एक्स्प्लोर

Dhurandhar 2 on OTT: अवघे 4 दिवस अन् धुरंधर 2 ओटीटीवर गरजणार; पण एका ट्विस्टसह! थिएटरपेक्षा वेगळा असणार चित्रपट

Dhurandhar 2 on OTT: भारतभरात तब्बल 1140 कोटी रुपयांपेक्षाही अधिक नेट कलेक्शन करत जागतिक स्तरावर 1791 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली.

Dhurandhar 2 on OTT:  रणवीर सिंह आणि आदित्य धर यांच्या 'धुरंधर 2: द रिव्हेंज' (Dhurandhar 2 the Revenge) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचल्यावर आता हा चित्रपट ओटीटीवर गर्जना करायला सज्ज झाला आहे. भारतभरात तब्बल 1140 कोटी रुपयांपेक्षाही अधिक नेट कलेक्शन करत जागतिक स्तरावर 1791 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. आता चित्रपटगृहात धुरंधर 2 (Dhurandhar 2) पाहून झाला असला तरी ओटीटीवर एका नव्या ट्विस्टसहित हा चित्रपट पाहता येणार आहे. थिएटरपेक्षा या चित्रपटाची ओटीटी आवृत्ती वेगळी असणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी सोशल मीडियावर याबद्दलची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Dhurandhar 2 On OTT)

धुरंधर 2 येणार OTTवर, एका नव्या ट्विस्टसह! (Dhurandhar 2 OTT)

धुरंधर 2 हा चित्रपट 14 मे रोजी रात्री ओटीटीवर स्ट्रीम होणार असल्याचं म्हटलं जातंय. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम केला जाणार आहे. तर परदेशातील प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सवरही हा चित्रपट उपलब्ध असेल. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या डिजिटल आवृत्तीचे नाव ' धुरंधर 2: द रिव्हेंज ( रॉ & अनदेखा ) असं असणार आहे. अनेकांनी या टायटलचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. शिवाय ओटीटी वरील या आवृत्तीचा रनटाईम चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रनटाईमपेक्षा अधिक दिसतोय. 3 तास 49 मिनिटांच्या थिएटर आवृत्तीऐवजी ओटीटीवर तीन तास 52 मिनिटांची आवृत्ती दाखवली जाणार आहे.त्यामुळे प्रेक्षकांना काही नवीन आणि न पाहिलेली दृश्यही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भारतात हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होऊ शकतो तर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना तो नेटफ्लिक्स वर पाहता येणार असल्याची चर्चा आहे.मात्र निर्मात्यांकडून अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान धुरंधर फ्रेंचाईजी इथेच थांबणार नसल्याचे संकेतही निर्मात्यांनी दिले आहेत. आदित्य धर अजूनही धुरंधरच्या दुनियेतून बाहेर पडला नसून या वर्षाअखेरपर्यंत धुरंधरचा फ्रॅंचाईजीबाबत मोठी अपडेट मिळू शकते अशी चर्चाही रंगली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jeetendra Nephew Award Winning Director: एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Embed widget