Kirti Suresh Birthday: दक्षिणेतील अभिनेत्री कीर्ती सुरेश ही तिच्या सौंदर्यामुळे कायमच चर्चेत असते. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत आणि महेश बाबू यांच्यासारख्या स्टार सोबत काम केल्यानंतर तिच्या अभिनयाचं आणि लुकचा विशेष कौतुक चाहते करत असतातच . लाखो हृदयांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री कीर्ती सुरेश आज तिचा 30वा वाढदिवस साजरा करत आहे . रेखाची सावत्र मुलगी दाखवण्यात आलेल्या एका सिनेमामुळे प्रसिद्ध होतात आलेली आणि त्यानंतर लोकप्रिय झालेली ही दाक्षणात्य क्वीन सर्वांच्याच मनाचा ठाव घेते .
मनमोहक हास्याने घायाळ करणाऱ्या कीर्तीचा वाढदिवस
17 ऑक्टोबर 1992 मध्ये चेन्नईमध्ये जन्मलेली ही दक्षिणेतील अभिनेत्री कीर्ती सुरेश तिच्या गोड हास्यमूळ आणि तिच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीमुळे ही कायमच चर्चेत असते . तिच्या फॅशन सेन्स तर ही कायमचं चाहत्यांकडून कौतुक होत असतं . आपल्या भारतीय पेहरावात चहा त्यांची मने जिंकणारी कीर्ती सुरेश अनेक वर्षांपासून दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करते . कीर्तीने तेलगू तमिळ मल्याळम या तीनही भाषांमध्ये काम केले .
रेखाच्या सावत्र मुलीची भूमिका केली अन लोकप्रिय झाली
कीर्तीने बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली . या अभिनेत्रीला पहिलाच चित्रपट पायलट हा 2000 साली प्रदर्शित झाला होता त्यानंतर अनेक दिग्गजांसोबत काम करण्याची तिला संधी मिळाली . बालकलाकार म्हणून दक्षिणेत ओळखले जात असली तरी देशभर तिला एका चित्रपटाने ओळख मिळवून दिली . महानती या चित्रपटात बॉलीवूड क्वीन रेखा हिने सावत्र आईची भूमिका साकारली होती . त्यानंतर सिनेमातील तिची सावत्र मुलगी असणारी अभिनेत्री म्हणून कीर्ती सुरेशला ओळख मिळाली .
बालकलाकार मग फॅशन डिझायनिंग
ती निर्माता सुरेश कुमार आणि अभिनेत्री मनेका यांची मुलगी आहे. किर्तीने 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला बाल अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि फॅशन डिझाइनचा अभ्यास केल्यानंतर चित्रपटांमध्ये परतली. गीतांजली या मल्याळम चित्रपटात ती पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसली होती.
जवानमध्ये थिरकली, लग्नाचीही वावडी उठली
अलिकडेच शाहरुख खान आणि दिपीका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या जवान चित्रपटात चलेया गाण्यावर किर्ती सुरेश थिरकताना दिसली होती. हे गाणं अनिरुद्ध रविचंदन यांनी संगीतबद्ध केलं आहे. अनिरुद्ध आणि किर्तीची लग्नगाठ बांधणार असल्याची मध्यंतरी वावडीही उठली होती. पण या केवळ अफवा असल्याचं तिनंच स्पष्ट केलं होतं.
हेही वाचा: