Dharmendra-Anita Raaj Affair: हिंदी सिनेमाचे (Hindi Movie) 'ही-मॅन' धर्मेंद्र म्हणजे, हँडसम सुपरस्टार... ज्यांच्यावर कित्येक सुपरस्टार अभिनेत्री भाळलेल्या. त्या काळातील तरुणींच्याच नाहीतर, तरुणांच्याही गळ्यातील ताईत होते धर्मेंद्र (Dharmendra). पण, तुम्हाला माहितीय का? धर्मेंद्र यांच्या गळ्यातील ताईत कोण होतं? असं विचारल्यावर सर्वांच्या तोंडी एकच नावं येतं, 'ड्रिम गर्ल' हेमा मालिनी (Hema Malini). पण, तसं नाही... सिनेसृष्टीचा हँडसम सुपरस्टार लग्नाच्या आधी आणि लग्नानंतरही कित्येक अभिनेत्रींचा श्वास होता. खरं तर, हेमा मालिनींसोबत धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न केलेलं, त्यापूर्वी त्यांनी प्रकाश कौर (Prakash Kaur) यांच्याशी पहिलं लग्न केलेलं. पण त्यानंतरही धर्मेंद्र तिसऱ्यांदा प्रेमात पडलेले. त्यावेळी त्यांचं हृदय त्यांच्यापेक्षा 26 वर्षांनी लगान अभिनेत्री अनीता राज यांच्यासाठी धडधडत होतं. एवढंच काय, अनीता राजही धर्मेंद्र यांच्यावर भाळलेली. मीडिया रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांनी त्या काळातील कित्येक दिग्दर्शकांना सांगितलेलं की, त्यांच्या फिल्ममध्ये अनीता राज (Anita Raj) यांना कास्ट करा.  

Continues below advertisement


अनीता राजला 'प्रेम गीत' आणि  'नौकर बीवी का' या फिल्म साठी ओळखलं जातं. फिल्म 'नौकर बीवी का'मध्ये ते धर्मेंद्र यांच्यासोबत दिसलेले. 1981 मध्ये अनीतानं फिल्म प्रेम गीतमधून डेब्यू केलेला आणि 1996 पर्यंत त्यांनी सलग सिनेमांमध्ये काम केलं. 1985 मध्ये रिलीज झालेली फिल्म 'करिश्मा कुदरत का'मध्ये धर्मेंद्र आणि अनीता राज पडद्यावर एकत्र दिसले. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडलेली. नंतर, अनितानं अभिनेता सुनील हिंगोरानीशी लग्न केलं, जो तिच्यासोबत 1986 मध्ये 'करिश्मा कुदरत का' सिनेमात दिसलेला. या लग्नापासून अनिताला शिवम हिंगोरानी नावाचा मुलगा झाला, जो 'ये जवानी है दिवानी' आणि 'अग्निपथ' सारख्या हिट चित्रपटातील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे.






अनीता यांनी 2007 मध्ये फिल्म 'थोडी लाईफ थोडा मॅजिक'मधून बॉलिवूडमध्ये कमबॅक केलेलं. 2007 मध्ये 'थोडी लाईफ थोडा मॅजिक' या चित्रपटातून अनिता बॉलिवूडमध्ये परतली आणि ती अजूनही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'मेरे हसबंड की बीवी' या चित्रपटात ती शेवटची अंतराच्या आईची भूमिका साकारताना दिसली होती. चित्रपटांमध्ये परतल्यानंतर, ती 'चार दिन की चांदनी', 'याराम', 'मुद्दा 370 जे अँड के' आणि 'लफझों में प्यार' यासारख्या चित्रपटांमध्ये दिसली. सध्या ती 'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत कावेरीची भूमिका साकारताना दिसत आहे. 62 वर्षीय अनिता राज तिच्या फिटनेस फंडासाठी ओळखली जाते आणि ती तिच्या हेव्ही जिम वर्कआउट्सचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Jaya Bachchan On Dharmendra: 'माझं धर्मेंद्रवर प्रेम आहे...', जेव्हा हेमा मालिनी यांच्यासमोरच जया बच्चन यांनी दिलेली प्रेमाची कबुली; काय घडलेलं?