एक्स्प्लोर

कंगना रनौतला दिलासा देण्यास दिंडोशी सत्र न्यायालयाचा नकार

गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसान प्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं कंगना रनौतला नुकताच जामीन मंजूर केला आहे. कंगानानं काही दिवसांपूर्वी कोर्टापुढे प्रत्यक्ष हजर राहात या प्रकरणी बजावण्यात आलेला वॉरंट रद्द करून घेतला होता.

मुंबई : कंगना रनौतला (Kangana Ranaut) दिलासा देण्यास दिंडोशी सत्र न्यायालयानं नकार दिला आहे. अंधेरी दंडाधिकारी कोर्टात जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याला स्थगिती देण्यास नकार देत कंगनाची याचिका फेटाळून लावण्यात आली. जावेद अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. शनिवारी कंगनाच्या अर्जावर सुनावणी पूर्ण करत न्यायाधीश एस.यु बगाले यांनी आपला निकाल राखून ठेवला होता. 

गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसान प्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं कंगना रनौतला नुकताच जामीन मंजूर केला आहे. कंगानानं काही दिवसांपूर्वी कोर्टापुढे प्रत्यक्ष हजर राहात या प्रकरणी बजावण्यात आलेला वॉरंट रद्द करून घेतला होता. मुंबई सत्र न्यायालयानं दिलासा नाकरल्यानं आता कंगनापुढे हायकोर्टात दाद मागण्याचा पर्याय शिल्लक आहे.

काय आहे प्रकरण?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात कंगनानं एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधानं केली. मात्र, या संवेदनशील प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसताना आपल्यावर खोटे आणि आधारहीन आरोप कंगनानं केले आहेत. यामुळे माझी विनाकारण मानहानी झाली असून प्रचंड मनस्ताप झाला आहे असा आरोप करत कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली आहे.

याप्रकरणी कंगनावर आयपीसी कलम 499 आणि 500 नुसार अब्रुनुकसानी केल्याचा फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी अख्तर यांनी न्यायालयाकडे केली आहे. त्यावर अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात न्यायाधीश आर. आर. खन्हद यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये मुंबई पोलिसांनी आपला चौकशीचा प्राथमिक अहवाल सादर केला. मात्र, कंगनाचा यासंदर्भात जबाब नोंदवणं अद्याप बाकी असल्याचं पोलिसांनी कोर्टाला सांगितले होतं. त्याची दखल घेत न्यायालयाने कंगनाला वॉरंट जारी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

शिवीगाळ अन् वक्तव्यांनी खळबळ उडवली; सुनिता अहुजानं अचानक 'लॉक अप 2' सोडला अन् गोविंदाची एन्ट्री; सुनिताविषयी केले मोठे खुलासे..
शिवीगाळ अन् वक्तव्यांनी खळबळ उडवली; सुनिता अहुजानं अचानक 'लॉक अप 2' सोडला अन् गोविंदाची एन्ट्री; सुनिताविषयी केले मोठे खुलासे..
Bhutam Bhayam Jathai Look: भीतीदायक चेहरा, भेदक नजर, अंगभर लोळणाऱ्या जटा.. 'भूतम भयम्' मधील 'जठाई'च्या खतरनाक लूकची चर्चा; अभिनेत्रीला ओळखलंत?
भीतीदायक चेहरा, भेदक नजर, अंगभर लोळणाऱ्या जटा.. 'भूतम भयम्' मधील 'जठाई'च्या खतरनाक लूकची चर्चा; अभिनेत्रीला ओळखलंत?
Dhamaal 4 Box Office Collection'धमाल 4'चा बॉक्स ऑफिसवर धमाका! पहिल्याच दिवशी 'वेलकम टू जंगल' अन् 'अल्फा'ला जोरदार टक्कर; किती कमावले?
'धमाल 4'चा बॉक्स ऑफिसवर धमाका! पहिल्याच दिवशी 'वेलकम टू जंगल' अन् 'अल्फा'ला जोरदार टक्कर; किती कमावले?
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक

व्हिडीओ

Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Girija Raut : सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Vietnam Boat Capsized: समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
Embed widget