एक्स्प्लोर

Dhurandhar2 Box Office Collection: रणवीर सिंहच्या धुरंधर 2 चा बॉक्स ऑफिसवर कहर! 5 दिवसात शक्य नव्हतं ते करून दाखवलं, किती कोटींची कमाई?

Dhurandhar 2 Box Office Collection: ईद, उगादी ,गुढीपाडवा या सणांच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेल्या या चित्रपटाला जबरदस्त ओपनिंग मिळाली. पेड प्रिव्ह्यूमधूनच या चित्रपटाने आपली ताकद दाखवलेली.

Dhurandhar 2 Box Office Collection:बॉलीवूडमध्ये सध्या धुरंधर: द रिवेंज या चित्रपटाची जबरदस्त चर्चा सुरू आहे. आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह स्टारर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रिलीजच्या अवघ्या 5 दिवसांतच या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचत 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'धुरंधर : द रिवेंज'नं जगभरात एकूण 751.97 कोटींची जबरदस्त कमाई केली आहे, ज्यामध्ये 541.97 कोटी भारतातून आणि 210 कोटींची कमाई विदेशातून केली आहे. फिल्मचं भारतातलं नेट कलेक्शन 457.12 कोटी आहे. 

5व्या दिवशी किती कमाई? (Dhurandhar 2)

ईद, उगादी आणि गुढीपाडवा या सणांच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेल्या या चित्रपटाला जबरदस्त ओपनिंग मिळाली. पेड प्रिव्ह्यूमधूनच 43 कोटींची कमाई करत या चित्रपटाने आपली ताकद दाखवली होती.19 मार्च रोजी अधिकृत रिलीजच्या दिवशी चित्रपटाने तब्बल 102.55 कोटींची कमाई केली. ईदच्या दिवशी शनिवारी या चित्रपटाने तब्बल 113 कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे, हिंदी व्हर्जनमधूनच 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला. मात्र यानंतरही ‘धुरंधर 2’ थांबला नाही. रविवारी चित्रपटाने आणखी मोठी झेप घेत 114.85 कोटींची कमाई केली, ही कमाई शनिवारीपेक्षाही जास्त होती. यामध्ये हिंदी कलेक्शनचा वाटा सुमारे 107 कोटी इतका होता.

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या 5व्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी या चित्रपटाने 43.1% ऑक्युपन्सीसह 65 कोटींची कमाई केली. यामध्ये हिंदी व्हर्जनमधून 60 कोटी, कन्नड आणि मल्याळममधून प्रत्येकी 0.15 कोटी, तमिळमधून 1.20 कोटी आणि तेलुगूमधून 3.50 कोटींचा गल्ला कमावला. यासह धुरंधर: द रिवेंज या चित्रपटाचा एकूण 5 दिवसांचा कलेक्शन 519.12 कोटींवर पोहोचला आहे.

पहिल्या सोमवारीच रेकॉर्ड ब्रेक

प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची (Dhurandhar 2) क्रेझ इतकी वाढली आहे की, अवघ्या 5 दिवसांतच या चित्रपटाने कमाईचा प्रचंड डोंगर उभा केला आहे. हिंदी सिनेमाच्या इतिहासात इतकी जलद कमाई आतापर्यंत केवळ मोजक्याच चित्रपटांना करता आली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने पहिल्याच सोमवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. याआधी टायगर 3 (59.25 कोटी) आणि एनिमल (44.47 कोटी) यांसारख्या मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड याने मागे टाकले आहेत.

‘धुरंधर 2’ने पहिल्याच वीकेंडमध्ये 450 कोटींहून अधिक नेट कलेक्शन करत इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील मोठे स्टार्स जसे सलमान खान, आमिर खान, ऋतिक रोशन, अजय देवगन आणि अक्षय कुमार यांच्यासाठीही हा आकडा गाठणं अजूनही मोठं आव्हान मानलं जात आहे.

पहिल्या सोमवारी सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट:

धुरंधर 2- 65 कोटी
टाइगर 3- 59.25 कोटी
एनिमल - 44.47 कोटी
बाहुबली 2: द कन्क्लूजन - 40.25 कोटी
गदर 2 - 38.70 कोटी
टाइगर जिंदा है - 36.54 कोटी

धुरंधर: द रिवेंज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे इतिहास घडवत असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे विक्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget