एक्स्प्लोर

Dhananjay Pawar Suraj Chavan: 'एकदा मनातून माणूस उतरला की....' सूरज चव्हाणबाबत बिग बॉस फेम धनंजय पोवार असं का म्हणाला? नक्की घडलं काय?

Dhananjay Pawar Breaks Silence on Suraj Chavan: सूरज चव्हाणबाबत धनंजय पवार नेमकं काय म्हणाला?

Dhananjay Pawar on Suraj Chavan: 'बिग बॉस' (Bigg Boss Marathi) मराठीच्या पाचव्या सिझनने टेलिव्हिजन विश्वात धुमाकूळ घातला होता.  या सिझनमध्ये झापुक झुपूक करत  अभिनेता आणि इन्फ्ल्युएंसर सुरज चव्हाणने (Suraj Chavan) ट्रॉफी जिंकली.  या सिझनमध्ये 'डीपी दादा' अर्थात धनंजय पोवार (Dhananjay Pawar) याने देखील सहभाग घेतला होता.  सूरज (Suraj Chavan) आणि धनंजय यांच्यातील मैत्रितील केमिस्ट्री खूप भन्नाट होती. दोघांचं एकमेकांशी खूप चांगलं बॉण्ड तयार झालं होतं. मात्र, शो संपल्यानंतर त्यांच्यातील मैत्रीत मिठाचा खडा पडला.  सूरजच्या नव्या घरात  धनंजय फर्निचर गिफ्ट म्हणून देईल, असं आश्वासन त्याने दिलं होतं. पण धनंजयने दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही.  यावरुन त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. दरम्यान, अलिकडेच धनंजय याने पॉडकास्टमध्ये नक्की काय घडलं, याची संपूर्ण माहिती दिली. 

सूरज चव्हाणबाबात धनंजय पवार नेमकं काय म्हणाला? (Dhananjay Pawar on Suraj Chava Sofa Controversy)

 अलिकडेच धनंजय पोवार याने 'द मराठी फाऊंडर' या पॉडकास्टला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत धनंजय म्हणाला, 'एका व्हिडीओत सूरज म्हणाला होता की,  डीपी दादा मला सोफा सेट गिफ्ट देणार होता.   तर, मी सूरजला ठीक आहे देतो, असं म्हणालो.  हे सगळं बिग बॉसच्या वेळेस घडलं होतं. त्याच्या घरी सोफा पाठवताना त्याच्या घराचा पत्ता वगैरे कळत नव्हता. तेव्हा  मी म्हटलं त्याला की तुझं लग्न होऊदेत मग आपण तुला सोफा देऊ', असं धनंजय म्हणाला.

'जेव्हा मी सूरजच्या घरी गेलो तेव्हा  त्याच्या  घरी  सोफा, डायनिंग टेबल आधीच भेट म्हणून देण्यात आली होती.  मग सर्वत्र याची चर्चा होऊ लागली. या भेटवस्तूंचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. हा सोफा डीपी दादांनी दिला असं आम्हाला वाटलं, धनंजय दादा खोटारडा आहे, अशाप्रकारच्या कमेंट्स व्हिडीओवर येऊ लागल्या.  नंतर मला समजलं की, अजित दादांनी  सूरजच्या घरी या भेटवस्तू पाठवण्यास सांगितलं होतं'.

'जेव्हा मला ही गोष्ट कळली तेव्हा मी सुरजला याबद्दल व्हिडीओ शेअर करुन सर्वांना सांगायला लावलं.  'की या गोष्टी मला दादांनी आधीच  पाठवलं आहे. डीपी दादाकडून काही घेतलं नाही', असं मी त्याला व्हिडीओत म्हण असं सांगितलं होत. यानंतर सुरज म्हणाला मी कसं बोलू? तेव्हा मी त्याला राहुदेत बाबा, तुझे विचार तुझ्याकडे ठेव असं म्हणालो.  लोक मला शिव्या देत होते, म्हणून मी व्हिडीओ तयार करुन शेअर केला.  मला त्याची ही गोष्ट खटकली.  एकदा माणूस मनातून उतरला की उतरला. मी सगळं त्याला चांगल्या मनाने देणार होतो. गैरसमज झाल्यानंतर लोक मला ट्रोल करु लागले. खोटारडा म्हणू लागले.  मी त्याला खरंच सांग, असं म्हणत होतो', असं मुलाखतीत धनंजयने स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'ब्लँकेटच्या आत ये ना...', 'लॉक अप 2'मध्ये चाललंय काय? ब्रेकअपनंतर 'या' जोडप्याचा कॅमेरासमोरच रोमान्स

महत्त्वाच्या बातम्या

‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
OTT Crime Thriller:नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
Nana Patekar Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
Columbus Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget