Ravichandran Ashwin Retirement  ब्रिस्बेन :  भारताचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी अनिर्णित झाल्यानंतर अश्विननं निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. मॅच संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माच्या उपस्थित आर. अश्विननं निवृत्ती जाहीर केली. ही घोषणा करण्यापूर्वी टीम इंडियानं अश्विनला गार्ड ऑफ ऑनर दिला. यावेळी त्यानं सहकाऱ्यांनी दिलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. यानंतर त्यानं रोहित शर्माला मिठी मारली. याशिवाय पॅव्हेलियनमध्ये आर. अश्विननं विराट कोहलीला मिठी मारली. यावेळी देखील अश्विन भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 


अश्विनच्या निवृत्तीपूर्वी काय घडलं?


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी पावसामुळं अनिर्णित राहिली. मॅच संपताच आर. अश्विन यानं निवृत्तीची घोषणा केली. अश्विननं हा निर्णय घेण्यापूर्वी पॅव्हेलियनमध्ये विराट कोहलीला मिठी मारली. या प्रसंगाचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. आर. अश्विननं भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी टीम इंडियाकडून त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला. यावेळी देखील आर. अश्विन भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. आर. अश्विननं सर्व सहकाऱ्यांनी दिलेला गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला. यावेळी त्यानं रोहित शर्माला मिठी मारली.  रोहित शर्मा आणि आर. अश्विन या दोघांनी मॅच संपल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी अश्विननं निवृत्तीची घोषणा केली. 






आर. अश्विन याची कारकीर्द 


आर अश्विननं भारतासाठी एकूण 287 मॅच खेळल्या. 106 कसोटीमध्ये त्यानं 537 विकेट घेतल्या.  यामध्ये त्यानं 200 डावांमध्ये गोलंदाजी केली. त्यानं 37 वेळा पाच विकेट घेतल्या. 


अश्विननं 116 एकदिवसीय सामने खेळले, त्यामध्ये त्यानं 156 विकेट घेतल्या. तर 65 टी 20 मॅच खेळल्या त्यामध्ये 72 विकेट घेतल्या. 


आर. अश्विन यानं वयाच्या 38 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटीनंतर अश्विननं हा निर्णय घेतला. अॅडिलेडमधील पिंक बॉल टेस्टमध्ये आर. अश्विननं शेवटची कसोटी खेळली. 


आर. अश्विन पत्रकार परिषदेत काय म्हणाला? 


भारतीय क्रिकेटर म्हणून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील  आंतरराष्ट्रीय स्तरावरील माझा अखेरचा दिवस आहे. मला वाटतं  क्रिकेटर म्हणून माझ्यामध्ये अजून क्षमता आहे मात्र क्लब क्रिकेटमध्ये ती दाखवण्याचा प्रयत्न करेन, हा अखेरचा दिवस असेल. मी माझ्या करिअरचा आनंद घेतला आहे. मला सांगायला हवं की इतर सहकाऱ्यांसोबत अनेक आठवणी निर्माण झाल्या आहेत. 


आर. अश्विननं एक्स वर पोस्ट करत म्हटलं की  बराच विचार करुन कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी खेळणं हा एक अविश्वसनीय प्रवास होता, ज्यामध्ये अविस्मरणीय क्षण होते. माझे सहकारी, बीसीसीआय आणि प्रेक्षकांच प्रेम मिळालं. पुढे अनेक आव्हानं आहेत,त्याची प्रतीक्षा आहे कसोटी क्रिकेटला माझ्या ह्रदयात विशेष स्थान असेल, असं अश्विन म्हणाला. 






रविचंद्रन अश्विन यानं ऑफ स्पिनर म्हणून पदार्पण केलं असलं तरी फलंदाज म्हणून देखील किल्ला लढवला आहे. 3503 धावा त्याच्या नावावर आहेत.  


इतर बातम्या :


R Ashwin : मोठी बातमी! रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, गाबा कसोटीनंतर केली घोषणा


Ind vs Aus 3rd Test : भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी अनिर्णित, पाचव्या दिवशी मुसळधार पावसानंतर घेतला निर्णय मालिका 1-1 अशी बरोबरीत