एक्स्प्लोर

Drushya Adrushya Upcoming Marathi Movie: 'वास्तव आणि भ्रम याच्यातील सीमारेषा...', मराठीतल्या बहुचर्चित सस्पेन्स-थ्रीलर सिनेमाचं पोस्टर रिलीज, कधी रिलीज होणार?

Drushya Adrushya Upcoming Marathi Movie: 56 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजेच 'इफ्फी'मध्ये 'दृश्य-अदृश्य' चित्रपटानं जागतिक पातळीवरील प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यश मिळविलंय.

Drushya Adrushya Upcoming Marathi Movie: काही सिनेमा (Marathi Movie) आपल्या आशयघन कथानकामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात, तर काही कलाकारांच्या अभिनयाच्या बळावर रसिकांवर मोहिनी घालतात. 'दृश्य-अदृश्य' (Drushya Adrushya Upcoming Marathi Movie) हा आगामी मराठी चित्रपट (Marathi Film) विविध वैशिष्ट्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधत आहे. उत्कंठावर्धक शीर्षकामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता अगोदरच शिगेला पोहोचली असताना नुकतंच 'दृश्य-अदृश्य' चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं आहे. 19 जून रोजी हा चित्रपट संपूर्ण महाष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

56 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजेच 'इफ्फी'मध्ये 'दृश्य-अदृश्य' चित्रपटानं जागतिक पातळीवरील प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यश मिळविले. त्यामुळे या चित्रपटाची चहूबाजूला चर्चा रंगली. आता पोस्टर प्रदर्शनामुळे हा चित्रपट पुन्हा लाइमलाईटमध्ये आला आहे. आरएसटी कॅनव्हास निर्मित 'दृश्य-अदृश्य' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची निर्मिती प्रद्योत पेंढारकर, अनिल वर्खडे, दत्ताजी थोरात, धनंजय थोरात, पृथ्वीराज खेडकर, युवराज खेडकर आणि अश्विनी खेडकर यांनी केली आहे. मिलिंद लेले यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मराठी सिनेसृष्टीसेबतच हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री पूजा सावंत या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. 

Drushya Adrushya Upcoming Marathi Movie: 'वास्तव आणि भ्रम याच्यातील सीमारेषा...', मराठीतल्या बहुचर्चित सस्पेन्स-थ्रीलर सिनेमाचं पोस्टर रिलीज, कधी रिलीज होणार?

प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरवरील पूजा सावंतचा चेहरा रसिकांच्या मनाची घालमेल करतो. तिच्या चेहऱ्यावरील भाव 'दृश्य-अदृश्य'बाबतची उत्सुकता वाढविण्याचे काम करीत आहेत. दृश्य आणि अदृश्य यांच्यामधे एक पुसटशी रेषा असते, जी कधीच दिसत नाही, पण त्यात खूप काही दडलेले असते. या चित्रपटातील 'दृश्य-अदृश्य'मध्येही असेच काहीसे गुंतागुंत निर्माण करणारे कोडे दडलेले असावे याची जाणीव पोस्टर पाहिल्यावर होते. डोळ्यांना दिसणारे आणि सत्य यांच्या संभ्रमात गुरफटवून ठेवणारी 'दृश्य-अदृश्य'ची पटकथा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी आहे. वास्तव आणि भ्रम याच्यातील सीमारेषा धूसर होत गेल्या की सत्याचे 'दृश्य' किती 'अदृश्य' होते, हे प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. पोस्टरवर पूजाच्या मागच्या बाजूला पोलिसी गणवेशात अशोक समर्थ आहे. एकूणच हे पोस्टर चित्रपटाबाबत कुतूहल निर्माण करणारे आहे.

'दृश्य-अदृश्य'च्या दिग्दर्शनासोबतच कथा-पटकथा लेखनही मिलिंद लेले यांनी केले असून, पूजा सावंतसोबत अशोक समर्थ, सुव्रत जोशी, हार्दिक जोशी, अक्षया गुरव, विद्याधर जोशी, केया इंगळे आदी कलाकार आहेत. संवाद अस्मिता कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. वलय मुळगुंद यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार आशिष मुजुमदार, देवदत्त बाजी यांनी संगीत दिले आहे. गायिका प्रियांका बर्वे आणि निधी हेगडे यांनी या चित्रपटातील गाणी गायली असून, नृत्य दिग्दर्शन दीपक देबनाथ यांनी केले आहे. महेश बराटे यांची रंगभूषा, तर किर्ती जंगम-जोशी यांची वेशभूषा आहे. छायाचित्रण अमोल साळुंके यांनी केले असून, संकलनाची जबाबदारी सचिन वाघ यांनी पार पाडली आहे. नितिन बोरकर यांनी कला दिग्दर्शन केले आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget