Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत; मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 14 Oct 2023 02:12 PM
Milind Gawali : 'कुठलाही पोलिसवाला कधीही पैसे खात नाही'; 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींची 'ती' पोस्ट चर्चेत!

Aai Kuthe Kay Karte Fame Milind Gawali Post : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेत अभिनेता मिलिंद गवळी अनिरुद्धची भूमिका साकारत आहे. आता मिलिंद गवळी यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून अनिरुद्धच्या वागणुकीचं कौतुक केलं आहे. 

Isha Keskar : 'माझ्या नवऱ्याची बायको'नंतर छोटा पडदा गाजवायला इशा केसकर सज्ज; 'या' मालिकेतून करणार दमदार कमबॅक

Isha Keskar : गेल्या काही दिवसांत विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' (Laxmichya Paulanni) ही नवी मालिकादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून इशा केसकर (Isha Keskar) दमदार कमबॅक करणार आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको'नंतर छोट्या पडद्या गाजवायला इशा सज्ज आहे.

Tanushree Dutta : तनुश्री दत्ताची राखी सावंतविरोधात तक्रार दाखल; नाना पाटेकरांवरही केली टीका

Tanushree Dutta FIR Against Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutt) आणि बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) यांच्यातील वादात आता नवा ट्विस्ट आला आहे. दोघांनीही एकमेकींवर अनेक आरोप केले आहेत. आता राखी सावंतमुळे आपल्या प्रतिमेला धक्का बसू नये यासाठी तनुश्रीने कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे. अभिनेत्रीने राखीविरोधात ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार (FIR) दाखल केली आहे.

Shark Tank India 3 : OYO आणि Zomato च्या संस्थापकानंतर 'या' लोकप्रिय उद्योगपतीची शार्क टँकमध्ये एन्ट्री!

Shark Tank India 3 : 'शार्क टँक इंडिया 3'मध्ये OYO Roomsचे संस्थापक रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) आणि झोमॅटोचे (Zomato) संस्थापक दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांची परिक्षक म्हणून निवड झाली होती. आता या कार्यक्रमाचा नवा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये नव्या परिक्षकाची एन्ट्री झाल्याचे दिसून येत आहे. इनशॉर्ट्सचे सह-संस्थापक आणि सीईओ अजहर इकबाल (Azhar Iqubal) यांची आता 'शार्क टँक इंडिया 3'मध्ये तिसरे परिक्षक म्हणून एन्ट्री झाली आहे. 

Marathi Serials : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' महाराष्ट्रात नंबर 1 मालिका

टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 7.4 रेटिंग मिळाले आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.

Akshay Kumar : अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज' ऑस्करच्या शर्यतीत? निर्मात्यांचा मोठा निर्णय

Akshay Kumar Mission Raniganj For Oscars 2024 : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' (Mission Raniganj) हा सिनेमा 6 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. आता या सिनेमाचे निर्माते 'ऑस्कर 2024'साठी (Oscars 2024) सिनेमाची एन्ट्री पाठवणार असल्याचे समोर आले आहे. 

Shivrayancha Chhava : 'शिवरायांचा छावा' सिनेमाने रिलीजआधीच रचला इतिहास!

Shivrayancha Chhava : 'फर्जंद' (Farzand), 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast), 'पावनखिंड' (Pawankhind), 'शेर शिवराज' (Sher Shivraj) आणि 'सुभेदार' (Subhedar) या सिनेमानंतर दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या सिनेमाने रिलीजआधीच इतिहास रचला आहे. न्ययॉर्कयेथील टाईम्स स्क्वेअरवर या सिनेमाचं पोस्टर झळकलं आहे. 





Hrithik Roshan Metro : हृतिक रोशनने केला मेट्रोने प्रवास; फोटो शेअर करत म्हणाला,"ट्रफिकला कंटाळून..."

Hrithik Roshan Metro : मुंबईत मोठ्या प्रमाणात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे वेळ वाया जात आहे. सर्वसामान्य नागरिकांसह सेलिब्रिटींनादेखील या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. अभिनेता हृतिक रोशननेदेखील (Hrithik Roshan) ट्रफिकला कंटाळून मेट्रोने प्रवास केला आहे. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Gaurav More: "बाजूला एक शाळा होती आणि तिथल्या मुलांना..."; गौरव मोरेनं शेअर केला खास व्हिडीओ


Gaurav More: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या गौरव मोरेचा (Gaurav More) चाहता वर्ग मोठा आहे. गौरवच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. गौरव हा सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.  नुकताच एक खास व्हिडीओ गैरवनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.  त्यानं शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


Nitin Gadkari: 'गडकरी' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार नितीन गडकरी यांची भूमिका; चित्रपटाचं नवं पोस्टर पाहिलंत?


Nitin Gadkari: भारताचे हायवेमॅन अर्थात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या  आजवरच्या  कारकिर्दीवर आधारित असणारा 'गडकरी' (Gadkari Marathi Movie)   हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं एक पोस्टर आणि या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. 'गडकरी' चित्रपटात कोणता अभिनेता नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. नुकतेच गडकरी या चित्रपटाचे एक नवे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये  नितीन गडकरी यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा चेहरा दिसत आहे. 


Sam Bahadur Teaser Out: सॅम बहादुर चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज; विकी कौशल आणि फातिमा सना शेख प्रमुख भूमिकेत


Sam Bahadur Teaser Out: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur)  या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये विकीचा  जबरदस्त अभिनय प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. सॅम बहादुर या चित्रपटाच्या टीझरमधील विकीचा लूक, विकीची नजर आणि त्याचे डायलॉग्स या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत. सॅम बहादुर या चित्रपटामध्ये विकीनं सॅम माणेकशॉ (Sam Manekshaw) यांची भूमिका साकारली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.