एक्स्प्लोर

Dilip Prabhavalkar On Atul Parchure: 'आम्ही पुरस्कार घेतोय, पण आमचा मुलगा आज इथे नाही..' दिलीप प्रभावळकर अतुल परचुरेंच्या आठवणीत व्याकूळ

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिन पुरस्कार वितरण सोहळा माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात पार पडला

Dilip Prabhavalkar On Atul Parchure: मराठी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या अभिनयाचं गारुड प्रेक्षकांच्या मनावर करणारे जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांना यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा मानाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्यासह अभिनेत्री स्वाती चिटणीस (Swati Chitnis) यांनाही  जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत असताना आभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी 'नाती गोती' नाटकाच्या (Nati Goti Natak) आठवणींना उजाळा दिला.  करियरमधील सर्वात महत्वाचं असणाऱ्या या नाटकातील स्वाती चिटणीस , दिलीप प्रभावळकर  आणि मोहन जोशी  कार्यक्रमाला उपस्थित होते मात्र , मुख्य भूमिकेत असणारे दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांच्या आठवणीत दिलीप प्रभावळकर हळवे झाले होते."मला आता त्याची खूप आठवण येते यावेळेला. आम्ही त्या नाटकाचे आई-बाप इकडे जीवनगौरव पुरस्कार घेतोय आणि आमच्याबरोबर आमच्या मुलाचं काम करणारा अतुल परचुरे इथे नाहीये." असं म्हणत त्यांनी अतुल परचुरेंची आठवण काढली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिन पुरस्कार वितरण सोहळा माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात पार पडला. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांची त्यास प्रमुख उपस्थिती होती.

मला अतुलची खूप आठवण येतेय..

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी अतुल परचुरे यांच्या आठवणींनी उजाळा दिला.  ते म्हणाले, " नाती गोती हे फार महत्वाचं नाटक आहे. हे नाटक जयवंत दळवींनी लिहिलं होतं.वामन केंद्रेंनी बसवलं होतं. यामध्ये पोटी मतीमंद मुलगा जन्माला आलेल्या जोडप्याची ती कहाणी होती.अतिशय हृदय नाटक होतं. अतिशय हृदयस्पर्शी नाटक होतं. या नाटकात मी आणि स्वाती चिटणीस नवरा बायकोच्या भूमिकेत होतो. आमच्या पोटी जन्मलेला मुलगा, अत्यंत अवघड भूमिका अतुल परचुरेंनी केली होती. आता मला त्याची खूप आठवण येतेय, यावेळेला. आम्ही त्या नाटकाचे आईबाप इकडे जीवनगौरव पुरस्कार घेतोय. आणि आमच्याबरोबर आमच्या मुलाचं काम करणारा अतुल परचुरे आता इथे नाहीय. मोहन जोशींनी पण या नाटकात काम केलं होतं. आम्ही तिघे काम करायचो. यातले अनेक स्पर्श करणारे सिन्स मला आठवतात. एकदोनच उदाहरणे देतो. अभिनयाचं कस पाहणारे, आव्हान देणारे सीन्स असायचे. आम्हा तिघांचीही कॉन्ट्रिब्युशन खूप होती.

'नाटकातला तो सीन मला अजून आठवतोय..'

"एका सीनमध्ये, तो आमचा मतिमंद मुलगा आहे. अख्ख्या नाटकामध्ये अतुलने एक शब्द नाही उच्चारला, "अर्रर्र..." असं करायचा फक्त. बोलणारे आम्ही होतो, मोहन जोशी होता. पण तो बोलायचा नाही अजिबात. फक्त तो जन्मतःच मतिमंद दाखवला होता. आमच्या अगदी कोंदट असलेल्या घरामध्ये एक असा मोडका ट्रान्झिस्टर टांगलेला असतो. आणि त्याला चालता येत नाही. तो असा असा चालतो आणि त्या आपल्या तंद्रीमध्ये ट्रान्झिस्टरवर हात मारतो. एकदम  वेस्टर्न पॉप म्युजिक सुरु होतं. आणि तिथे दचकतो अतुल. त्याला खूप आवडतं ते म्युजिक. तो नाचायला लागतो.तेव्हा मी हातातलं टायपिंगचं काम सोडून मुलाला नाचताना बघून मला भयंकर आनंद होतो आणि मी पण त्याच्याबरोबर नाचायला लागतो."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by LIMELIGHT MARATHI (@limelight.marathi)

"बॉल डान्स होता आमचा स्टेजवर. आमचा तो बॉल डान्स चालू असताना, तो अतिशय आनंदाने, आणि मुलगा आनंदात नाचतोय म्हणून मला झालेल्या हर्षाने आम्ही नाचताना ऑफिसमधून स्वाती येते. आणि आम्हा दोघांना, नवऱ्याला आणि मुलाला नाचताना बघून तिच्या डोळ्यात पाणी येतं. मला अजूनही ते एक्स्प्रेशन्स त्या दोघांचे आठवतात. माझा अर्थात मला दिसत नव्हतं पण मला जाणवत होतं. तर असे अनेक प्रसंग त्याच्यामध्ये होते. ज्याच्यात मी म्हटलं त्याप्रमाणे अभिनयाचा कस त्याच्यात लागलेला होता. मला अतुलची खूप आठवण येते.नाती गोती मध्ये काम करणारे आम्ही तीन कलाकार आहोत इथे पण अतुल नाहीय, त्यामुळे मला त्याची खूप आठवण येते." असं दिलीप प्रभावळकर म्हणाले.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sai Pallavi Sita Sister Actress: साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
Cocktail 2 OTT Release: थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ! शाहिद कपूर-कृती सेननचा 'कॉकटेल 2' कधी आणि कुठे रिलीज होणार?
थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ! शाहिद कपूर-कृती सेननचा 'कॉकटेल 2' कधी आणि कुठे रिलीज होणार?
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Embed widget