एक्स्प्लोर

कलाकारांच्या नावाने ब्रॅंड्सची गोची; दीपिका, श्रद्धा, सारा यांच्या नावाने जाहिराती थांबवल्या

श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि दीपिका पादुकोण यांची नावं आल्यामुळे त्यांच्या खांद्यावर असलेल्या ब्रॅंडसची गोची झाली आहे. सध्या या सर्व कलाकारांची नावं सध्या काही आरोपांमध्ये डागाळली आहेत. त्यामुळे यांच्या जाहिराती चालवायच्या की नाही यावर अनेक मोठे ब्रॅंड विचार करु लागले आहेत.

मुंबई : एनसीबीने अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आणि तस्करीप्रकरणी अनेकांची चौकशी सुरू केली आणि बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या बड्या नावांची नावं यात येऊ लागली. रिया चक्रवर्तीपासून सुरू झालेला हा सिलसिला आता दीपिका, सारा आणि श्रद्धा यांच्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे. आता दीपिका आणि इतर सर्व कलाकारांचे मोबाईल जप्त झाले आहेत. आता त्याचा तपास एनसीबी करते आहेच. पण केवळ या नावांमुळे आता बड्या आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्सची गोची झाली आहे.

श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि दीपिका पादुकोण यांची नावं आल्यामुळे त्यांच्या खांद्यावर असलेल्या ब्रॅंडसची गोची झाली आहे. सध्या या सर्व कलाकारांची नावं सध्या काही आरोपांमध्ये डागाळली आहेत. त्यामुळे यांच्या जाहिराती चालवायच्या की नाही यावर अनेक मोठे ब्रॅंड विचार करु लागले आहेत. यात 2019 च्या हवाल्यानुसार एकट्या दीपिकावर तब्बल 19 मोठे ब्रॅंड अवलंबून आहेत. यात ब्रिटानिया, तनिष्क, एक्सिस बॅंक, ओप्पो, विस्तारा एअरलाईन्स आदी ब्रॅंडसचा समावेश होतो. आता या सर्वच ब्रॅंडसची गोची झाली आहे. दीपिकावर या ब्रॅंडस मिळून सध्या 600 कोटी रुपये लागले आहेत. तर श्रद्धा कपूरही अनेक मोठे ब्रॅंड्स बाळगून आहे.

श्रद्धा कपूर ही यूथ आयकॉन म्हणून ओळखली जाते. ती वीट, लिप्टन, लॅक्मे, हेअर एंड केअर, व्हॅसलीन आदी अनेक ब्रॅंड आपल्याकडे बाळगून आहे. यात जवळपास तिच्याकडे 300 कोटीचे ब्रॅंडस असल्याचं कळतं. तर सारा अली खानही अलिकडे आली असली तरी तिच्याकडे चांगले ब्रॅंड्स आहेत. कारण, सारा अली खान ही सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी असल्यामुळे तिच्याकडे असलेलं वलय पाहता प्रॉमिसिंग चेहरा म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. साराकडेही अनेक चांगले ब्रॅंडस आहेत. यात शीतपेयं, शुज, पेन, सौंदर्यप्रसाधने यांचा सहभाग होतो.

आता या तीन कलाकारांची नावं यात आल्याने या ब्रॅंड्सनी आपल्या या कलाकारांच्या जाहिराती तूर्त थांबवायचा निर्णय घेतला आहे. लोकांच्या मनात या कलाकारांमध्ये सध्या असलेला रोष लक्षात घेता या जाहिराती दाखवून आणखी नुकसान न ओढवता मध्यममार्ग काढण्यावर सध्या या कंपन्या विचार करु लागल्या आहेत. यावर बोलताना जाहिरात संस्थेत काम करणारी स्मृती शर्मा म्हणाली, 'कंपन्यानी जाहिराती थांबवणं हे स्वाभाविक आहे. कारण, हे त्या त्या ब्रॅंडचे दूत असतात. त्यांची इमेज डागाळली तर ब्रॅंड याचा विचार करतात. आमीर खाननेही काही वर्षांपूर्वी भारतात राहणं योग्य नसल्याचं विधान केल्यावर एका मोठ्या ग्राहक कंपनीने आमीरच्या जाहिराती थांबवल्या होत्या. उद्या कदाचित यातून हे कलाकार सहीसलामत सुटले तर उद्या या जाहिराती पुन्हा सुरू होतील. जर यातल्या काही कलाकार यात दोषी आढळल्या तर मात्र त्यांना मोठं नुकसान भोगावं लागेल.'

महत्त्वाच्या बातम्या

लग्नाआधीच आई व्हायचं होतं स्वरा भास्करला! अनोळखी डोनरसह 2 वेळा IVF केलं; CAA आंदोलनानं बदललं आयुष्य
लग्नाआधीच आई व्हायचं होतं स्वरा भास्करला! अनोळखी डोनरसह 2 वेळा IVF केलं; CAA आंदोलनानं बदललं आयुष्य
Drishyam 3 Advance Booking: दृश्यम 3’च्या तिकिटांसाठी चढाओढ! 48 तासांत तिकिटांची तुफान विक्री, कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क  
दृश्यम 3’च्या तिकिटांसाठी चढाओढ! 48 तासांत तिकिटांची तुफान विक्री, कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क  
Sushant Singh Rajputs Sister: सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
सत्या-मंजूच्या लग्नासाठी चाहत्यांनी दिला अनोखा आशीर्वाद; अंतरपाटावर उमटले हातांचे ठसे, पाहा लग्नसोहळ्याची खास झलक
सत्या-मंजूच्या लग्नासाठी चाहत्यांनी दिला अनोखा आशीर्वाद; अंतरपाटावर उमटले हातांचे ठसे, पाहा लग्नसोहळ्याची खास झलक

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Embed widget