एक्स्प्लोर

‘ये नया हिंदुस्तान है…’; धुरंधर 2 चा धमाकेदाक टीझर रिलीज, रणवीर सिंहचा नवा लूक पाहिलात का?

Dhurandhar The Revenge teaser Ranveer Singh first look: धुरंधर : द रिव्हेंजचा धमाकेदार टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Ranveer Singh Dhurandhar 2 action packed teaser release: बहुप्रतिक्षित धुरंधर : द रिव्हेंज या धमाकेदार चित्रपटाचा टीझर काही मिनिटांपूर्वी प्रदर्शित झाला.  धुरंधर या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर निर्मात्यांनी भाग 2 ची घोषणा केली होती.   चाहते आणि प्रेक्षक दुसऱ्या भागाची झलक पाहण्यासाठी  नवीन टीझर आणि ट्रेलरची आतुरतेने वाट  पाहत होते. दरम्यान, प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. धुरंधर : द रिव्हेंज या चित्रपटाचा धुवांधार टीझर नुकताच समाजमाध्यमांमध्ये रिलीज झाला आहे. सोमवारी, या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी घोषणा केली की, धुरंधर  2 चा टीझर मंगळवारी 12:12 वाजता प्रदर्शित होईल. आज या सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून, काही  मिनिटांत व्हायरल झाला आहे. या सिनेमातून रणवीरचा तोच राऊडी अंदाज पाहायला  मिळत आहे.

अभिनेता रणवीर सिंह याने आज सकाळी धुरंधर : द रिव्हेंज या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले होते.  या पोस्टरमध्ये रणवीरच्या चेहऱ्यावर सुडाची भावना, लाल भडक रंग आणि पाऊस पाहायला मिळत आहे. रणवीरचा अत्यंत हिंसक लूक दिसत आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर टीझर कधी रिलीज होईल, असा प्रश्न प्रेक्षकवर्गाकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान, आज दुपारी 12:12  वाजता सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

1 मिनिट 12 सेकंदाच्या या टीझरची सुरूवात रणवीर सिंहने होते. यात त्याचा वेगळा लूक दिसून येत आहे. ब्राऊन डोळे, लहान केस आणि हातात बंदूक असलेला  रणवीरचा लूक पूर्ण वेगळा आणि भयानक दिसत आहे.  यानंतर रणवीरचा हमजा अली मजारीचा लूक पाहायला मिळतो. बंदुकीतून गोळीबार आणि हत्या, हे सर्व टीझरमधून पाहायला मिळत आहे.  अॅक्शन आणि हिंसाचाराने भरलेल्या या टीझरला भन्नाट म्युझिक देण्यात आला आहे. टीझरमध्ये असे दिसून येते की, ही कथा दोन भागात विभागली जाईल, ज्यामध्ये  रणवीर सिंहचा गुप्तचर एजंट बनण्यापासून ते पाकिस्तान पोहोचण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. 

टीझरमध्ये  अर्जून रामपाल, संजय दत्त तसेच आर माधवन या कलाकारांचीही झलक पाहायला मिळत आहे.  टीझरच्या शेवटी रणवीर सिंह 'ये नया हिंदुस्तान है ये घर में घुसेगा भी और मारेगा भी' असा डायलॉग बोलताना दिसत आहे. धुरंधर चित्रपटाच्या शेवटी देखील रणवीर सिंह 'ये नया हिंदुस्तान है ये घर में घुसेगा भी और मारेगा भी' हा डायलॉग बोलताना दिसत आहे. 

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget