Miss Universe 2023 : मिस युनिव्हर्स स्पर्धेत दिविता रायकडे भारताचं नेतृत्व, 'सोनपरी' अवतार होतोय व्हायरल
Miss Universe 2023 : भारताची दिविता राय (Divita Rai) मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत प्रतिनिधित्व करत आहे. 71 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा (Miss Universe 2023) सध्या न्यू ऑर्लीन्स शहरात पार पडत आहे.
Continues below advertisement
Miss Universe 2023 Divita Rai
Continues below advertisement
1/12
दिविता रायने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना गुरुवारी सोनपरी अंदाजात दिसली. 'सोने की चिडीया' अशी दिविताच्या कॉस्ट्यूमची थीम होती. (PC : DivitaRai/instagram)
2/12
यंदा मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत कर्नाटकातील मॉडेल दिविता रायच्या हाती भारताची कमान आहे. या स्पर्धेत 86 देशाच्या सौंदर्यवतींनी सहभाग घेतला आहे. (PC : DivitaRai/instagram)
3/12
दिविता सोनेरी पंख पसरवत "सोने की चिडिया"च्या अवतारात स्टेजवर पोहोचली. तिचा हा लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. (PC : DivitaRai/instagram)
4/12
भारताला एकेकाळी 'सोने की चिडिया' म्हणजे सोनेरी पक्षाची उपमा दिली जायची. मिस युनिव्हर्स स्पर्धेत राष्ट्रीय पोशाख फेरीसाठी दिविता रायने 'सोने की चिडिया' ची वेशभूषा केली होती. (PC : DivitaRai/instagram)
5/12
दिविता रायचा हा आकर्षक 'सोनपरी' लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (PC : DivitaRai/instagram)
Continues below advertisement
6/12
दिविता राय कर्नाटकची राहणारी असून ती एक मॉडेल आहे. दिविताचे वय 25 वर्ष आहे. (PC : DivitaRai/instagram)
7/12
दिविताने 'मिस दिवा युनिव्हर्स 2022' चा (LIVA Miss Diva Universe 2022) चा खिताब जिंकला आहे. (PC : DivitaRai/instagram)
8/12
त्यानंतर आता दिविता राय मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. (PC : DivitaRai/instagram)
9/12
मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेची अंतिम फेरी 14 जानेवारी रोजी रात्री पार पडणार आहे. (PC : DivitaRai/instagram)
10/12
भारतीय वेळेनुसार, हा कार्यक्रम 15 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता पाहता येईल. (PC : DivitaRai/instagram)
11/12
भारतात हा कार्यक्रम JKN 18 हे चॅनेल आणि युट्यूबवर पाहता येईल. तसेच VOOT वर ऑनलाईनही हा कार्यक्रम पाहता येईल. (PC : DivitaRai/instagram)
12/12
2021 वर्षी पंजाबच्या हरनाझ संधूने (Harnaaz Sandhu) भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. हरनाझ संधूने 21 वर्षांनंतर 'मिस युनिव्हर्स 2021' चा (Miss Universe 2021) मुकुट जिंकत भारताला मान मिळवून दिला. हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण होता. (PC : DivitaRai/instagram)
Published at : 13 Jan 2023 12:00 PM (IST)