Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत.. मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Aatmapamphlet Marathi Movie : आत्मपॅम्फ्लेट (Aatmapamphlet) या मराठी चित्रपटाची सध्या चर्चा होता आहे. या चित्रपटाचं अनेक मराठी कलाकारांनी कौतुक केलं आहे. आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाच्या नावानं देखील अनेकांचे लक्ष वेधले. या चित्रपटाचे लेखक परेश मोकाशी आणि दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी एबीपी माझाला एक खास मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाचे नाव, या चित्रपटाची गोष्ट या सर्व गोष्टींबाबत चर्चा केली.
Madhura Naik: इस्रायल आणि पॅलेस्टिनीमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून या संघर्षातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच नागिन फेम मधुरा नाईकवर (Madhura Naik) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मधुरानं इस्रायल-हमास युद्धात तिच्या कुटुंबातील सदस्यांना गमावले आहे. नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर करुन मधुरानं तिच्या बहिणीच्या आणि तिच्या भाऊजींच्या निर्घृण हत्येबाबत सांगितलं आहे.
Nushrratt Bharuccha: अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान नुरसात इस्रायलमध्ये अडकली होती. 8 ऑक्टोबर रोजी ती भारतात सुखरूप परतली. नुसरत ही विमानतळावर स्पॉट झाली. आता नुसरतनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला, नुसरतने इस्रायलमध्ये अडकलेल्या असताना तिच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्यांचे तसेच तिला मेजेस करणाऱ्यांचे आणि तिच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या लोकांचे आभार मानले आहेत.
Koffee With Karan 8 : करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 26 ऑक्टोबरपासून डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रमाचा प्रीमियर होणार आहे. 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाल्याने या पर्वात कोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
Akshay Kumar Pan Masala Ad: पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे गेल्या काही दिवसांपासून खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar ) चर्चेत आहे. अक्षय, अजय देवगण आणि शाहरुख खान यांच्या पान मसाला ब्रँडच्या जाहिरातीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओवर आता अक्षयनं मौन सोडलं आहे.
Prabhas Anushka Shetty Wedding Photo Viral on Social Media : 'बाहुबली'नंतर (Baahubali) नंतर प्रभास (Prabhas) आणि अनुष्का शेट्टीची (Anushka Shetty) पॅन इंडिया फॉलोइंग झाली आहे. देशभरात त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील या कलाकारांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Ranbir Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा त्याच्या 'रामायण' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नितीश तिवारी यांच्या चित्रपटात रणबीर भगवान श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण रिपोर्टनुसार रणबीर हा या चित्रपटामधील भूमिकेसाठी त्याच्या जीवनशैलीमध्ये बदल करणार आहे. रणबीरनं त्याच्या काही सवयी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Katrina Kaif New Look From Tiger 3 : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina kaif) सध्या 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी 'टायगर 3' हा सिनेमा सज्ज आहे. आता या बहुचर्चित सिनेमातील कतरिना कैफचा (Katrina Kaif) लूक समोर आला आहे.
Abhishek Gaonkar On Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेत अभिषेक गावकर (Abhishek Gaonkar) महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे.
Suniel Shetty : संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सुनील शेट्टी (Suniel Shetty) हे नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेते सध्या चर्चेत आहेत. 'स्टार वर्सेज फूड सर्वाइवल' ओटीटीवरच्या या कार्यक्रमातील पहिल्या भागात दोघेही दिसले. या विशेष भागात ते जेवण बनवताना दिसून आले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी त्यांच्या मैत्रीवर, कामाबद्दल आणि बॉलिवूडबद्दल भाष्य केलं.
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 व्या वर्षात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. आता 'कौन बनेगा करोडपती 15' (Kaun Banega Crorepati 15) तर्फे त्यांना वाढदिवसाची खास भेट देण्यात आली आहे. बिग बी 11 ऑक्टोबरला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. 'केबीसी 15' (KBC 15) तर्फे त्यांच्या वाढदिवसाचं खास आयोजन करण्यात आलं आहे.
Shehnaaz Gill Jasmin Bhasin Bollywood Actress Hospitalized : बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) आणि 'बिग बॉस 14' फेम जस्मिन भसीन (Jasmin Bhasin) या दोन अभिनेत्रींना विषबाधा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. दोघींचेही फोटो व्हायरल होत असून चाहत्यांना धक्का बसला आहे.
Gautami Patil : लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलने (Gautami Patil) आपल्या नृत्याने सर्वांना वेड लावलं आहे. तरुणांसह, लहान मुले आणि वयोवद्धांनाही गौतमीने वेड लावलं आहे. आता गौतमीच्या नृत्याची सापालाही भूरळ पडल्याचं समोर आलं आहे. नवी मुंबईतील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात साप शिरला होता.
Aftab Shivdasani : बॉलिवूड अभिनेता आफताफ शिवदासानी (Aftab Shivdasani) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. ऑनलाइन फसवणुकीमुळे अभिनेत्याचे 1.50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आफताब शिवदासानी यांची 1.50 लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्या प्रकरणी त्यांनी दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Happy Birthday Rekha: बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या रेखा (Rekha) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. "इन आँखों की मस्ती के मस्ताने हज़ारों हैं", "दिल चीज क्या है" या गाण्यांमधील रेखा यांच्या आदाकारीनं प्रेक्षकांना घायाळ केलं. रेखा यांची ब्युटी आणि त्यांचा फिटनेस हा तरुणींना देखील लाजवेल असा आहे. आज रेखा यांचा 69 वा वाढदिवस आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Shyamchi Aai Movie Teaser: प्रतीक्षा संपली! 'श्यामची आई' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; टीझर रिलीज
Shyamchi Aai Movie Teaser: 'श्यामची आई' (Shyamchi Aai) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटातील कलाकारांचे लूक्स, सेट, संवाद ते अगदी संगीत अशा साऱ्या गोष्टींना गोल्डन टच देण्यात आला आहे. 'श्यामची आई' या चित्रपटाच्या टीझरसोबतच या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता मात्र जोरदार वाढली आहे.'श्यामची आई' हा चित्रपटाचा टीझर ब्लॅक अँड व्हाईट आहे.
Aarya Season 3 Teaser: "जिसके सर पर ताज होता है, निशाना भी उसी पर होता है"; सुष्मिता सेनच्या आर्या-3 चा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज
Aarya Season 3 Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) आर्या-3 (Aarya 3) या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आर्या-3 या वेब सीरिजचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये सुष्मिता ही अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.
Ganapath trailer Out: "एक दिन एक ऐसा योद्धा पैदा होगा जो..."; बिग बी, टायगर अन् कृतीच्या 'गणपत' चा दमदार ट्रेलर रिलीज
Ganapath trailer Out: अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) 'गणपत: अ हिरो इज बॉर्न' (Ganapath) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात टायगरसोबत कृती सेनन (Kriti Sanon) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. गणपत चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफ आणि कृती सेनन अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. तर बिग बी यांच्या ट्रेलरमधील लूक्स आणि डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -