एक्स्प्लोर

Bollywood Actor: खिशात फक्त 30 रुपये घेऊन मुंबईत आले, सेन्सॉरमध्ये केली नोकरी; एका गाण्याने बदललं नशीब, तरुणाईला वेड लावणारा ‘चॉकलेट बॉय’ कोण?

त्यांची केसाचा कोंबडा, कपड्यांची निवड, चालण्याची ढब आणि संवादफेक यांची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ होती. आजही ती स्टाईल कोणाला काम करता येणार नाही. 

Bollywood Chocolate Hero Devanand: ‘ मै जिंदगी का साथ निभाता चला गया ’ हे गाणे न आवडणारा माणूस सापडणेच मुश्किल. धुम्रपान करणारा पण लोभस नायक उभा करणारे देवांनद यांचा एक काळ होता.केवळ 30 रुपये घेऊन मुंबईत आलेले देवानंद अनोख्या शैलीने, रोमँटिक भूमिकामुळे आणि बेधडक विचारांमुळे गाजत राहिले. काही माणसं सिनेमा घडवतात. काही जण जगतात. पण काही जण तो समृद्ध करतात. देवानंद हे सिनेमा समृद्ध करणारे. आज त्यांच्या जयंतीमुळे अनेकांना त्यांची आठवण होते. तेव्हा मै जिंदगी का साथ हे गाणं ओठी येतेच. 

30 रुपये घेऊन मुंबईत आले...

दिलीप कुमार यांचा एक काळ होता, राज कपूर यांचा एक काळ होता आणि त्याचप्रमाणे देव आनंद यांचाही एक स्वतंत्र काळ होता. अनेक दशकांचा हा काळ केवळ त्यांच्या अभिनयाचा नव्हता, तर भारतीय सिनेमाच्या बदलत्या प्रवाहाचा साक्षीदारही होता. देव आनंद यांना लहानपणापासूनच अभिनेता होण्याची इच्छा होती. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी ते अवघे ३० रुपये घेऊन मुंबईत आले. सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाहासाठी त्यांनी मिलिटरी सेन्सॉर ऑफिसमध्ये नोकरी केली. त्यानंतर ते इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन अर्थात इप्टा थिएटरशी जोडले गेले.

याच काळात त्यांची प्रभात फिल्म्सच्या बाबूराव यांच्याशी भेट झाली. त्यांनी देव आनंद यांना दिग्दर्शक पी. एल. संतोषी यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर देव आनंद यांनी चित्रपटासाठी ऑडिशन दिले. त्यांच्या अभिनयाने प्रभावित झाल्यानंतर त्यांना ‘हम एक हैं’ हा त्यांच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट मिळाला. 

अनोख्या स्टाइलने तरुणाईला केले वेड

देव आनंद यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळेच आकर्षण होते. त्यांची केसाचा कोंबडा, कपड्यांची निवड, चालण्याची ढब आणि संवादफेक यांची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ होती. आजही ती स्टाईल कोणाला काम करता येणार नाही. 

‘जिद्दी’, ‘जीत’, ‘दिलरुबा’, ‘बाजी’, ‘हमसफर’, ‘दो सितारे’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘सीआयडी’, ‘फनटूश’, ‘काला पानी’, ‘नौ दो ग्यारह’, ‘पेइंग गेस्ट’, ‘जब प्यार किसी से होता है’, ‘असली-नकली’, ‘तेरे घर के सामने’ आणि ‘तीन देवियां’ यांसारख्या चित्रपटांतून देवानंद यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

त्यांची चॉकलेट हिरो आणि रोमँटिक नायकाची प्रतिमा इतकी लोकप्रिय झाली की अनेक तरुण त्यांच्या स्टाइलची नक्कल करू लागले. त्यांच्यासारखी हेअरस्टाइल, कपडे आणि संवादफेक करण्याची फॅशन त्या काळात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली. आता तो चॉकलेट हिरो कोण असा प्रश्न आहेच. 

अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रांत होते सक्रिय

देव आनंद यांची सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे वाढत्या वयासोबतही त्यांनी काम करणे थांबवले नाही. 80 आणि 90च्या दशकात त्यांच्या काळातील अनेक कलाकार रुपेरी पडद्यावर कमी दिसू लागले होते. मात्र देव आनंद मात्र अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रांत सक्रिय राहिले. या काळात ‘देस परदेस’, ‘लूटमार’, ‘स्वामी दादा’, ‘आनंद और आनंद’, ‘लश्कर’, ‘सौ करोड़’, ‘अव्वल नंबर’, ‘प्यार का तराना’, ‘गँगस्टर’, ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’, ‘मैं सोलह बरस की’, ‘सेन्सॉर’, ‘लव्ह अॅट टाइम्स स्क्वेअर’, ‘मिस्टर प्राइम मिनिस्टर’ आणि ‘चार्जशीट’ यांसारख्या चित्रपटांशी ते जोडले गेले. देव आनंद यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांची कधीही हार न मानण्याची वृत्ती. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत ते चित्रपटसृष्टीशी जोडलेले राहिले.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mrs. Mukhyamantri Kidnap : ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ चित्रपटाची घोषणा...भाग्यश्री मोटे साकारणार महत्त्वाची भूमिका
‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ चित्रपटाची घोषणा...भाग्यश्री मोटे साकारणार महत्त्वाची भूमिका
Dhadkan 2 : 26 वर्षांनंतर 'धडकन'चा सिक्वेल येणार? अक्षय कुमार-शिल्पा शेट्टीचा पत्ता कट, सुनील शेट्टीच्या एन्ट्रीबाबत मोठी अपडेट
26 वर्षांनंतर 'धडकन'चा सिक्वेल येणार? अक्षय कुमार-शिल्पा शेट्टीचा पत्ता कट, सुनील शेट्टीच्या एन्ट्रीबाबत मोठी अपडेट
CM Vijay Viral Video : अरे असं नव्हे...पहिले हात पकडून पोझ दाखवली; मग CM विजय यांची मान खेचून किस केलं, पुढे काय घडलं?, VIDEO
अरे असं नव्हे...पहिले हात पकडून पोझ दाखवली; मग CM विजय यांची मान खेचून किस केलं, पुढे काय घडलं?, VIDEO
Neha Gadre : दोन आठवड्यांत विकलं सामान अन् आवरला ऑस्ट्रेलियातील संसार, 7 वर्षांनंतर भारतात परतली 'ही' अभिनेत्री; भारतात परतण्यामागचं सांगितलं कारण
दोन आठवड्यांत विकलं सामान अन् आवरला ऑस्ट्रेलियातील संसार, 7 वर्षांनंतर भारतात परतली 'ही' अभिनेत्री; भारतात परतण्यामागचं सांगितलं कारण
Advertisement

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill Update : मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Gold Silver Rate Today : आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
Pune Crime News: पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
Parliament Special Session Delhi Political Developments : संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
Pune Crime History : गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
Embed widget