एक्स्प्लोर

Dhanush : हॉलिवूड चित्रपटाच्या प्रीमिअरला धनुषचा 'देसी लूक'; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

अनेक वेळा कोणत्याही चित्रपटांच्या प्रीमिअरमध्ये सेलिब्रिटींना तुम्ही सूट,फॉर्मल ड्रेस किंवा डिझायनर ड्रेसमध्ये पाहिलं असेल पण धनुषनं (Dhanush) मात्र 'द ग्रे मॅन' (The Gray Man) चित्रपटाच्या प्रीमिअरला देसी लूक केला होता.

Dhanush : अभिनेता धनुषनं (Dhanush) दाक्षिणात्य चित्रपसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. धनुष त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण  करत आहे. धनुष हा 'द ग्रे मॅन' (The Gray Man) या  चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. 'द ग्रे मॅन' चित्रपटाचा नुकताच प्रीमिअर शो पार पडला. या प्रीमिअरला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. अनेक वेळा प्रीमिअरमध्ये सेलिब्रिटींना तुम्ही सूट,फॉर्मल ड्रेस किंवा डिझायनर ड्रेसमध्ये पाहिलं असेल पण धनुषनं मात्र 'द ग्रे मॅन' चित्रपटाच्या प्रीमिअरला देसी लूक केला होता. धनुषच्या या लूकचं अनेकांनी कौतुक केलं आहे. 

धनुषचा लूक
धनुषचा द ग्रे मॅन हा चित्रपट नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा स्पेशल प्रीमिअर हा गुरुवारी (21 जुलै) संध्याकाळी मुंबईमध्ये पार पडला. प्रीमिअरला उपस्थित असलेल्या सर्व कलाकार तसेच इतर दिग्गजांनी फॉर्मल लूक केला होता. पण धनुषच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. व्हाईट शर्ट, ट्रेडिशनल व्हाईट वेष्टी (लुंगी), हातात घड्याळ असा लूक धनुषनं केला होता. 

नेटकऱ्यांनी केलं कौतुक
नेटफ्लिक्सच्या सोशल मीडिया पेजवरुन धनुषच्या या ट्रेडिशनल लूकचे काही फोटो शेअर करण्यात आले. या फोटोला कमेंट करुन नेटकऱ्यांनी धनुषच्या फोटोचं कौतुक केलं आहे. 'धनुषची स्टाईल खूप छान आहे', अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली. तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'वेष्टी आणि शर्ट, खूप चांगला लूक केला आहेस'

Dhanush : हॉलिवूड चित्रपटाच्या प्रीमिअरला धनुषचा 'देसी लूक'; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी देखील धनुषनं केला होता ट्रेडिशनल लूक
गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला धनुष उपस्थित होता. या सोहळ्यामध्ये धनुषला असुरन या चित्रपटातील अभिनयासाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. तेव्हा देखील त्यानं ट्रेडिशनल लूक केला होता. 


Dhanush : हॉलिवूड चित्रपटाच्या प्रीमिअरला धनुषचा 'देसी लूक'; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

ग्रे-मॅनच्या प्रीमिअरला कलाकारांनी लावली हजेरी
प्रीमिअरला बॉलिवूडबरोबरच काही हॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. विक्की कौशल, रणदीप हुड्डा हे कलाकार प्रीमिअरला उपस्थित होते. द ग्रे मॅन हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 22 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. 

हेही वाचा: 

The Gray Man : धनुषची हॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री; 'द ग्रे मॅन' नेटफ्लिक्सवर होणार रिलीज

 

 

महत्त्वाच्या बातम्या

‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
OTT Crime Thriller:नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
Nana Patekar Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
Columbus Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
Embed widget