एक्स्प्लोर

Dhurandhar 2: धुरंधर2 चा 'तो' सीन अन् आर माधवनला शीख समाजाची माफी मागावी लागली, Video पोस्ट करत म्हणाला...

हा वाद टोकाला जाऊ नये म्हणून अभिनेता आर माधवनला सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत शीख समुदायाची माफी मागावी लागली आहे.

Dhurandhar 2: सध्या सगळ्यांच्या ओठी एकाच सिनेमाचं नाव आहे, ते म्हणजे धुरंधर 2. सध्या या चित्रपटाच्या कथेपासून ते कलाकारापर्यंत प्रत्येक गोष्ट प्रचंड चर्चेत आहे. केवळ धुरंधरने नाही तर या सिनेमाच्या सिक्वल नाही बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड ब्रेक करण्यास सुरुवात केली आहे. धुरंधर द रिव्हेंज या चित्रपटातील एका सीनवरून मात्र सध्या नवा वाद सुरू झालाय. हा वाद टोकाला जाऊ नये म्हणून अभिनेता आर माधवनला सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत शीख समुदायाची माफी मागावी लागली आहे. या प्रकरणाची सध्या एकच चर्चा आहे.

नेमका वाद काय ?

धुरंधर 2 चित्रपटातील एकादृश्यावर शीख समाजातील काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता. यामध्ये आर माधवन पवित्र गुरुबानीचे पठण करताना सिगारेट ओढताना दिसत होता. यावर अलीकडेच शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि शिक्स इन महाराष्ट्र या संघटनेचे अध्यक्ष गुरुजीत सिंग खेर यांनी धुरंधर 2 चित्रपटाने शिखांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या नेत्याने आदित्य धर आर माधवन आणि रणवीर सिंह यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर अभिनेता आर माधवन याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. पवित्र गुरुबानीचे पठण करतानाच्या सीनमध्ये बोलण्यापूर्वी त्याने सिगारेट विझवली होती. असं तो म्हणालाय.

काय म्हणाला आर माधवन ?

' नमस्कार. मी आर माधवन . धुरंधरच्या परिवाराच्या वतीने तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही सगळ्यांनी या सिनेमाला इतकं प्रेम दिलं. अलीकडेच असं कळलं आहे की  या चित्रपटातील एकादृश्यामुळे काही जणांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. एका दृश्यात गुरु गोविंद सिंग यांच्या एका ग्रंथातील काही ओळी वाचताना मी सिगारेट ओढली आहे, यावरून काही जणांना त्रास झालाय. मी तुम्हाला ग्वाही देतो की असं काहीही झालेलं नाही. मला आठवतंय त्या ओळींचा उच्चार करण्याआधी आदित्य धर यांनी मला सांगितलं होतं की 'ही ओळ म्हणण्याआधी खूप आधी तुम्ही सिगरेट विझवा.' या ओळी म्हणताना स्क्रीनवर कुठेही धूर दिसणार नाही ना तुमच्या हातात सिगारेट असेल. कारण या ओळी खूप पवित्र आहेत. त्यामुळे मी सिगारेट विझवली होती."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

तो पुढे म्हणाला. 'जर तुम्ही त्या सीन मधील दृश्य पाहिलं तर तुम्हाला कळेल . माझ्या तोंडातून ना धूर निघतोय ना सीन संपेपर्यंत सिगारेटचा लवलेश नाही. कारण हे आम्हाला माहित आहे. आम्ही नकळतपणे ही कोणाच्या भावना दुखावू इच्छित नाही. आम्ही सगळे शीख समुदायाच्या बाजूचे आहोत. आम्ही त्यांचा आदर करतो. माझ्या कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मी आवर्जून सुवर्ण मंदिराला भेट देतो हे सर्वांना माहीत आहे. विश्वास ठेवा कोणालाही दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता . या दृश्याचा सुरुवातीला माझ्या हातात सिगारेट होती . माझी भूमिका स्मोक करते. पण जेव्हा सिन सुरू होतो . त्यावेळी मी सिगारेट विझवून टाकतो . पण तरीही कोणाला वाईट वाटलं असेल तर माफ करा. "असं म्हणत त्याने माफी मागितली आहे. 

19 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला धुरंधर टू बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, आर माधवन, अर्जुन रामपाल ,संजय दत्त, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांचा प्रमुख भूमिका आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget