Bigg Boss Marathi 4 Live Updates : 'बिग बॉस मराठी 4'च्या ग्रँड प्रीमिअरला सुरुवात; जाणून घ्या बिग बॉस संबंधित सर्व अपडेट्स एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Bigg Boss Marathi 4 Live Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात डॉ. रोहित शिंदे सहभागी होणार आहे. रोहित हा रुचिरा जाधवचा बॉयफ्रेंड आहे. पण त्याला मॉडेलिंगची देखील विशेष आवड आहे. त्याने ‘मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल’साठी मॉडेलिंग केलं आहे.
Bigg Boss Marathi 4 Live Updates : इतिहासात पहिल्यांदाच बिग बॉस मराठीचा चाहता बिग बॉसच्या घरात गेला आहे. त्रिशूल मराठे आता बिग बॉसचा खेळ खेळण्यासाठी सज्ज आहे.
Bigg Boss Marathi 4 Live Updates : लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनी बिग बॉस गाजवल्यानंतर आता प्रसिद्ध लोककलावंत, लावणीक्वीन मेघा घाडगे बिग बॉस मराठीचं चौथं पर्व गाजवायला सज्ज आहे.
Bigg Boss Marathi 4 Live Updates : डान्सच्या दुनियेतला सुपरस्टार विकास सावंत आता 'बिग बॉस 4'मध्ये झळकणार आहे.
Bigg Boss Marathi 4 Live Updates : पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख आणि मुंबईची ऑटो राणी यशश्री मसुरकरची बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात एन्ट्री झाली आहे. दोघींमध्ये कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
Bigg Boss Marathi 4 Live Updates : रोडीज फेम योगेश जाधव बिग बॉसच्या चौथ्या पर्वात दिसणार आहे.
Bigg Boss Marathi 4 Live Updates : नजरेने घायाळ केल्यानंतर शब्दांनी वार करायला अपूर्वा नेमळेकर सज्ज झाली आहे. अपूर्वाची 'बिग बॉस मराठी'च्या घरात धमाकेदार एन्ट्री झाली आहे.
Bigg Boss Marathi 4 Live Updates : 'दोन कटिंग'मध्ये झळकलेला अक्षय केळकर आता 'बिग बॉस 4'मध्ये दिसणार आहे. अक्षय हा स्वभावाने तापट असलेल्याने बिग बॉस मराठीमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.
Bigg Boss Marathi 4 Live Updates : 'स्प्लिट्सविला' फेम अभिनेत्री समृद्धी जाधवने ग्रॅंड प्रीमियरमध्ये चांगलाच जलवा दाखवला आहे. 'बिग बॉस 4'साठी पुण्याची समृद्धी जाधव सज्ज झाली आहे.
Bigg Boss Marathi 4 Live Updates : ‘बिग बॉस मराठी’चे चौथ्या पर्वातील स्पर्धकांची नाव समोर येण्यास सुरुवात झाली असून आता 'सातारी बाणा' 'बिग बॉस मराठी'मध्ये दिसणार आहे. किरण माने 'बिग बॉस मराठी'मध्ये धमाका करताना दिसून येणार आहेत.
Bigg Boss Marathi 4 Live Updates : मुंबईचा निखिल राजेशिर्के आणि कोल्हापूरची अमृता धोंगडे 'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व गाजवायला सज्ज आहे. दोघेही मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे.
Bigg Boss Marathi 4 Live Updates : अभिनेता प्रसाद जवादे बिग बॉस मराठीच्या घरात जाणारा दुसरा स्पर्धक ठरला आहे.
Bigg Boss Marathi 4 Live Updates : देवमाणूस फेम तेजस्विनी लोणारी 'बिग बॉस मराठी 4'ची पहिली स्पर्धक ठरली आहे.
Bigg Boss Marathi 4 Live Updates : 'बिग बॉस मराठी 4'च्या ग्रँड प्रीमिअरला सुरुवात झाली आहे.
Bigg Boss Marathi 4 Exclusive : बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला (Bigg Boss Marathi 4) आजपासून सुरुवात होणार आहे. पण बिग बॉसच्या घरात दिल्या जाणाऱ्या आदेशांना कोणाचा आवाज दिला आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर बिग बॉसच्या आवाजामागचा खरा चेहरा व्हाईस आर्टिस्ट रत्नाकर तारदळकर (Ratnakar Tardalkar) यांचा आहे.
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सगळ्या गोष्टी तशाच आहेत. मात्र, सोबतच एक खास सरप्राईज देखील दिसणार आहे. गेल्या तीन सीझनमध्ये नसलेली एक गोष्ट या पर्वात दिसणार आहे ती म्हणजे या घराची बाल्कनी. यंदा घरात बाल्कनी देखील देण्यात आली आहे. या बाल्कनीत विशेष सजावट करण्यात आली आहे. 'चाळ संस्कृती' अशी या घराची थीम असणार आहे. आजपासून हे घर आणि स्पर्धक पुढचे 100 दिवस प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहे.
BIGG BOSS मराठीच्या Grand Premiere च्या भव्य मंचावर महेश मांजरेकरांची ग्रॅंड एन्ट्री होणार आहे.
Bigg Boss Marathi 4 : महेश सरांची थोड्याच वेळात शाळा भरणार आहे. पण यंदा 'All Is Well' असणार आहे.
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचं तिसरं (Bigg Boss Marathi 3) पर्व संपल्यापासून चाहते चौथ्या पर्वाची प्रतीक्षा करत आहेत. चौथं पर्व सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे चाहत्यांना आता चौथ्या पर्वाची उत्सुकता लागली आहे. अखेर आजपासून 100 दिवसांचा खेळ सुरू होणार आहे.
आज महात्मा गांधी यांची जयंती (Gandhi Jayanti 2022). महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर, गुजरात येथे झाला. या वर्षी आपण गांधीजींची 153वी जयंती साजरी करत आहोत. भारत देशाच्या स्वातंत्र्यात गांधीजींचे सर्वात महत्त्वाचे योगदान आहे. अहिंसेच्या मागार्ने त्यांनी लोकांच्या हृदयात स्वातंत्र्याची भावना जागवली होती. बॉलिवूडनेही गांधीजींच्या स्मरणार्थ अनेक चित्रपट बनवले आहेत. या चित्रपटांमध्ये गांधीजींच्या आयुष्याशी संबंधित सर्व बारकावे दाखवण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल...
आपला लाडका सिद्धू अर्थात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) लवकरच साऊथच्या दिग्गज कलाकारांसोबत झळकणार आहे. ‘गांधी जयंती’चं निमित्त साधत झी स्टुडीओने त्यांच्या नव्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मूकपट असणार आहे. ‘गांधी टॉक्स’ (Gandhi Talks) नावाच्या या चित्रपटात साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) , अरविंद स्वामी (Arvind Swami) आणि अभिनेत्री आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाची झलक शेअर करण्यात आली आहे.
हल्ली रोमँटिक गाण्यांची चलती असताना यांत भर घालत एक आशयघन असे रोमँटिक गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले असून हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. प्रेमाच्या सागरात आकंठ बुडालेल्या मुलीला तिचा स्वप्नातला राजकुमारच खऱ्या प्रेमाची जाणीव करून, तिला योग्य तो सल्ला देतो आणि तिचे आयुष्य अधिक सुखकर करतो असा आशयघन विषय 'स्वप्न स्वरूप' निर्मित दिग्दर्शक सचिन आंबात 'राजकुमार' (Rajkumar) या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत.
नेहमीप्रमाणेच यावेळीही ‘बिग बॉस मराठी’चं घर भव्य दिव्य असणार आहे. या घरात जिम, स्विमिंग पूल, डायनिंग एरिया, गार्डन, स्वयंपाकघर आणि कॅप्टन रूमसह स्पर्धकांसाठी सुसज्ज बेड आहेत. परंतु, याहीपेक्षा वेगळ्या आणखी काही गोष्टी यंदा घरात दिसणार आहेत. यंदा हे घर गुलाबी रंगात न्हाऊन निघाल्याचं पाहायला मिळत आहे.
60 आणि 70 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या नावाची जेव्हा चर्चा होते, तेव्हा त्यात आशा पारेख यांचे नाव नक्कीच येते. त्या काळात आशा पारेख यांनी चित्रपट विश्वावर राज्य केले. त्यांनी आपल्या बबली स्टाईलने आणि ग्लॅमरस अवताराने त्या काळात चाहत्यांची मनं जिंकली. आशा पारेख यांनाही त्यांच्या आयुष्यात संघर्ष करावा लागला होता. चित्रपट विश्वात अनेक नकारांना तोंड देऊनही त्यांनी कधीही हार मानली नाही. आशा पारेख यांनी वयाची 80 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1942 रोजी गुजरातमध्ये झाला.
हिना खानने तिच्या अभिनयासोबतच ग्लॅमरस लूकने लाखो चाहत्यांना भुरळ घातली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि इथे ती तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड राहते. आज हिना तिचा वाढदिवस साजरा करत आहे. हिना खानचा जन्म 2 ऑक्टोबर 1986 रोजी श्रीनगरच्या जन्मू-काश्मीरमध्ये झाला. हिनाने दिल्लीच्या सीसीए स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन केले आहे. अभिनेत्रीला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात एअर होस्टेस बनायचे होते. अशा परिस्थितीत तिने शिक्षण पूर्ण केल्यानंतर एअर होस्टेस कोर्ससाठी अर्जही केला. पण, जॉईन करताना हिना खानला मलेरिया झाला होता, त्यामुळे ती या क्षेत्रात काम करू शकली नाही. यानंतर हिना खानने टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवले.
भामट्याने अभिनेते अन्नू कपूर यांच्या अकाऊंटमधून तब्बल 4.36 लाखांची रक्कम दुसऱ्या अकाऊंटमध्ये वळती केली आहे. एका आघाडीच्या खाजगी बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करत केवायसी तपशील अपडेट करण्याच्या बहाण्याने अन्नू कपूर यांची फसवणूक करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे अन्नू कपूर यांना एकूण रकमेतून 3.8 लाख रुपये परत मिळणार आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे.
‘छोटी सरदारनी’ या शोने सर्वांची मने जिंकणाऱ्या निमरितने शोमध्ये येताच खळबळ उडवून दिली. मंचावर येताना ती डोळ्यावर पट्टी बांधून आली आणि सलमान खानसमोर उभी राहिली. डोळ्यांवरची पट्टी काढत ती सलमानला म्हणाली की, बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी मला तुझा चेहरा पाहायचा आहे.
निमरित म्हणाली की, सलमान खान तिच्यासाठी खूप लकी आहे. त्यानंतर निमरितने सलमानला सांगितले की, ती पेशाने एक वकील देखील आहे. यानंतर निमरितने तिचा काळा कोट चढवला आणि अभिनेता सलमान खानवर काही आरोप केले.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
अखेर प्रतीक्षा संपली! दिमाखात पार पडला 'बिग बॉस 16'चा ग्रॅंड प्रीमियर; जाणून घ्या कोणते स्पर्धक सहभागी
सलमान खानच्या (Salman Khan) तुफानी एन्ट्रीने 'बिग बॉस 16'ची (Bigg Boss 16) सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक 'बिग बॉस 16' ची प्रतीक्षा करत होते. पण आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. 'बिग बॉस 16'चा दिमाखदार ग्रॅंड प्रीमियर नुकताच पार पडला. 'गेम बदलेगा क्यूंकी बिग बॉस खुद खेलेगा' अशी यंदाच्या पर्वाची थीम आहे. 'बिग बॉस 16'मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. भाईजानने एकापाठोपाठ एक स्पर्धकांच्या नावांची घोषणा केली आहे. निमरित कौर अलवालीया (Nimrit Kaur Ahluwalia) बिग बॉसच्या घरात सहभागी होणारी पहिली स्पर्धक ठरली आहे.
नाटकाच्या प्रयोगादरम्यान लघुशंका आली अन्...; 'बस बाई बस'च्या मंचावर प्रिया बापटने शेअर केला भन्नाट किस्सा
'बस बाई बस' (Bus Bai Bus) हा छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात दर आठवड्याला वेगवेगळे सेलिब्रिटी सहभागी होत असतात. या कार्यक्रमाच्या आगामी भागात मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात प्रिया अनेक किस्से चाहत्यांसोबत शेअर करणार आहे. त्यामुळे चांगलाच हशा पिकणार आहे.
अजय देवगणच्या 'मैदान'ची रिलीज डेट बदलली; 17 फेब्रुवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अजयचे अनेक सिनेमे गेल्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सध्या अजय 'मैदान' (Maidaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. अजयच्या या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली असून आता हा सिनेमा 17 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बाबा काय बोलू? कशी सुरुवात करू?... अभिनय बेर्डेचा लक्ष्मीकांत बेर्डे यांना भावूक कॉल, व्हिडीओ होतोय व्हायरल
मराठमोळा अभिनेता आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा लाडका लेक म्हणजेच अभिनय बेर्डेचा (Abhinay Berde) 'डान्स महाराष्ट्र डान्स' कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "भूमिका कुठलीही असो हजार टेंशन घेऊन आलेला प्रेक्षक आपलं नाटक बघून घरी जाताना खिशात नाटकाच्या तिकीटाबरोबर मन भरुन लाफ्टर घेऊन गेला पाहिजे", असं अभिनय बेर्डे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये म्हणत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -