एक्स्प्लोर

Superhit Doordarshan Show: 42 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला पहिला सुपरहिट कॉमेडी शो; मोठमोठ्या सिनेमांनाही दिलेली टक्कर! मालिकेचं टायटल साँग किशोर कुमारांनी गायलेलं

या मालिकेची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित राहिली नाही. लंडनमध्येही ‘ये जो है जिंदगी’चे चाहते मोठ्या संख्येने होते.

Doordarshan show: एक काळ असा होता, जेव्हा मनोरंजनासाठी प्रेक्षकांसमोर दूरदर्शन हाच प्रमुख पर्याय होता. आजच्या काळात असंख्य टीव्ही चॅनेल्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध असले, तरी एकेकाळी दूरदर्शनवरील मालिका घराघरात आवर्जून पाहिल्या जायच्या. याच काळात 1984 मध्ये ‘ये जो है जिंदगी’ हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याने लोकप्रियतेचे अनेक विक्रम केले.

‘ये जो है जिंदगी’ हा भारतातील पहिल्या लोकप्रिय कॉमेडी सिटकॉमपैकी एक मानला जातो. या मालिकेत सतीश शाह, राकेश बेदी, शफी इनामदार आणि स्वरूप संपत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्रसिद्ध लेखक शरद जोशी यांनी मालिकेचे लेखन केले होते. तर कुंदन शाह, मंजुल सिन्हा आणि रमन कुमार यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती.

सिनेमांच्या कमाईवरही झाला परिणाम!

या मालिकेची लोकप्रियता इतकी वाढली होती की त्याचा परिणाम चित्रपटांच्या व्यवसायावरही होत असल्याचे सांगितले जाते. ‘ये जो है जिंदगी’चा प्रसारणाचा दिवस आणि वेळ प्रेक्षकांसाठी विशेष ठरला होता. शुक्रवारी रात्री लोक मोठ्या संख्येने हा कार्यक्रम पाहण्यासाठी घरात थांबत असत. त्यामुळे त्या काळातील सिनेमांच्या शोला जाणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येवर परिणाम होत असल्याचे म्हटले जाते.

61 भागांची मालिका, परदेशातही लोकप्रिय

1984 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेचे एकूण 61 भाग प्रसारित झाले. मालिकेचे टायटल साँग प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी गायले होते आणि तेही प्रचंड लोकप्रिय झाले.या मालिकेची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित राहिली नाही. लंडनमध्येही ‘ये जो है जिंदगी’चे चाहते मोठ्या संख्येने होते. मालिकेच्या टेपची प्रत मिळण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असत, असा उल्लेख स्वरूप संपत यांनी एका मुलाखतीत केला होता.

मध्यमवर्गीय कुटुंबाच्या दैनंदिन आयुष्याभोवती फिरणाऱ्या या मालिकेतील विनोद आणि पात्रे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. 42 वर्षांनंतरही ‘ये जो है जिंदगी’ची आठवण आवर्जून काढली जाते. दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील हा शो आजही भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Keerthy Suresh : अभिनेत्री कीर्ती सुरेशला दिग्दर्शकाने सर्वांदेखत नको तिथे स्पर्श केल्याचा व्हिडीओ व्हायरल, पण अभिनेत्रीने ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाली, 'आमचं नातं...
अभिनेत्री कीर्ती सुरेशला दिग्दर्शकाने सर्वांदेखत नको तिथे स्पर्श केल्याचा व्हिडीओ व्हायरल, पण अभिनेत्रीने ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाली, 'आमचं नातं...
Preetika Rao Weeding : ना बँड-बाजा, ना कसला झगमगाट..'या' अभिनेत्रीने थाटला संसार; श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गुपचूप केलं लग्न
ना बँड-बाजा, ना कसला झगमगाट..'या' अभिनेत्रीने थाटला संसार; श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गुपचूप केलं लग्न
Munawar Faruqui : 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकली, पैसा आणि प्रसिद्धी मिळाली; पण तरीही 4 दिवस खोलीत रडत बसला 'हा' स्टँडअप कॉमेडियन
'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकली, पैसा आणि प्रसिद्धी मिळाली; पण तरीही 4 दिवस खोलीत रडत बसला 'हा' स्टँडअप कॉमेडियन
Deepali Sayyad On Captain Kharat : अशोक खरात माझ्या कार्यालयात आला होता, मला चिंचोके आणि ओश्नो जल दाखवलं अन् म्हणाला...दिपाली सय्यद यांचा सनसनाटी दावा
अशोक खरात माझ्या कार्यालयात आला होता, मला चिंचोके आणि ओश्नो जल दाखवलं अन् म्हणाला...दिपाली सय्यद यांचा सनसनाटी दावा
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Nashik Crime News: 11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
Eknath Shinde stops Prabhadevi demolition: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
PF Account EPFO: नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
Embed widget