एक्स्प्लोर

Deool Band 3 Announcement: देऊळ बंद 2 बघायला गेले अन् थेटरमध्येच चाहत्यांना सरप्राईज; प्रवीण तरडेंनी केली देऊळ बंद 3 ची घोषणा; राघव शास्त्रीला स्वामींचा फोन अन् .. VIDEO

प्रवीण तरडे यांनी 'देऊळ बंद'च्या तिसऱ्या भागाचीही घोषणा केली आहे. तिसरा भाग पुन्हा राघव शास्त्रीच्या आयुष्यात प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे.

Deool Band 3 Announcement: देऊळ बंद या सुपरहिट चित्रपटाने 2015 साली चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला होता. तब्बल 11 वर्षांनी दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे 'देऊळ बंद 2 : आता परीक्षा देवाची ' हा चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन आले आहेत. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या बहुचर्चित सिक्वेलची प्रचंड चर्चा आहे. खरंतर, शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याऐवजी गुरुपुष्यामृत योग आणि ब्रह्ममुहूर्त साधत गुरुवारीच या चित्रपटाचे प्रदर्शन झालं. 6 वाजताच्या पहाटेच्या शोला प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये अक्षरशः गर्दी केली होती. राज्यात अनेक ठिकाणी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतोय. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 2.45 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे.  या सगळ्यात दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी 'देऊळ बंद 3' चित्रपटाची घोषणा केली. दुसऱ्या भागाच्या शेवटी स्वामी राघव शास्त्रीला कॉल करताना दिसतात आणि तिसऱ्या भागाबद्दल चाहत्यांना मोठा सरप्राईज मिळतं. सध्या सोशल मीडियावर देऊळ बंद 3च्या (Deool Band 3) घोषणेचे काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत. 

पहिल्या भागात राघव शास्त्रीच्या एसी कारमधून श्रद्धा अंधश्रद्धेच्या कल्पनांना मोडीत काढत स्वामींनी राघव शास्त्रीच्या मनातून नास्तिकता बाहेर काढली होती. दुसऱ्या भागात स्वामी एका महिला शेतकऱ्याच्या दुचाकीवर स्वार झाले आहेत. आता दुसऱ्या भागाला चित्रपटगृहांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत असताना प्रवीण तरडे यांनी 'देऊळ बंद'च्या तिसऱ्या भागाचीही घोषणा केली आहे. तिसरा भाग पुन्हा राघव शास्त्रीच्या आयुष्यात प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे.

स्वामींचा राघव शास्त्रीला थेट कॉल अन्..

देऊळ बंद या 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाराजांनी प्रमुख भूमिकेत होता.देऊळ बंदच्या दुसऱ्या भागात ही शेवटी गश्मीर महाजनी म्हणजेच राघव शास्त्रीची एन्ट्री प्रेक्षकांना सुखद धक्का देते. चित्रपटातील राघव शास्त्रीच्या एन्ट्रीची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे याच क्लिपमध्ये देऊळ बंदच्या तिसऱ्या भागाची घोषणाही करण्यात आली आहे. 

या व्हिडिओमध्ये राघव शास्त्री अमेरिकेत आपल्या कंपनीत काम करत असताना त्याला एक फोन येतो . दुसऱ्या बाजूने स्वामींचा आवाज ऐकून राघव शास्त्रीचा विश्वासच बसत नाही. स्वामी त्याला म्हणतात ' मी अक्कलकोट होऊन स्वामी समर्थ बोलतोय. तुला मी आठवतोय का? India@11 हे ऐकताच राघव शास्त्रीला मोठा धक्का बसतो. तो 'ओह माय गॉड ' असं म्हणतो . त्यावर स्वामी म्हणतात 'येस माय डार्लिंग,आय ॲम युवर गॉड. कसा आहेस सायंटिस्ट? काय म्हणते तुझी अमेरिका ? काय म्हणतो तुझा डोनाल्ड ट्रम्प ?'  यावर राघव शास्त्री म्हणतो 'आज दहा वर्षांनी माझी कशी काय आठवण झाली ? 'त्यावर स्वामी म्हणतात 'तुझ्यासारख्या आणखी एका नास्तिकाला मार्गी लावून आलोय .तुझ्या मनातील नास्तिकता कमी नाही झाली ? असं विचारताच राघव शास्त्री म्हणतो 'तुम्हाला माझ्या मनात किती आस्तिकता आहे हे पाहण्यासाठी यावच लागेल महाराज 'जे बोलतात स्क्रीनवर देऊळ बंद 3 ची घोषणा होते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aashish ❤️ Priyanka (@aashyanka)

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. तिसऱ्या चित्रपटाच्या घोषणेमुळे चाहते सुखावले आहेत. राघव शास्त्री आणि स्वामींना एकत्र पाहण्यासाठी ते प्रचंड उत्सुक दिसतात. या व्हिडिओवर नेटकरांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan: 'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Embed widget