Marathi Film: जयपुरात तिघींची धमाल! नाच गं घुमा.. झिम्मानंतर या चित्रपटाच्या टिझरची जोरदार चर्चा
जयपूर शहरात एकत्र जात तीन वेगवेगळ्या वयोगटातल्या या स्त्रिया धमाल करताना दिसतात. जयपुरचं सौंदर्य उलगडत त्यांचा प्रवास कोणत्या दिशेला जातो हे पाहणं प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणार आहे.
Marathi Film: मराठी चित्रपट सृष्टीत स्त्रीप्रधान सिनेमे सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. बाई पण भारी देवा, झिम्मा, नाच ग घुमा अशा चित्रपटानंतर आता आणखी एका मराठी सिनेमाचा ट्रेलर चांगलाच चर्चेत आहे. आयुष्य, नातेसंबंध, आणि महिलांचं भावविश्व याच्यावर आधारित सिनेमाचं नाव 'गुलाबी' असं आहे. श्रुती मराठे अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी यांची स्टारकास्ट असलेला हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय.
जयपूर शहरात एकत्र जात तीन वेगवेगळ्या वयोगटातल्या या स्त्रिया धमाल करताना दिसतात. जयपुरचं सौंदर्य उलगडत त्यांचा प्रवास कोणत्या दिशेला जातो हे पाहणं प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणार आहे. स्वप्नांचा नात्यांचा विश्वासाचा आणि मैत्रीचा गुलाबी प्रवास असं म्हणत अभयांग, आणि पानरोमा म्युझिक यांच्या अधिकृत पेजवरून या चित्रपटाचा टिझर प्रसिद्ध करण्यात आलाय.
केव्हा होणारे चित्रपट प्रदर्शित?
वॉलेट फ्लेम मोशन पिक्चर प्रस्तुत गुलाबी हा चित्रपट येत्या 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभ्यंग कुबळेकर यांचा दिग्दर्शन असलेला या चित्रपटात सोनाली शिवणीकर, शितल शानभाग, अभ्यंग कोळेकर आणि स्वप्निल भामरे हे निर्माते आहेत. चित्रपटात अश्विनी भावेंसह मृणाल कुलकर्णी, सुहास जोशी, शैलेश दातार, श्रुती मराठे आणि निखिल आर्या यांची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. ही पोस्ट करत स्वप्नांचा, नात्यांचा, विश्वासाचा आणि मैत्रीचा गुलाबी प्रवास..
घेऊन आलो आहोत ‘गुलाबी’चा एक्सक्लुझिव्ह टिझर ! 🌸
"Gulaabi" Exclusive Teaser about Now! ✨️
'गुलाबी'
२२ नोव्हेंबर पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात !असं लिहिण्यात आलंय.
View this post on Instagram
धमाकेदार स्टारकास्ट, जयपुरमध्ये चित्रीकरण
तीन वेगवेगळ्या वयोगटातल्या महिला एकत्र येऊन धमाल करू शकतात हे या आधीच झिम्मा, तसेच इतर महिला केंद्रित चित्रपटांमधून दाखवण्यात आलंय. त्याच थीमवर आधारित असलेला अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी, आणि श्रुती मराठे यांची स्टारकास्ट असलेला गुलाबी चित्रपट जयपुरमध्ये चित्रीत करण्यात आलाय.