Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत, मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 08 Oct 2023 02:17 PM
Hardeek Joshi : राणादा म्हणतोय,"खेळातला माणूस बदलला की खेळाची पद्धतही बदलते"; नेमकं प्रकरण काय?

Hardeek Joshi Movie Club 52 : अभिनेता हार्दिक जोशीला (Hardeek Joshi) यंदा त्याच्या वाढदिवसाची अनोखी भेट मिळाली आहे. हार्दिकची प्रमुख भूमिका असलेल्या 'क्लब 52' (Club 52) या सिनेमाचं टायटल  पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर  लाँच करण्यात आले होते . आता 'क्लब 52' या सिनेमातील हार्दिकचा लूक हा सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. 

Nushrratt Bharuccha : इस्त्रायल युद्धात अडकलेली नुसरत भरुचा सुखरूप; लवकरच मायदेशी परतणार

Nushrratt Bharuccha Israel Hamas Attack : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) इस्त्रायलमधील (Israel) युद्धात अडकली असल्याचं समोर आलं असून आता अभिनेत्रीसंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. इस्त्रायलमध्ये अडकलेल्या नुसरतसोबत संपर्क होत नसल्याचं समोर आलं होतं. आता दूतावासाला इस्त्रायलमध्ये अडकलेल्या नुसरतचा शोध लागला असून ती सुखरूप असल्याचं समोर आलं आहे. तसेच लवकरच ती मायदेशी भारतात परतणार आहे.

Sindhutai Mazi Mai : चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय; ‘सिंधूताई माझी माई - चिंधी बनली सिंधू’

Sindhutai Mazi Mai : 'सिंधुताई माझी माई’ (Sindhutai Mazi Mai) या लोकप्रिय मालिकेच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. ‘सिंधूताई माझी माई - चिंधी बनली सिंधू’ नवीन अध्यायामध्ये सिंधुताईंच्या हृदयस्पर्शी आणि असामान्य अश्या जीवन प्रवासाचा उलगडा होणार आहे.

Kaala Paani Trailer : 'काला पानी'चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर आऊट! आशुतोष गोवारीकर अन् अमेय वाघ मुख्य भूमिकेत

Kaala Paani Trailer Out : 'काला पानी' (Kaala Paani) या वेबसीरिजची घोषणा झाल्यापासून या सीरिजबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी टीझर आऊट झाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली. आता या वेबसीरिजचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर आऊट झाला आहे. 

Marathi Serials TRP : 'ठरलं तर मग' पहिल्या क्रमांकावर; जुई गडकरी गाजवतेय छोटा पडदा

Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. अभिनेत्री जुई गडकरीच्या (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेने पहिल्याच आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...


Marathi Serials TRP : 'ठरलं तर मग' पहिल्या क्रमांकावर; जुई गडकरी गाजवतेय छोटा पडदा

Nushrratt Bharuccha : इस्रायलमधील युद्धाच्या भडक्यात अडकली नुसरत भरुचा; अभिनेत्रीसोबत संपर्क होत नसल्याची टीमची माहिती

Nushrratt Bharuccha : अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. इस्त्राइलमधील (Israel) युद्धाच्या भडक्यात अभिनेत्री अडकली असल्याचं समोर आलं आहे. तसेच अभिनेत्रीसोबत काहीही संपर्क होत नसल्याची टीमने माहिती दिली आहे.

Maharashtrachi Hasyajatra : आता वीकेंड होणार हसरा... शनिवार आणि रविवार घराघरांत भरणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'!

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आता वीकेंड हसरा होणार आहे. शनिवार आणि रविवार घराघरांत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' भरणार आहे.

Amitabh Bachchan : तालिबानकडून बिग बींचं कौतुक; यापूर्वी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही केलेला अमिताभ बच्चन यांचा गौरव

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. बिग बी (Big B) यांची लोकप्रियता फक्त देशापुरतीच मर्यादित नसून परदेशातही त्यांची चांगलीच क्रेझ आहे. वयाच्या 80 व्या वर्षीही ते फिल्मी दुनियेत रमले आहेत. आजही ते वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवत आहेत. प्रकृतीच्या समस्यांवर मात करत ते नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालेत. अशातच आता तालिबानने (Taliban On Amitabh Bachchan) मेगास्टार अमिताभ बच्चन यांचं कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. 

Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'जवान'ने रचला इतिहास; जगभरात 1103.6 कोटींची कमाई करणारा ठरला पहिला हिंदी सिनेमा

Shah Rukh Khan Jawan Box Office Collection Record : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमा प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. रिलीजच्या एक महिन्यानंतरही जगभरातील सिनेरसिकांमध्ये आणि शाहरुखच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कायम आहे.  आता पुन्हा एकदा जगभरात 1103.6 कोटींची कमाई करत या सिनेमाने इतिहास रचला आहे. 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Ashok Saraf : यंदाचा अभिनय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार अशोक सराफ यांना मिळणार; राज्य सरकार करणार केंद्राकडे शिफारस


पुणे : यंदाचा अभिनय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार अशोक सराफ (Ashok Saraf) यांना देण्यात येईल, राज्य सरकार तशी केंद्राकडे शिफारस करणार असल्याचं राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांना बालगंधर्व रंगमंदिर येथे मुनगंटीवार यांच्या हस्ते कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार-2023 प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.


Sharmishtha Raut: शर्मिष्ठासाठी तेजस गिरगाव सोडून ठाण्याला झाला शिफ्ट; अभिनेत्रीनं सांगितला किस्सा


प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. शर्मिष्ठाची ‘सारं काही तिच्यासाठी’  (Sara Kahi Tichyasathi) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या मालिकेत दोन बहिणींचे नाते दाखवण्यात येणार आहे. या मालिकेच्या कलाकारांनी नुकतीच होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी आदेश बांदेकर यांनी या कलाकारांनी विविध प्रश्न विचारले.


नुकताच होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, आदेश बांदेकर हे शर्मिष्ठाला प्रश्न विचारतात. ते म्हणतात,  तुला सगळं ठाण्यातच मिळालं?. यावर शर्मिष्ठा 'हो' म्हणते. त्यानंतर आदेश बांदेकर विचारतात, 'कसं काय पण?'  यावर शर्मिष्ठा म्हणते,  'माझा नवरा गिरगावचा आहे. जेव्हा आमचं लग्न ठरलं. तेव्हा माझी अट होती की, मी ठाणे सोडणार नाही. यावर तो म्हणाला होता, नो प्रॉब्लेम मी, ठाण्यात येतो. मग तो गिरगाव सोडून ठाण्यात होता.'


Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! 'या' दिवशी शाही थाटात अडकणार लग्नबंधनात


Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Date : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी झाली. तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहे. पण चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update) यांचा लग्नाचा मुहूर्त ठरला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.