एक्स्प्लोर

Dhurandhar on OTT: 1300 कोटी कमावले, बॉक्स ऑफिसवरील वादळानंतर ‘धुरंधर’ ओटीटीवर करणार कब्जा, कधी आणि कुठे पाहाल थरार?

बॉर्डर 2’ प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच ‘धुरंधर’ ओटीटीवर दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Dhurandhar व OTT:आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’नंतर दिग्दर्शकाच्या कारकिर्दीतील दुसरा मोठा यशस्वी चित्रपट ठरला आहे. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांसारख्या दमदार कलाकारांनी सजलेला हा स्पाय थ्रिलर तब्बल साडेतीन तासांचा असूनही प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचण्यात यशस्वी ठरला. सध्या ‘धुरंधर’ हा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

जगभरात जबरदस्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे 879 कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून, वर्ल्डवाइड कमाई 1325 कोटींच्या पुढे गेली आहे. मात्र, आता हा चित्रपट फार काळ मोठ्या पडद्यावर राज्य करणार नाही. ‘बॉर्डर 2’ प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच ‘धुरंधर’ ओटीटीवर दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

‘बॉर्डर 2’च्या रिलीजदरम्यान थिएटरमधून उतरणार ‘धुरंधर’

होय, ‘धुरंधर’ आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट याच महिन्यात ऑनलाइन स्ट्रीम होण्याची शक्यता आहे. या महिन्यात ‘बॉर्डर 2’सोबतच राणी मुखर्जीचा ‘मर्दानी 3’ देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘धुरंधर’च्या कमाईवर परिणाम होणं अपेक्षित आहे. दोन मोठ्या चित्रपटांच्या स्पर्धेत ‘धुरंधर’ मोठ्या पडद्यावरून उतरून ओटीटीवर प्रेक्षकांच्या  भेटीला येणार आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षकांना थरार अनुभवता येणार आहे.

‘धुरंधर’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार?

इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रणवीर सिंहचा हा स्पाय थ्रिलर नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 जानेवारीपासून ‘धुरंधर’ ओटीटीवर पाहता येऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

‘धुरंधर 2’ कधी होणार रिलीज?

‘धुरंधर’ भलेही सिनेमागृहातून उतरणार असला, तरी या फ्रँचायझीचा क्रेझ अजून कमी झालेला नाही. कारण लवकरच ‘धुरंधर 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर ‘बॉर्डर 2’सोबत रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. ‘धुरंधर 2’ 19 मार्च 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून, त्याची टक्कर रॉकिंग स्टार यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाशी होणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Mrs. Mukhyamantri Kidnap : ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ चित्रपटाची घोषणा...भाग्यश्री मोटे साकारणार महत्त्वाची भूमिका
‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ चित्रपटाची घोषणा...भाग्यश्री मोटे साकारणार महत्त्वाची भूमिका
Dhadkan 2 : 26 वर्षांनंतर 'धडकन'चा सिक्वेल येणार? अक्षय कुमार-शिल्पा शेट्टीचा पत्ता कट, सुनील शेट्टीच्या एन्ट्रीबाबत मोठी अपडेट
26 वर्षांनंतर 'धडकन'चा सिक्वेल येणार? अक्षय कुमार-शिल्पा शेट्टीचा पत्ता कट, सुनील शेट्टीच्या एन्ट्रीबाबत मोठी अपडेट
Rito Riba : इंडियन आयडॉलमध्ये नाकारलं, पण आज संपूर्ण देशाला वेड लावलं! 'दिलरुबा दिलनशीं' गाणारा रितो रिबा आहे तरी कोण?
इंडियन आयडॉलमध्ये नाकारलं, पण आज संपूर्ण देशाला वेड लावलं! 'दिलरुबा दिलनशीं' गाणारा रितो रिबा आहे तरी कोण?
CM Vijay Viral Video : अरे असं नव्हे...पहिले हात पकडून पोझ दाखवली; मग CM विजय यांची मान खेचून किस केलं, पुढे काय घडलं?, VIDEO
अरे असं नव्हे...पहिले हात पकडून पोझ दाखवली; मग CM विजय यांची मान खेचून किस केलं, पुढे काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
Embed widget