Jaya Bachchan On Dharmendra: बॉलिवूडचे (Bollywood News) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) म्हणजे, ऐंशीच्या दशकातील गुणी अभिनेत्रींपैकी एक.  आज जया बच्चन अभिनयासोबतच राजकारणातही अॅक्टिव्ह आहेत. समाजवादी पार्टीच्या खासदार असलेल्या जया बच्चन संसदेत अनेक मुद्द्यांवर आवाज उठवताना दिसतात. जया बच्चन यांनी ऐन तारुण्यात सत्यजित रे (Satyajit Ray) यांच्या बंगाली क्लासिक फिल्म (Bengali Classic Film) 'महानगर' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि आपल्या सालस अंदाजानं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. त्यानंतर आठ वर्षांनी त्यांनी हृषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) यांच्या 'गुड्डी' सिनेमातून (Guddi Movie) बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात जया बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्या प्रेमात असलेल्या मुलीची भूमिका साकारली होती. पण तुम्हाला माहिती आहे का? जया बच्चन यांनी खऱ्या आयुष्यातही धर्मेंद्रवर यांच्यावर असलेलं आपल्या प्रेमाची कबुली दिलेली. जया बच्चन यांनी धर्मेंद्र यांची पत्नी आणि बॉलिवूडच्या 'ड्रिम गर्ल' हेमा मालिनी (Hema Malini) यांच्यासमोरच आपल्या प्रेमाची कबुली दिलेली. 

Continues below advertisement

जेव्हा जया बच्चन यांनी दिलेली आपल्या प्रेमाची कबुली

जया बच्चन यांनी 'कॉफी विथ करण'मध्ये धर्मेंद्र यांच्यावरच्या प्रेमाची कबुली दिलेली. जया यांनी त्यांचं ज्याच्यावर कित्येक वर्ष क्रश होतं, त्या व्यक्तीचा खुलासा केलेला. ती व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून बॉलिवूडचे हीमॅन धर्मेंद्र होते. त्याच मुलाखतीदरम्यान धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी देखील उपस्थित होत्या. हेमा यांच्यासमोर जया म्हणाल्या होत्या की, "मला बसंतीची भूमिका करायला हवी होती, कारण मला धर्मेंद्र खूप आवडायचे. जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी खूप घाबरलेलो, मला काय करावं हे कळत नव्हतं. तिथे एक देखणा माणूस होता. त्यानं पांढरी पँट आणि बूट घातलेले, ते ग्रीक गॉडसारखे दिसत होते."

गुड्डी सिनेमात साकारलेली धर्मेंद्र यांच्यावर प्रेम करणाऱ्या तरुणीची भूमिका 

1971 मध्ये, 22 वर्षीय जया बच्चन यांनी 'गुड्डी' ही भूमिका साकारली होती. जी धर्मेंद्र यांनी साकारलेली भूमिका आदर्शवर प्रेम करायची. त्या भूमिकेप्रमाणेच जया बच्चन खऱ्या आयुष्यातही धर्मेंद्र यांच्यापासून पूर्णपणे प्रभावित झालेल्या. दशकांनंतर दोघेही करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात पुन्हा एकत्र आलेले. धर्मेंद्र यांनी इन्स्टाग्रामवर जयासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलेलं की, "वर्षांनंतर... माझ्या गुड्डीसोबत... गुड्डी... जी एकेकाळी माझी खूप मोठी चाहती होती... आनंदाची बातमी."

Continues below advertisement

जया बच्चन यांना अजूनही आपली गुड्डी म्हणून ओळखतात धर्मेंद्र 

एका जुन्या मुलाखतीत, धर्मेंद्र यांनी त्यांच्या खास नात्याबद्दल बोलताना खुलासा केलेला की, ते अजूनही जयाला त्यांची लाडकी 'गुड्डी' मानतात. ते म्हणालेले की, "माझ्यासाठी ती अजूनही गुड्डी आहे, त्याच गोड स्मितहास्यासह... वर्षे उलटली, पण ती बदलली नाही, थोडीही नाही... अर्थात, जेव्हा मी तिला हे सांगतो, तेव्हा जया विरोध करते आणि म्हणते, "मी आता गुड्डी नाही..." पण त्याच क्षणी मी तिला हे सांगतो की, "माझ्यासाठी तू नेहमीच गुड्डी राहशील..." ती कुटुंब आहे आणि आमच्यासाठी नेहमीच एक लहान मुलगी राहील."