Donald Trump Biopic Controversy : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा 'द अपरेंटिस' बायोपिक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तसं पाहायला गेलं तर अमेरिकेच्या राजकारणात डोनाल्ड ट्रम्प हे नाव बरचं गाजलं. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णायवर तत्कालीन विरोधकांनी आक्षेप घेतला आणि त्याच मुद्द्यांच्या आधारावर पुढच्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव करण्यात आला. त्यानंतरही अमेरिकेच्या राजकारणातून हे नाव काही मागे राहिलं नाही. त्यातच आता पुन्हा एकदा त्यांच्यावरील बायोपिकमुळे हे नाव चर्चेत आलं आहे. 


काही महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना अटकही करण्यात आली होती. अमेरिकेत 2020 साली झालेली अध्यक्षपदाची निवडणूक उलथवून लावण्याचा कट रचणे आणि फसवणूक (Election Racketeering Charge) असे गंभीर आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आले. पण आता त्यांच्या बायोपिकमधून काही आक्षेपार्ह मुद्दे मांडल्याचं त्यांच्या टीमचं म्हणणं आहे. त्यामुळे या सिनेमातील काही सिन्सवर त्यांच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमकडून आक्षेप घेण्यात आला आहे. 


सिनेमातून धक्कादायक खुलासे


'द अपरेंटिस' हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवनावर आधारित सिनेमा सध्या चर्चेत आहे. कान्स फिल्म फेस्टिवलमध्येही या सोहळ्याचा प्रमिअर करण्यात आला. त्यानंतर जवळपास 8 मिनिटं या सिनेमाला प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओव्हेशनही मिळालं. पण या सिनेमामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचे खुलासे करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यापू्र्वीचा काळ या सिनेमात दाखवलाय. त्याचप्रमाणे डोनाल्ड ट्र्म्प त्यांची एक्स पत्नी दिवंगत इवाना यांच्यावर बलात्कार करत असल्याचंही या सिनेमात दाखवलंय. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमकडून या सिनेमावर आक्षेप घेण्यात आलाय. 






टीम कारवाई करण्याच्या तयारीत


दरम्यान या सिनेमात डोनाल्ड ट्रम्प यांचं अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचंही दाखवण्यात आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना ट्रम्प टॉवरचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्यासाठी ते अंडरवर्ल्डची मदत घेत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अंडरवर्ल्डमधील लोकांशी काही करार देखील केल्याचं दाखवलं आहे. पण या सगळ्या गोष्टी खोट्या आणि चुकीचा असल्याचा दावा ट्रम्प यांच्या टीमकडून करण्यात आलाय. त्यांनी म्हटलं की,हा सिनेमा म्हणजे कचरा आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात आम्ही चुकीच्या आणि खोट्या गोष्टी दाखवल्याबद्दल तक्रार दाखल करणार आहोत. त्याचप्रमाणे हा सिनेमा अमेरिकेत प्रदर्शित होऊ न देण्यासाठीही त्यांची टीम कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलीये.


ही बातमी वाचा : 


Shah Rukh Khan Discharged: शाहरुखला रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृतीही स्थिर; फायनल पाहण्यासाठी शाहरुख मैदानात दिसणार?