Govinda Health Update: बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. तर, दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता गोविंदा अचानक बेशुद्ध पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अचान बेशुद्ध पडल्यामुळे अभिनेत्याला जुहूतील क्रिटिकेयर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गोविंदाच्या मित्र आणि वकील ललित बिंदल यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते आणि माजी खासदार गोविंदाला मंगळवारी रात्री जुहू येथील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 61 वर्षीय अभिनेते अचानक त्यांच्या घरी बेशुद्ध पडलंय आणि त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

गोविंदाच्या प्रकृतीबाबत माहिती देताना ललित बिंदल म्हणाले की, "गोविंदाजींना अचानक बेशुद्ध झाल्यानंतर क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत." त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, अभिनेत्याच्या सर्व महत्वाच्या पॅरामीटर्सवर तपासण्या केल्या जातील आणि कशामुळे त्रास झाला, याचा निष्कर्ष काढला जाईल."

Continues below advertisement

गोविंदा यांना नेमकं झालंय काय? (Actor Govinda Health Updates)

मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी रात्री 8 वाजता बॉलिवूड अभिनेता गोविंदाची प्रकृती अचानक बिघडली. डिसओरिएंटेशनमुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडली. डॉक्टरांनी त्यांना औषधं लिहून दिली आणि पहाटे 1 वाजता त्यांना रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्यात. माजी खासदार गोविंदा यांना बेशुद्ध पडल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं. 61 वर्षीय गोविंदा यांना क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वर्षभरापूर्वी स्वतःच्याच पिस्तुलातून सुटलेली गोळी लागलेली 

एका वर्षापूर्वी गोविंदाला चुकून त्याच्याच परवानाधारक पिस्तूलातून सुटलेली गोळी लागली होती. मुंबईतील घरी असताना त्याच्या हातातून रिव्हॉल्व्हर निसटला आणि गोळी त्याच्या डाव्या गुडघ्याला लागली, अशी माहिती त्यावेळी अभिनेत्यानं दिलेली. गोविंदाची मुलगी टीना त्याला रुग्णालयात घेऊन गेली, जिथे शस्त्रक्रियेनंतर त्याच्या गुडघ्यात लागलेली गोळी काढण्यात आली. पोलिसांनीही या घटनेबद्दल चौकशी केलेली. 

आगामी सिनेमात गोविंदा-सलमान एकत्र

गोविंदा लवकरच सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील 'हिरो नंबर 1'चा मिशी असलेला गोविंदाचा लूक अलीकडेच व्हायरल झालेला. यापूर्वी गोविंदा आणि सलमान खाननं 2007 मध्ये दिग्दर्शक डेव्हिड धवनच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पार्टनर'मध्ये एकत्र स्क्रिन शेअर केलेली. अशातच आता तब्बल 18 वर्षांनी सलमान खान आणि गोविंदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.