एक्स्प्लोर

Drishyam 3: डोकं चक्रावणाऱ्या 'दृश्यम 3'ला प्रेक्षकांकडून जबरदस्त रिस्पोन्स; सहाव्या दिवशीही घौडदौड कायम, किती कोटी कमावले?

Drishyam 3 Box Office Collection Day 6: 'दृश्यम 3' या सिनेमाने सहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे.

Drishyam 3 First Week Collection: मोहनलाल (Mohanlal) स्टारर सस्पेन्स थ्रिलर 'दृश्यम 3' (Drishyam 3) या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर 'दृश्यम 3'ला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.  जीतू  जोसेफ दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली. तसेच मल्याळम चित्रपटसृष्टीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक ओपनिंग  मिळवणारा चित्रपट ठरला.  सोमवारीही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम घौडदौड केली. दरम्यान, सहाव्या दिवशी प्रेक्षकांकडून 'दृश्यम 3' सिनेमाला किती प्रतिसाद मिळाला? पाहूयात. 

'दृश्यम 3' सिनेमाने सहाव्या किती कोटींची कमाई केली? (Drishyam 3 first week collection report)

बहुप्रतिक्षित 'दृश्यम 3' सिनेमातून मोहनलाल जॉर्जकुट्टीच्या भूमिकेतून परतले आहेत.  मीना, अंसीबा हसन आणि एस्थर अनिल यांच्याही या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमात डोकं चक्रावून टाकणारे थ्रिलर दाखवण्यात आलं आहे. यामुळे या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे.  हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  पहिल्या आठवड्यात दमदार कामगिरी केल्यानंतर आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवण्यात यशस्वी ठरत आहे. 

परदेशातही 'दृश्यम 3' सिनेमाचा डंका (Drishyam 3 overseas box office collection)

सिनेमाच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास,  'दृश्यम 3' ने पहिल्या दिवशी 15.85 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 11.05 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तिसऱ्या दिवशी 13.70 कोटी रुपये कमावले. तर, चौथ्या दिवशी 13.85 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले.  तसेच पाचव्या दिवशी या सिनेमाने 7.70 कोटी रुपये कमावले.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohanlal (@mohanlal)

सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,  'दृश्यम 3' ने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच पहिल्या मंगळवारी 6.45 कोटी रुपयांची कमाई केली.  यामुळे 'दृश्यम 3' ची  6 दिवसांची एकूण कमाई आता 68.60 कोटी रुपये झाली आहे. वर्ल्डवाइड या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे.  प्रदर्शनाच्या सहा दिवसांत ओवरसीस बॉक्स ऑफिस कलेक्शन 84.70 कोटी रुपये झाले आहे. ज्यामुळे  चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 164.32 कोटी झाली आहे. विशेष म्हणजे,  या सिनेमाने 'आदुजीविथम: द गोट लाइफ'च्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आंबनेळी घाटातील थरारक अपघातात मराठी अभिनेत्यानंही जीव गमावला; 8 जणांसोबत स्कॉर्पिओत होता कलावंत

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

 

महत्त्वाच्या बातम्या

चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Vijay Deverakonda : अभिनेता विजय देवरकोंडा बनला 'रामराज कॉटन'चा ब्रँड ॲम्बेसेडर; खास वेडिंग कलेक्शनचा चेहरा
अभिनेता विजय देवरकोंडा बनला 'रामराज कॉटन'चा ब्रँड ॲम्बेसेडर; खास वेडिंग कलेक्शनचा चेहरा
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget