Phulwanti Box Office Collection: प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकांमध्ये असणाऱ्या फुलवंती चित्रपटाला प्रेक्षकांनी दणदणीत प्रतिसाद दिलाय . गेल्या पाच दिवसात या चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर कमावला आहे . 11 ऑक्टोबर रोजी प्राजक्ता माळीचा पहिला वहिला निर्माती म्हणून असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे . पेशवाई काळातील प्रसिद्ध नर्तका असणारी फुलवंती आणि पंडित व्यंकटशास्त्री यांच्यावर असणारी ही देखणी कथा प्रेक्षकांना चांगलीच भावल्याचे चित्र आहे . पहिल्या दोन दिवसात काहीशी जेमतेमच कमाई झालेल्या या चित्रपटाने नंतर उसळी घेत कोट्यवधी रुपयांचं कलेक्शन केला आहे . 


पाचव्या दिवसापर्यंत कोटींच्या घरात


सॅकनिल्कच्या माहितीनुसार शुक्रवारी रिलीज झालेल्या फुलवंती चित्रपटाने पहिला दिवशी केवळ 8 लाख रुपये कमावले .दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाल्याचं चित्र होतं . शनिवारी हीच कमाई साधारण साडेचार पटीने वाढत 36 लाख रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली . रविवारी 16 लाख रुपयांचा कलेक्शन तर सलग पाचव्या दिवशी फुलवंतीन 19 लाख रुपयांचा गल्ला जमवला . पाच दिवसांची एकूण कमाई एक कोटी 54 लाख रुपये एवढी झाल्याचं सांगण्यात येत आहे .


सिनेमाची कथा काय? 


‘फुलवंती’ ही भारतभर किर्ती असलेली नर्तिका आहे. ज्या भूमिकेत प्राजक्त माळी आहे. ती कार्यक्रमाच्या निमित्तानं तिचं पुण्यात  तेही पेशवे दरबारात तिचं येणं होतं. तिथे तिची व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्याशी भेट होते. ही भूमिका अभिनेता गष्मीर महाजनी साकारत आहे.  त्यांच्या भेटीनंतर तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण लागतं.नृत्यांगना ‘फुलवंती’ आणि प्रकांडपंडीत ‘व्यंकट शास्त्री’ यांच्यातील पैज आणि आव्हानांवर हा सिनेमा आधारित आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात मांडण्यात आलीये. 


या दोन सिनेमांची टक्कर


बॉक्स ऑफिसवर सध्या दोन मराठी सिनेमांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळतेय. प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) ' फुलवंती' ( Phulwanti) हा सिनेमा सध्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर आधारित आणि तेजस्विनी पंडीत (Tajaswini Pandit) निर्मित 'येक नंबर' (Yek Number) या सिनेमाशी स्पर्धा करतोय. पण या स्पर्धेत सध्या फुलवंती हा सिनेमा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. येक नंबर हा सिनेमा 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. तसेच फुलवंती हा सिनेमा 11 ऑक्टोबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. दोन मोठे मराठी सिनेमे लागोपाठ प्रदर्शित झाले पण यामध्ये एकच सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारत असल्याचं चित्र सध्या आहे.