एक्स्प्लोर

Deool Band 2: 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्वामी पुन्हा येणार; प्रवीण तरडेंच्या देऊळ बंद 2 च्या प्रदर्शनाची तारीख समोर; प्रमुख भूमिकेत कोण?

Release Date Out Pravin Tarde Returns After 11 Years Deool Band sequel

Deool Band 2: देऊळ बंद या 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तब्बल 11 वर्षांनी देऊळ बंदचा दुसरा भाग (Deool Band 2) प्रेक्षकांसमोर येणार आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणाऱ्या या चित्रपटाने, प्रेक्षकांच्या मनात एक आगळंवेगळं स्थान निर्माण केलं होतं. हा चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. 2015 नंतर या चित्रपटाचा आणखी एक भाग यावा अशी इच्छा प्रेक्षक व्यक्त करत होते. त्यानंतर तब्बल 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देऊळ बंद 2 ची घोषणा करण्यात आलीय. लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी ‘या सिनेमाचं डिजिटल पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केलंय. वटवृक्ष एंटरटेनमेंटची निर्मिती असणारा ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे. हा चित्रपट 21 मे 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर झालं.

11 वर्षांनी स्वामी पुन्हा येणार 

लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे याच्या सगळ्याच सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, धर्मवीर 2 या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेलं. अकरा वर्षांनंतर स्वामी पुन्हा येणार असं म्हणत प्रविण यांनी चित्रपटाचे डिजिटल पोस्टर चाहत्यांसमोर आणले आहे. अकरा वर्षांपूर्वी स्वामी राघव शास्त्रीला भेटायला आले. आता अकरा वर्षांनी स्वामी पुन्हा येणार आहेत. पण कोणासाठी ? का ? आणि कधी ? त्याचीच ही तारीख 21 मे 2026. असं लिहित सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. जात 2015 पासून प्रेक्षकांसमोर आलेले चित्रपट आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद दाखवण्यात आलाय.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित ‘देऊळ बंद 2’या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे यांनी केलं आहे. चित्रपटाची निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी सूर्यवंशी यांनी केली. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देऊळबंद’ या चित्रपटात गश्मीर महाजनी, प्रवीण तरडे, गिरीजा जोशी, मोहन जोशी, मोहन आगाशे, सुनील अभ्यंकर यांनी भूमिका साकारल्या होत्या. या सिनेमात प्रमुख भूमिकांची नावं अजून समोर आली नसली तरी हे डिजिटल पोस्टर पाहून चहात्यांच्या आतुरता वाढली आहे. पहिलाच भाग एवढा सुंदर होता, आता दुसरा भाग कधी येतो याची वाट पाहत आहोत अशा प्रकारच्या कमेंट्स या पोस्टखाली चाहते करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

'दृश्यम 3'च्या सस्पेन्ससह ॲक्शन अन् कॉमेडीचा तडका, ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये 12 सिनेमांचा धमाका; कधी काय रिलीज होणार?
'दृश्यम 3'च्या सस्पेन्ससह ॲक्शन अन् कॉमेडीचा तडका, ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये 12 सिनेमांचा धमाका; कधी काय रिलीज होणार?
Prajakta Mali on Lalit Prabhakar Kasab: ललितला कसाबच्या भूमिकेत पाहताच प्राजक्ता माळीची खास पोस्ट, म्हणाली,' आदित्यपेक्षा कसाबच्या भूमिकेतच जास्त..'
ललितला कसाबच्या भूमिकेत पाहताच प्राजक्ता माळीची खास पोस्ट, म्हणाली,' आदित्यपेक्षा कसाबच्या भूमिकेतच जास्त..'
मराठी अभिनेत्रीने बाळासाठी एका रीलवर विश्वास ठेवत नाशिक गाठलं अन् 15 वर्षांच्या प्रतीक्षेचा अंत!  Video शेअर करत सांगितला तो प्रवास
मराठी अभिनेत्रीने बाळासाठी एका रीलवर विश्वास ठेवत नाशिक गाठलं अन् 15 वर्षांच्या प्रतीक्षेचा अंत!  Video शेअर करत सांगितला तो प्रवास
Jitendra Joshi On Namrata Shirodkar: महेश मांजरेकरांमुळे मिळालेला पहिला हिंदी सिनेमा, हिरोईन नम्रता शिरोडकर... घाबरलेला मराठीचा स्टार अभिनेता; म्हणाला...
महेश मांजरेकरांमुळे मिळालेला पहिला हिंदी सिनेमा, हिरोईन नम्रता शिरोडकर... घाबरलेला मराठीचा स्टार अभिनेता; म्हणाला...

व्हिडीओ

Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Investment Summit : महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
2 October NO UPI Day : 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
Maharashtra Drought : आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
Embed widget