एक्स्प्लोर

Dial 100 : 'डायल 100' वर प्रेक्षकांच्या उड्या, तरुणाईच्या गळ्यातला ताईत मनोज वाजपेयी

Dial 100 : मनोज वाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेला डायल 100 हा सिनेमा झी 5 वर आला आहे. सध्या डायल 100 हा सिनेमा ट्रेंडिंगवर आहे

Dial 100 :  गेल्या काही वर्षांपासून केलेल्या सातत्याच्या कामगिरीमुळे अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी स्वत: असं स्थान निर्माण केलं आहे. मनोज वाजपेयी जवळपास 25 वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करतायत. आधी छोटा पडदा केल्यानंतर त्यांनी मोठ्या पडद्यावर एंट्री घेतली. सत्या सिनेमात त्यांनी केलेला भिकू म्हात्रे लोकांना आवडला. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमे केले. पण आता गेल्या दोन वर्षात मनोज यांना मिळालेली लोकप्रियता पाहता त्यांनी वेबसीरीजमध्ये केलेल्या कामाचं ते फलित आहे असं म्हणावं लागेल. 

सध्या मनोज वाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेला डायल 100 हा सिनेमा झी 5 वर आला आहे. सध्या डायल 100 हा सिनेमा ट्रेंडिंगवर आहे. तरी अभिनेते मनोज वाजपेयी मात्र थोडे नर्व्हस झालेले दिसतात. या नव्या सिनेमाबद्दल बोलताना मनोज म्हणाले, खरंतर गेल्या काही वर्षांपासून मी ज्या वेबसीरीज केल्या त्याला सर्वच स्तरांतून अमाप प्रतिसाद मिळाला. म्हणून जवळपास 16 ते 19 वर्षं वयोगटातली मंडळी माझे जुने सिनेमे काढून काढून बघतायत, ही खूपच चांगली गोष्ट आहे. आता डायल 100 सिनेमावर कसा प्रतिसाद मिळतो ते कळायला आणखी थोडा वेळ जावा लागेल. 

डायल 100 या सिनेमात मनोज यांच्यासोबत अभिनेत्री साक्षी तन्वर, नीना गुप्ता यांनीही काम केलं आहे. या सिनेमाबद्दल बोलताना मनोज म्हणाले, हा चित्रपट एक उत्तम लिहिलेला चित्रपट आहे. तो केवळ थ्रीलर नाही. तर त्याला इतरही कंगोरे आहेत. म्हणजे, त्याला एक फोन कॉल येतो आणि त्यानंतर तिला वाचवायला हा कॉप जात असताना, त्याच्या लक्षात येतं,की आपल्या भूतकाळामुळे आपली पत्नी आणि मुलगी अडचणीत सापडले आहेत. खरंतर या सिनेमातला नायक हा आदर्श पती वा आदर्श बाप नाही. पण त्यातून ती गोष्ट पुढे सरकत जाते. 

मनोज वाजपेयी आपल्या कलाकृतींबद्दल समाधानी असले तरी त्यांना उत्सुकता आपल्या पुढच्या प्रोजेक्टची लागलेली असते. याबद्दल बोलताना ते म्हणाले, फॅमिली मॅनच्या दोन्ही सीझन्सना फारच चांगला प्रतिसाद मिळाला. जगभरातून ही सीरीज वाखाणली गेली. पण आपण तिथेच थांबू नये. त्यानंतर मी केलेल्या प्रोजेक्ट्सना कसा प्रतिसाद मिळतोय ते पाहाणं माझ्यासाठी महत्वाचं असतं. 

 

महत्त्वाच्या बातम्या

सत्या-मंजूच्या लग्नासाठी चाहत्यांनी दिला अनोखा आशीर्वाद; अंतरपाटावर उमटले हातांचे ठसे, पाहा लग्नसोहळ्याची खास झलक
सत्या-मंजूच्या लग्नासाठी चाहत्यांनी दिला अनोखा आशीर्वाद; अंतरपाटावर उमटले हातांचे ठसे, पाहा लग्नसोहळ्याची खास झलक
Sayaji Shinde: सयाजी शिंदे संतापले, वृक्ष लागवडीबाबत प्रश्न विचारताच वनविभाग खडबडून जागा झाला, चूक मान्य करत परवानगी दिली
सयाजी शिंदे संतापले, वृक्ष लागवडीबाबत प्रश्न विचारताच वनविभाग खडबडून जागा झाला, चूक मान्य करत परवानगी दिली
Vishaka Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून विशाखा सुभेदारांनी एक्झिट का घेतली? अखेर सोडलं मौन, कारण सांगताना म्हणाल्या...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून विशाखा सुभेदारांनी एक्झिट का घेतली? अखेर सोडलं मौन, कारण सांगताना म्हणाल्या...
Salman Khan co-starActress: सलमान खानसोबत झळकलेली सुपरस्टार अभिनेत्री, आज चालवतेय टिफिन सर्विस, ओळखलं का कोण?
सलमान खानसोबत झळकलेली सुपरस्टार अभिनेत्री, आज चालवतेय टिफिन सर्विस, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
Ketan Agrawal Case : साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे 5 वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे 5 वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
Siya Goyal Pune Crime: सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत केली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत केली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
Nilesh Ghaywal: मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
Embed widget