एक्स्प्लोर

Devkhel Web Series: 'प्रोमो तात्काळ हटवा अन्यथा कार्यालय फोडू...'; Zee5 वरील 'देवखेळ' वेब सीरिजविरोधात धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप

Devkhel Web Series: आपलं गुहागर या सामाजिक व्यासपीठाच्या वतीनं गुहागर पोलीस ठाण्यात BNS आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Devkhel Web Series: Zee5 या OTT प्लॅटफॉर्मवरील 'देवखेळ' वेब सीरिजच्या (Devkhel Web Series) टीझरमधून गुहागर परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या शंकासूर (Sankasur) देवाबाबत अपमानास्पद आणि धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेले प्रोमो तात्काळ हटवा अन्यथा कार्यालयापर्यंत येऊ, असा इशाराही गुहागरमधील नागरिकांनी दिला आहे. यासंदर्भात गुहागर पोलीस स्थानकात देखील लेखी स्वरूपात तक्रार देऊन कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

आपलं गुहागर या सामाजिक व्यासपीठाच्या वतीनं गुहागर पोलीस ठाण्यात BNS आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार ॲड. संकेत अरुण साळवी, प्रेसिडेंट – गुहागर बार असोसिएशन आणि आपलं गुहागरचे समन्वयक यांनी दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी गुहागर पोलीस निरीक्षकांकडे सादर केली आहे.

तक्रारीनुसार, 'देवखेळ' वेब सीरिजच्या टीझरमध्ये शंकासुर देवाला क्रूर, अमानवी आणि अंधश्रद्धेशी जोडलेला देव म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः "शंकासूर शिक्षा करतो, बळी घेतो", "होळीत दरवर्षी खून करण्याची प्रथा आहे", अशा संवादांमुळे भाविक वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप आहे. शंकासूर देव हे गुहागर परिसरातील प्राचीन श्रद्धास्थान असून, शिमगोत्सव काळात हजारो भाविक श्रद्धेनं उपासना करतात.

दरम्यान, Zee5 Marathi च्या अधिकृत युट्युब चॅनेलवर 21 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या ट्रेलरला आतापर्यंत 8 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्यानं हा आक्षेपार्ह मजकूर देशभर प्रसारित झाल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे समाजात असंतोष निर्माण झाला असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget