंचा निकाल लागला!

Abhijeet Bichukale Anand Dave Kasba Bypoll Results : कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला (Kasba Bypoll Results) आज सकाळी सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कसबा निवडणुकीत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आघाडीवर असून त्यांच्या आघाडीपेक्षा  अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) आणि आनंद दवे (Anand Dave) यांना पडलेल्या मतांची चर्चा जास्त रंगली आहे.


Abhijeet Bichukale : आतापर्यंत 47 मतं, एकाही फेरीत 3 पेक्षा जास्त मतं नाहीत, अभिजीत बिचुकलेंचा निकाल लागला!

Bhuban Badyakar : 'कच्चा बदाम' फेम भुबन बडायकरच्या अडचणीत वाढ

Bhuban Badyakar : 'बदाम...बदाम...कच्चा बदाम' या गाण्याने गेल्या काही दिवसांपूर्वी धुमाकूळ घातला असून या गाण्याने भुबन बडायकर (Bhuban Badyakar) रातोरात स्टार झाला. पण आता भुबनच्या अडचणीत वाढ झाली आहे. ज्या गाण्याने भुवनला लोकप्रियता मिळवून दिली त्याच गाण्याने त्याला आता अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

Happy Birthday Tiger Shroff : एका सिनेमासाठी टायगर श्रॉफ घेतो कोट्यवधींचं मानधन; जाणून घ्या 'अॅक्शन हीरो'च्या कमाईबद्दल...

Tiger Shroff : टायगर श्रॉफ सिनेमे आणि जाहिरातींच्या माध्यमातून चांगलीच कमाई करतो. एका सिनेमासाठी 'अॅक्शन हीरो' 8 कोटी मानधन घेतो. तर एका जाहिरातीचे तो दोन-तीन कोटी घेतो. वर्षभरात टायगर 12 कोटींची कमाई करतो. त्याची एकूण संपत्ती 81 कोटी आहे. आलिशान घरासोबत अनेक महागड्या गाड्यादेखील त्याच्याकडे आहेत. 





Gauri Khan : शाहरुखची पत्नी गौरी खानवर गुन्हा दाखल

Gauri Khan FIR : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shah Rukh Khan) पत्नी गौरी खानवर (Gauri Khan) गुन्हा दाखल झाला आहे. लखनौच्या (Lucknow) सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात 409 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत राहणाऱ्या किरीट जयवंत शहा यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. 

Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनने शेअर केला 'भूल भुलैया 3'चा टीझर

Kartik Aaryan Bhool Bhulaiyaa 3 Teaser Released : बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) पुन्हा एकदा रुह बाबाच्या (Rooh Baba) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. 'भूल भुलैया 2' नंतर चाहते या सिनेमाच्या पुढल्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान कार्तिकने 'भूल भुलैया 3'चा (Bhool Bhulaiyaa 3) टीझर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'भूल भुलैया 3'ची घोषणा केली आहे. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


हम मजदूर हैं , इस लिए मजबूर हैं.! कपिल शर्मा डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत, Zwigato चा ट्रेलर लाँच


Zwigato Trailer : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कपिल शर्माच्या आगामी ‘झ्विगॅटो’ (Zwigato) या चित्रपटाचे ट्रेलर रिलिज झाले आहे.  या चित्रपटातील कपिल शर्मा डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा लूक आधीच रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात कपिल शर्माची वेगळी शैली पाहायला मिळणार आहे.


Tiger 3 Viral Video: सलमानच्या 'टायगर 3' च्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल


Tiger 3 Viral Video : बॉलिवूडमधीस प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या टायगर-3 (Tiger 3) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता इमरान हाश्मी देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इमरान हाश्मी (Emraan Hashmi) हा डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. 


Farhan Akhtar: फरहान अख्तरवर भडकले नेटकरी


Farhan Akhtar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) हा जगभरातील विविध शहरांमध्ये आपल्या बँडसोबत परफॉर्म करतो. काही दिवसांपूर्वी 'फरहान लाईव्ह' या फरहानच्या बँडच्या लाईव्ह प्रोग्रॅमचे आयोजन ऑस्ट्रेलियामधील सिडनी आणि मेलबर्न येथे करण्यात आले होते. पण ऑस्ट्रेलियामधील हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. फरहानने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माहिती दिली. फरहानचा 'फरहान लाईव्ह' हा बँड प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या कॉलेज फेस्टिव्हलमध्ये तसेच म्युझिक इव्हेंटमध्ये 'फरहान लाईव्ह' बँड परफॉर्म करतात. काही दिवसांपूर्वी फरहानच्या 'फरहान लाईव्ह' या बँडने पुण्यामध्ये परफॉर्म केलं. 'फरहान लाईव्ह' या बँडच्या लाइव्ह परफॉर्मन्सचं आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलं. पण हा लाईव्ह प्रोग्रॅम रद्द करण्यात आला. फरहानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबद्दल माहिती दिली. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.