Pneumonia in Children : थंडीच्या (Winter) मोसमात लहान-मोठे सर्वांनाच सर्दी, ताप, खोकला यांसारख्या समस्या होतात. सध्या तापमानही कमालीचे खाली घसरले आहे. हिवाळ्यात खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास ती हवा फुफ्फुसांमध्ये जाऊन लहाम मुलांना न्यूमोनिया होण्याचा धोका वाढतो. न्यूमोनिया श्वासासंदर्भातील एक गंभीर समस्या आहे. हा आजार बॅक्टेरियल इंफेक्शमुळे होतो. थंडीच्या मोसमात याचा परिणाम इतर ऋतूंपेक्षा अधिक जाणवतो. हिवाळ्यात हवेत गारवा असल्यामुळे विषाणू संक्रमणाची शक्यता अधिक असते. तसेच सध्या हवेची गुणवत्ता देखील चांगलीच खालावली आहे. त्यामुळे याचा धोका अधिक वाढला आहे. अशा वेळी लहान मुलांमध्ये न्यूमोनियाचा धोका वाढतो, त्यामुळे याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच यावर उपाय करणे गरजेचे आहे.


काय आहेत सुरुवातीची लक्षणे?


हिवाळ्यात लहान मुलांना खोकला, सर्दी, ताप आणि विषाणू संसर्गाचा धोका अधिक असतो. सर्दी-खोकला चार ते पाच दिवसात बरा होतो. पण एक वर्षापासून पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचा सर्दी-खोकला 4-5 दिवसांत बरा न झाल्यास हा संसर्ग गंभीर होऊ शकतो. त्याचे रूपांतर न्यूमोनियामध्ये होते. यामध्ये वेळीच उपाय न करता निष्काळजीपणा केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे वेळीच मुलांची डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या.


न्यूमोनियाची लक्षणे काय आहेत?



  • ताप आणि खोकला

  • धाप लागणे, जलद श्वासोच्छ्वास

  • श्वास घेताना छातीत दुखणे

  • उलट्या होणे, भूक न लागणे

  • शरीरात पाण्याची कमतरता

  • ओठ किंवा नखे निळे होणे


न्यूमोनियाचा जास्त धोका कुणाला?



  • हृदयासंबंधित समस्या किंवा विकार

  • हृदयात जन्मजातच छिद्र असणे 

  • श्वसनमार्गासंबंधित कोणत्याही प्रकारची समस्या

  • अकाली जन्मलेले आणि कमी वजनी जन्मलेले बाळ

  • कमकुवत प्रतिकारशक्ती असलेली मुले


'या' गोष्टींची काळजी घ्या



  • थंडीपासून बचाव करण्यासाठी लहान मुलांना उबदार कपडे घाला.

  • पिण्यासाठी कोमट पाणी द्या आणि ताजे अन्न खायला द्या.

  • फ्रीजमध्ये ठेवलेले थंड दूध देणे टाळा.

  • मुलांना हंगामी फळांचा रस आणि भाज्यांचे सूप द्या.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Makar Sankranti 2023 : मधुमेह असल्यामुळे मिठाईपासून दूर राहावं लागतंय? अशी बनवा शुगर फ्री तिळाची चिक्की