Kalki 2898 AD Teaser:  नाग अश्विनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD Teaser) ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याने चाहत्यांची बरीच निराशा झाल्याचं पाहायला मिळतंय. पण चाहत्यांची उत्सुकता वाढण्यासाठी निर्मात्यांकडून सिनेमाचा नवीन टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीही नाराजी काहीशी दूर झाल्याचं पाहायला मिळतंय. हा सिनेमा आता 27 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी सिनेमाचा नवीन टीझर लॉन्च करण्यात आला आहे. 


हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये हैदराबाद येथे कल्की 2898 AD साठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना प्रभासच्या पात्राची देखील ओळख करुन देण्यात आली. विशेष म्हणजे त्याने या कार्यक्रमातच एका अनोख्या वाहनातून प्रवेश केला. या वाहनाचं नाव बुज्जी असं होतं. या कस्टम मेड गाडीतून तो दोन ते तीन फेऱ्या मारतो आणि त्यातून बाहेर येतो. 


प्रभासच्या सिनेमाचा नवा टीझर रिलीज


या सिनेमात प्रभास हा भैरव या पात्रामध्ये दिसणार आहे. या टीझरमध्ये एक AI उपकरण असल्याचे दाखवण्यात आलं आहे. यामध्ये बुज्जी हा भैरवचा जोडीदार आहे. बुज्जीचा मेंदू हे एक असे उपकरण आहे जे काहीवेळा भैरवच्या आदेशांचे पालन करते तर कधी नाही. या टीझरमध्ये एआयची देखील जादू पाहायला मिळतेय. 



'कल्कि 2898 AD' कधी रिलीज होणार?


'कल्कि 2898 AD' या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबतच प्रभास आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच कमल हसन आणि दिशा पटानी हे कलाकार देखील  कल्कि 2898 AD या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहेत, असं म्हटलं जात आहे. तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचे आधी प्रोजेक्ट-के असे नाव होते. पण नंतर या चित्रपटाचे नाव बदलून कल्कि 2898 AD  असं ठेवण्यात आलं. या चित्रपटाला संतोष नारायणन यांनी संगीत दिले आहे, तर चित्रपटाची Cinematography  जोर्डजे स्टोजिल्जकोविक यांनी केले आहे. तसेच चित्रपटाचे एडिटिंग कोटागिरी वेंकटेश्वर राव यांनी केले आहे. 9 मे 2024 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल. अमिताभ बच्चन यांच्या या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.



ही बातमी वाचा : 


Shah Rukh Khan Health Update: उष्माघाताच्या त्रासानंतर शाहरुख खान रुग्णालयात दाखल, आता कशी आहे प्रकृती?  जुही चावलाने दिली हेल्थ अपडेट