एक्स्प्लोर

रजनीकांतच्या लेकीच्या अन् धनुषच्या संसाराला पूर्णविराम! 18 वर्षांनी अधिकृतरित्या घेतला घटस्फोट

धनुष आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांना हे त्यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयाचा धक्का बसला होता.पण दोघेही आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील बदलांना एकदम शांतपणे स्वीकारत आहेत.

Aishwarya Rajnikant Dhanush Divorce: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतच्या लेकीचा आणि तमिळचा लोकप्रीय अभिनेता धनुष आता कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत. १८ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता.त्यांचा हा अर्ज मंजूर झाला असून धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतचा विभक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धनुष आणि ऐश्वर्याला दोन मुलं आहेत. काही वर्षांपूर्वीच या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. पण आता विभक्त होण्याची औपचारिक प्रक्रीया त्यांनी पूर्ण केली आहे. दोन्ही मुलांना एकत्र वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.

धनुष आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांना हे त्यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयाचा धक्का बसला होता.पण दोघेही आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील बदलांना एकदम शांतपणे स्वीकारत आहेत. धनुष अजूनही फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे, तर ऐश्वर्यासुद्धा आपल्या करिअरमध्ये यशस्वीपणे काम करत आहे. ऐर्श्वर्या चित्रपट निर्माती म्हणून दक्षिण चित्रपटसृष्टीत सक्रीय आहे.

अधिकृत घटस्फोट मंजूर

सुपरस्टार रजनीकांत यांच्या मोठ्या मुलीची, ऐश्वर्या आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता धनुष यांच्या १८ वर्षांच्या संसाराला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दोघांनी वेगळं होण्यासाठी २०२२ मध्ये अर्ज केला होता, जो आता मंजूर झाला आहे. चेन्नई कौटुंबिक न्यायालयाने या जोडप्याला अधिकृत घटस्फोट मंजूर केला आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनात काही मतभेद निर्माण झाल्यामुळे त्यांनी हा कठोर निर्णय घेतला होता. अनेक वर्षे एकत्र संसार केल्यानंतर, या जोडप्यानं आता वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.  वैयक्तिक आयुष्याचा आदर करण्याचं आवाहन केलं जात आहे.  धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचं 2004 मध्ये लग्न झालं. आता घटस्फोट झाला असला तरी त्यांच्या दोन्ही मुलांना ते एकत्र वाढवणार आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्समधून, त्यांच्या मुलांसोबत धनुष आणि ऐश्वर्या दोघेही कायम वेळ घालवतानाचे फोटो शेअर करत असतात.

धनुष ऐश्वर्याची लव्हस्टोरी

धनुषने एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांची पहिली भेट एका कार्यक्रमाच्या दरम्यान झाली होती, जिथे त्याच्या कुटुंबासोबत ऐश्वर्या आणि तिची बहीण सौंदर्यादेखील उपस्थित होत्या. पहिल्या भेटीनंतर ऐश्वर्यानं धनुषला बुके पाठवत शुभेच्छा दिल्या होत्या.“गुड वर्क, कीप इन टच” या वाक्यानं धनुषला प्रेरित केलं होतं. त्यानंतर त्याच्यांत भेटीगाठी वाढल्या. या भेटींमधून त्यांचं नातं फुललं. त्यांच्या कुटुंबांनी दोघांच्या लग्नाला संमती दिली आणि रजनीकांत यांच्या घरी मोठ्या धुमधडाक्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडला.

महत्त्वाच्या बातम्या

Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Embed widget